ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by Akanksha Kolte Dec 01, 2024 | 08:03 PM

Have you seen these Marathi movies released in October 2024?

१. एक डाव भुताचा  (Ek Daav Bhutacha)

२०२४. विनोदी, कल्पनारम्य.  २ तास २६ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - संदीप मनोहर नवरे

कलाकार : - मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे

"एक डाव भुताचा" चित्रपट समीक्षा

या चित्रपटाची कथा सुद्धा संदीप यांनी लिहीली आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. आणि हे दोघं आहेत म्हटल्यावर अर्थातच चित्रपट विनोदी आहे.

२. एक नंबर  (Yek Number)

२०२४. ड्रामा, रोमान्स, थ्रिलर.  २ तास ३२ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - राजेश मापुस्कर

कलाकार : - धैर्य घोलप, सायली पाटील, तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, संजय मोने, अजित भुरे, आनंद इंगळे

"एक नंबर" चित्रपट समीक्षा

या चित्रपटाची कथा मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं आयुष्य आणि कारकीर्द याभोवती फिरणारी आहे.

३. फुलवंती  (Phullwanti)

२०२४. ड्रामा, रोमँटिक.  २ तास १४ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - स्नेहल प्रविण तरडे

कलाकार : - प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, क्षितिश दाते, ऋषिकेश जोशी, दिप्ती लेले, सुनील अभ्यंकर

"फुलवंती" चित्रपट समीक्षा

बुद्धीमत्ता आणि कला यांतील संघर्ष या चित्रपटात पहायला मिळतो. एक ठराविक प्रेक्षक वर्गाला चित्रपट खूप भारी वाटू शकतो तर त्याच वेळी काही जणांना तो ठिकठाक वाटू शकतो.

४. लाईक आणि सबस्क्राईब (Like Aani Subscribe)

२०२४. रहस्य, थ्रिलर.  २ तास २२ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - अभिषेक मेरूकर

कलाकार : - अमेय वाघ,अमृता खानविलकर,शुभंकर तावडे,जुई भागवत,राजसी भावे,पु्ष्कराज चिरपूटकर,गौतमी पाटील,विठ्ठल काळे

"लाईक आणि सबस्क्राईब" चित्रपट समीक्षा

एका व्लॉगर असलेल्या तरूणीला व्हिडिओ बनवताना एक मृतदेह सापडतो आणि पुढे काय घडतं याभोवती ही कथा गुंफलेली आहे.

५. पाणी  (Paani)

२०२४. ड्रामा, रोमँटिक २ तास ३ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - आदिनाथ कोठारे

कलाकार : - आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, ऋचा वैद्य , किशोर कदम, गिरीश जोशी, रजित कपूर, नितीन दीक्षित

"पाणी" चित्रपट समीक्षा

चित्रपटाच्या नावावरूनच समजतं की चित्रपटात पाणी टंचाई आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भिषण परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट असेल.

६. राजा राणी  (Raja Rani)

२०२४. ड्रामा, रोमँटिक.  २ तास १४ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - शिवाजी दोलताडे

कलाकार : - रोहन पाटील, वैश्नवी शिंदे, सुरज चव्हाण

"राजा राणी" चित्रपट समीक्षा

खरं तर सैराट या चित्रपटाला समोर ठेवून त्याचीच कॉपी करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं म्हणावं इतपत चित्रपटाचा प्लॉट सारखा आहे.

७. कर्मयोगी आबासाहेब (Karmayogi Abasaheb)

२०२४. जीवनचरित्र, ड्रामा.  २ तास ३८ मिनिटे. [A]

दिग्दर्शक : - अल्ताफ दादासाहेब शेख

कलाकार : - अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर

"कर्मयोगी आबासाहेब " चित्रपट समीक्षा

 सामान्य माणसासाठी सामान्य राहून काम करणाऱ्या कर्मयोगी आमदार गणपतराव देशमुख म्हणजेच आबासाहेब यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

८. द एआय धर्मा स्टोरी  (The A.I. Dharma Story)

२०२४. ॲक्शन, ड्रामा.  १ तास २९ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - पुष्कर जोग

कलाकार : - पुष्कर जोग, दिप्ती लेले, स्वराली खोमणे, स्मिता गोंदकर, चिन्मय मांडलेकर

"द एआय धर्मा स्टोरी" चित्रपट समीक्षा

चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे एखाद्याचं आयुष्य कसं उध्वस्त होऊ शकतं हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अभिनेता पुष्कर सुरेखा जोग याने केलेला आहे.

९. गारुड  (Gaarud)

२०२४. ड्रामा, सस्पेंस, थ्रिलर.  २ तास ५ मिनिटे. [A]

दिग्दर्शक : - प्रताप विठ्ठलराव सोनाळे

कलाकार : - गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे

"गारुड" चित्रपट समीक्षा

माणूस आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जगत असतो किंवा माणूस स्वप्नांच्या पलीकडे जाऊन आयुष्य जगण्यासाठी कारण शोधत असतो. ही गोष्ट अशा जगण्याच्या प्रवासाची आहे.

पूर्ण लेख  वाचण्यासाठी "जगभरून फिल्म्स" ( Jugbharun Films ) या बटनावर क्लिक करा

ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा