ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

Written by Akanksha Kolte Dec 01, 2024 | 08:51 PM

Have you seen these Hindi movies that hit the screens in October 2024?

१. सीटीआरएल  (CTRL)

२०२४. सायबर थ्रिलर, नाटक.  १ तास ३९ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - विक्रमादित्य मोटवानी

कलाकार : - अनन्या पांडे, विहान समत, देविका वत्स कामाक्षी भट, अपारशक्ति खुराना

"सीटीआरएल" चित्रपट समीक्षा

सोशल मीडियामुळे आपण आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टींचा सुद्धा कंट्रोल कोणाच्या हाती देतोय आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात काय वादळ येऊ शकतं हे सांगणारा हा चित्रपट आहे.

२. अमर प्रेम की अमर कहानी  (Amar Prem Ki Prem Kahani)

२०२४. नाटक, विनोदी, रोमान्स.  १ तास ५७ मिनिटे.  [U/A]

दिग्दर्शक : - हार्दिक गज्जर

कलाकार : - सनी सिंह,आदित्य सील, प्रनूतन बहल निर्माता : ज्योती देशपांडे, पार्थ गज्जर, पुनम श्रॉफ

"अमर प्रेम की अमर कहानी" चित्रपट समीक्षा

कथा चांगली होती, विषय थोडा वेगळा आणि नवीन होता परंतु सामान्य पटकथे मुळे चित्रपट तेवढा प्रभावी झाला नाही.

३. द सिग्नेचर  (The Signature)

२०२४. नाटक, परिवार,  १ तास ३६ मिनिटे. [U]

दिग्दर्शक : - गजेंद्र अहिरे

कलाकार : - अनुपम खेर , अन्नू कपूर , महिमा चौधरी , मनोज जोशी , स्नेहा पॉल , केविन गांधी , रणवीर शौरी

"आलिया बासू गायब हैं" चित्रपट समीक्षा

आयुष्याच्या उतारवयात मात्र मुलं जेव्हा त्यांच्यासाठी उभी राहत नाहीत तेव्हा आई वडिलांना काय वाटतं किंवा त्यांची परिस्थिती काय असते हे या चित्रपटात पहायला मिळतं.

४. जिगरा  (Jigra)

२०२४. ॲक्शन, थ्रिलर, ड्रामा.  २ तास ३५ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - वासन बाला

कलाकार : - आलिया भट्ट, वेदांग रैना, मनोज पाहवा, राहुल रवींद्रन, हर्ष ए सिंह

"जिगरा" चित्रपट समीक्षा

आपल्या छोट्या भावाला वाचविण्यासाठी एका जिगरबाज बहीणीचा संघर्ष म्हणजे जिगरा चित्रपट.

५. विकी विद्या का वो वाला व्हिडिओ  (Vicky Vidya Ka Woh Wala)

२०२४. विनोदी, ड्रामा.  २ तास ३२ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - राज शांडिल्य

कलाकार : - राजकुमार राव, तृप्ति डिमरी,विजय राज , मल्लिका शेरावत, अर्चना पूरण सिंह, मुकेश तिवारी, टीकू तलसानिया, 

"विकी विद्या का वो वाला व्हिडिओ" चित्रपट समीक्षा

राज शांडिल्य यांनी १९९७ च्या काळात घडणारी ही कथा लिहिली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे.

६. आयुष्मति गीता मॅट्रिक पास (Aayushmati Geeta Matric Pass)

२०२४. विनोदी, ड्रामा, सोशल.  २ तास १९ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - प्रदीप खैरवार

कलाकार : - कशिका कपूर ,अनुज सैनी, अतुल श्रीवास्तव,अलका अमीन,प्रणय दीक्षित

"आयुष्मति गीता मॅट्रिक पास" चित्रपट समीक्षा

महिला सक्षमीकरण आणि महीलांचं शिक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारीत या चित्रपटाची कथा लिहिली आहे.

७. दो पत्ती  (Do Patti)

२०२४. थ्रिलर, गुन्हेगारी, रहस्य, ड्रामा.  २ तास ६ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - शशांक चतुर्वेदी

कलाकार : - काजोल, कृति सेनन, तनवी आजमी, शाहीर शेख, बृजेंद्र काला, प्राची शाह पांड्या, चितरंजन त्रिपाठी, विवेक मुश्रान

"दो पत्ती" चित्रपट समीक्षा

दोन जुळ्या बहींणींमधील दुश्मनी, द्वेष आणि बदला, सुड अशा सगळ्यांचं मिश्रण या कथेत आहे.

८. बंदा सिंग चौधरी  (Bandaa Singh Chaudhar)

२०२४. ॲक्शन, ड्रामा.  १ तास ५३ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - अभिषेक सक्सेना

कलाकार : - अरशद वारसी, मेहेर विज, शिल्पी मारवाह, जीवेशु अहलूवालिया, अलिशा चोपड़ा, सचिन नेगी

"बंदा सिंग चौधरी" चित्रपट समीक्षा

१९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर बरेच परिणाम हिंदू, सिख लोकांना भोगावे लागले. याच धर्तीवर आधारित हा चित्रपट असून अभिषेक सक्सेना यांनी दिग्दर्शित केलेला आहे.

९. द मिरांडा ब्रदर्स (The Miranda Brothers)

२०२४. ॲक्शन, खेळ, थ्रिलर.  १ तास ३९ मिनिटे. [A]

दिग्दर्शक : - संजय गुप्ता

कलाकार : - हर्षवर्धन राणे,जेनीफर,राहुल देव, मिजान ज़ाफ़री,साहेर बाम्बा, मानसी रॉय

"द मिरांडा ब्रदर्स" चित्रपट समीक्षा

स्पोर्ट्स ड्रामा मध्ये नावापुरता स्पोर्ट्स आणि भरकटलेली कथा असा एकंदर चित्रपटाचा प्लॉट आहे.

१०. नवरस कथा कोलाज (Navras Katha Collage)

२०२४. ड्रामा, २ तास २३ मिनिटे. [A]

दिग्दर्शक : - प्रवीण हिंगोनिया

कलाकार : - प्रवीण हिंगोनिया, रेवती पिल्लयी, स्वर हिंगोनीया, दयानंद शेट्टी, राजेश शर्मा, अलका अमिन, अमरदिप झा

"नवरस कथा कोलाज" चित्रपट समीक्षा

नऊ कथांमधून नऊ रसांचं वर्णन केलेलं आहे. हास्य, करूण, श्रृंगार, वीर, अद्भुत, रौद्र, शांत, भयानक आणि विभत्स अशा नवरसांवर आधारित या नऊकथा आहेत.

पूर्ण लेख  वाचण्यासाठी "जगभरून फिल्म्स" ( Jugbharun Films ) या बटनावर क्लिक करा

ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी