जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by Akanksha Kolte Sept 07, 2024 | 04:14 PM

Have you seen these Marathi movies released in July 2024?

१. विषय हार्ड  (Vishay Hard)

२०२४. विनोदी, ड्रामा, रोमँटिक. १ तास ५३ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - सुमित पाटील

कलाकार : - सुमित पाटील, पर्ण पेठे, हसन शेख, विपिन बोराटे, नितीन कुलकर्णी, भुमी पाटील

“विषय हार्ड” चित्रपट समीक्षा

कोरोनाच्या काळात घडलेली एक धमाल प्रेमकहाणी उलगडली आहे दिग्दर्शक सुमित पाटील यांनी “विषय हार्ड” या चित्रपटातून.

२. आम्ही जरांगे  (Amhi Jarange)

२०२४. जीवनचरित्र, ड्रामा.  २ तास २४ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - योगेश भोसले

कलाकार : - मकरंद देशपांडे, सुबोध भावे, अजय पुरकर, प्रसाद ओक, भुषण पाटील, अमृता धोंगडे

“आम्ही जरांगे” चित्रपट समीक्षा

मराठा समाजाच्या हक्कांसाठी, न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील  यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट योगेश भोसले यांनी दिग्दर्शित केलेला  आहे.

३. बाई गं  (Bai Ga)

२०२४. विनोदी, परिवार, ड्रामा.  २ तास १४ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - पांडुरंग कृष्ण जाधव

कलाकार : - स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, अदिती सारंगधर, नेहा खान

“बाई गं” चित्रपट समीक्षा

मागील पाच जन्मातील पत्नींना या जन्मात आणून देव त्याला त्याची चूक सुधारण्याची संधी देतो आणि धनुषला त्या प्रत्येकाची इच्छा शोधून ती पूर्ण करण्याची शिक्षा देतो.

४. रांगडा  (Rangada)

२०२४. ॲक्शन, ड्रामा.  २ तास ४ मिनिटे.  [U/A]

दिग्दर्शक : - आयुब हवालदार

कलाकार : - आयुब हवालदार

“रांगडा” चित्रपट समीक्षा

आयुब हवालदार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट याच कुस्ती आणि बैलगाडी  शर्यत यावर आधारित आहे.

५. यारी  (Yaari)

२०२४. विनोदी, ड्रामा, रोमँटिक.  २ तास २४ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - चेतन सागडे

कलाकार : - पवन चौरे, अरबाज शेख, अपेक्षा चव्हाण, सुनील गोडबोले

“यारी” चित्रपट समीक्षा

चित्रपटाची कथा दोन मित्रांची आणि त्यांच्या प्रेमाची आहे. थोडीफार कॉमेडी,  थोडेफार ॲक्शन सीन्स आणि रोमान्स असं सगळं दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक  चेतन सागडे यांनी केला आहे.

६. डंका हरी नामाचा  (Danka Hari Namacha)

२०२४. भक्तिमय, ड्रामा.  २ तास १६ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - श्रेयस जाधव

कलाकार : - अनिकेत विश्वासराव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, प्रियदर्शन जाधव, रसिका

“डंका हरी नामाचा” चित्रपट समीक्षा

नावावरून लक्षात आलं असेल की हा चित्रपट आपल्या विठू माउलीवर आधारित आहे. श्रेयस जाधव यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन केलेलं आहे.

७. एक दोन तीन चार (Ek Don Teen Chaar)

२०२४. विनोदी, ड्रामा, परिवार.  २ तास ८ मिनिटे.  [U/A]

दिग्दर्शक : - वरुण नार्वेकर

कलाकार : -  निपुण धर्माधिकारी, वैदेही परशुरामी, हृषीकेश जोशी, शैला काणेकर, मृणाल कुलकर्णी, करण सोनावणे

“एक दोन तीन चार” चित्रपट समीक्षा

फार मसाला नसलेला, भांडणं द्वेष मारामारी कपट कारस्थान असं काही नसलेला  साधा सरळ चित्रपट तुम्हाला आवडत असेल तर एक दोन तीन चार हा चित्रपट  तुमच्यासाठी आहे.

८. घरत गणपती  (Gharat Ganpati)

२०२४. विनोदी. ड्रामा, परिवार. २ तास १९ मिनिटे. [U]

दिग्दर्शक : - नवज्योत बांदिवडेकर

कलाकार : -  शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुंभांगी गोखले. भूषण प्रधान, निकिता दत्ता, शुभांगी लाटकर, संजय मोने

“घरत गणपती” चित्रपट समीक्षा

एक कोकणातील १२४ वर्षांची परंपरा जपणारं घरत कुटुंब आणि त्यांच्या घरातील गणेशोत्सव यावर हा चित्रपट आधारित आहे.

९. गुगल आई  (Google Aai)

२०२४. ड्रामा, थ्रिलर.  २ तास ९ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - गोविंद वराह

कलाकार : - प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर

“गुगल आई” चित्रपट समीक्षा

गुगल आई हा चित्रपट नावाप्रमाणेच टेक्नॉलॉजी चा वापर करून संकटावर मात कशी करता येईल हे सांगणारा आहे.

पूर्ण लेख  वाचण्यासाठी "जगभरून फिल्म्स" ( Jugbharun Films ) या बटनावर क्लिक करा

जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी