ऑगस्ट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

ऑगस्ट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

Written by Akanksha Kolte Oct 21, 2024 | 11:07 PM

Have you seen these Hindi movies that hit the screens in August 2024?

१. औरों में कहां दम था  (Auron Mein Kahan Dum Tha)

२०२४. ड्रामा, रोमँटिक. गुन्हेगारी.  २ तास २५ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - नीरज पांडे

कलाकार : - अजय देवगन, तब्बू, शांतनु महेश्वरी, सई मांजरेकर, जिमी शेरगिल,हार्दिक सोनी, सयाजी शिंदे

"औरों में कहां दम था" चित्रपट समीक्षा

या चित्रपटाच्या कथेतच फारसा दम नसल्याने प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरवली. नीरज पांडे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे.

२. उलझ  (Ulajh)

२०२४. ड्रामा, थ्रिलर.  २ तास ८ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - सुधांशु सरिया

कलाकार : - जान्हवी कपूर, गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, मेयांग चांग, राजेश तेलंग, आदिल हुसैन, जितेंद्र जोशी

"उलझ" चित्रपट समीक्षा

कथा चांगली होती, विषय थोडा वेगळा आणि नवीन होता परंतु सामान्य पटकथे मुळे चित्रपट तेवढा प्रभावी झाला नाही.

३. आलिया बासू गायब हैं (Aliya Basu Gayab Hai)

२०२४. गुन्हेगारी, थ्रिलर. सस्पेंस.  १ तास ४३ मिनिटे. [A]

दिग्दर्शक : - प्रिती सिंग

कलाकार : - विनय पाठक, राइमा सेन, सलीम दीवान

"आलिया बासू गायब हैं" चित्रपट समीक्षा

कथा किंवा विषय नवीन नसला तरीही चित्रपटाची मांडणी थोडी वेगळी आहे असं म्हणता येईल. परंतु चित्रपटातून मनोरंजन मात्र गायब आहे.

४. फिर आयी हसीन दिलरुबा  (Phir Aayi Hasseen Dillruba)

२०२४. गुन्हेगारी, थ्रिलर.  २ तास १२ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - जयप्रद देसाई

कलाकार : - तापसी पन्नू, विक्रांत मैसी, सनी कौशल, जिमी शेरगिल, आदित्य श्रीवास्तव.

"फिर आयी हसीन दिलरुबा" चित्रपट समीक्षा

जयप्रद देसाई यांचं दिग्दर्शन चांगलं आहे. शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी होतो. काही ठिकाणी चित्रपटाची पकड सैल होते.

५. घुड़चढ़ी  (Ghudchadi)

२०२४. परिवार.  १ तास ५३ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - बिनॉय के गांधी

कलाकार : - संजय दत्त, रवीना टंडन, खुशाली कुमार, पार्थ समथान, अरुणा ईरानी

"घुड़चढ़ी" चित्रपट समीक्षा

चित्रपटाची कथा पटकथा विषय सगळंच सुमार आहे. या चित्रपटात जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी बऱ्याच वर्षांनी पुनरागमन केलं आहे.

६. घुसपैठिया (Ghuspaithiya)

२०२४. ड्रामा, थ्रिलर. गुन्हेगारी.  २ तास १२ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - सुसी गणेशन

कलाकार : - उर्वशी रौतेला, विनीत कुमार, अक्षय ओबेरॉय

"घुसपैठिया " चित्रपट समीक्षा

चित्रपटाची कथा पटकथा संवाद यातलं काही विशेष खास नाही. अभिनयाबद्दल न बोललेलं बरं. एकंदर ठिकठाक चित्रपट आहे.

७. खेल खेल में  (Khel Khel Mein)

२०२४. ड्रामा, कॉमेडी.  २ तास १४ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - मुदस्सर अजीज

कलाकार : - अक्षय कुमार,तापसी पन्नू,वाणी कपूर,फरदीन खान,एमी विर्क,प्रज्ञा जायसवाल,आदित्य सील

"खेल खेल में" चित्रपट समीक्षा

याआधी या मुळ इटालियन चित्रपटाचे एकुण २७ रिमेक बनवण्यात आले आहेत.

८. वेदा  (Vedaa)

२०२४. ड्रामा, ॲक्शन.  २ तास ३१ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - निखिल आडवाणी

कलाकार : - शर्वरी वाघ,जॉन अब्राहम,अभिषेक बनर्जी,तमन्ना भाटिया,आशीष विद्यार्थी,कुमुद मिश्रा

"वेदा" चित्रपट समीक्षा

अभिनय शर्वरी चा म्हणावा लागेल. तीने ही भूमिका चांगली साकारली आहे. ॲक्शन सीन्स आवडत असतील तर हा चित्रपट तुम्हाला आवडेल.

९. स्त्री २  (Stree 2)

२०२४. कॉमेडी, हॉरर.  २ तास २९ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - अमर कौशिक

कलाकार : - श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना, अभिषेक बनर्जी, वरुण धवन, अक्षय कुमार

"स्त्री २" चित्रपट समीक्षा

वेगळं काहीतरी धमाल विनोदी हसवणारा आणि त्याच वेळी घाबरवणारा चित्रपट बघायचा असेल तर हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.

१०. तिकडम  (Tikdam)

२०२४. ड्रामा.  १ तास ५७ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - विवेक आंचलिया

कलाकार : - अमित सियाल,सोनम अरोड़ा, दिव्यांशी दिवेदी

"तिकडम" चित्रपट समीक्षा

ग्लोबल वॉर्मिग, झाडांचं महत्त्व, पाण्याचं महत्त्व अशा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य करणारा आणि खास करून लहान मुलांनी बघावा असा हा चित्रपट आहे.

११. अ वेडींग स्टोरी  (A Wedding Story)

२०२४. हॉरर, थ्रिलर.  १ तास ५० मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - अभिनव पारीक

कलाकार : - वैभव तत्वावादी, मुक्ति मोहन, लक्षवीर सिंह सरन, मोनिका चौधरी, प्रतीक पचौरी, अक्षय आनंद

"अ वेडींग स्टोरी" चित्रप

चित्रपटाची मांडणी ठिक आहे परंतु पटकथा भरकटलेली असल्यामुळे चित्रपट खिळवून ठेवण्यात तेवढा यशस्वी होत नाही. 

१२. पड़ गए पंगे  (Pad Gaye Pange)

२०२४. कॉमेडी.  १ तास ५८ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - संतोष कुमार

कलाकार : - समर्पण सिंह, राजेश शर्मा, राजपाल यादव, फैसल मलिक

"पड़ गए पंगे" चित्रपट समीक्षा

चित्रपटाचा विषय चांगला असला तरी कथा, पटकथा अजून सक्षम असायला हवी होती. एक हलकाफुलका विनोदी चित्रपट म्हणून एकदा बघायला हरकत नाही.

पूर्ण लेख  वाचण्यासाठी "जगभरून फिल्म्स" ( Jugbharun Films ) या बटनावर क्लिक करा

ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी