२०१४ . (यू) . कालावधी : - १ तास ३० मिनिटे
दिग्दर्शक : - परेश मोकाशी
लेखक : - मधुगंधा कुलकर्णी
कलाकार : - श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, नंदिता धुरी
समीक्षा
विज्ञान आणि श्रद्धा यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटात बहीण भावाच्ं गोड नातं पाहायला मिळतं. अत्यंत गरिबीत वाढणारी मुक्ता(सायली बांदाकवठेकर) आणि ज्ञानेश(श्रीरंग महाजन) ही भावंडं आपल्या आईला मदत करण्यासाठी काय काय करतात. त्यांचे हे गोड प्रयत्न बघताना खूप भावूक व्हायला होतं. पंढरपूर मधील वातावरण घरबसल्या अनुभवायला मिळतं.
२०१९ . (यू) . कालावधी : - १ तास ४६ मिनिटे
दिग्दर्शक : - संजय जाधव
लेखक : - संकेत माने
कलाकार : - संजय नार्वेकर, सुशांत शेलार, अस्मिता आजगांवकर
समीक्षा
संजय जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. आपल्या दृष्टीहीन छोट्या बहीणीची , खारीची(वेदश्री खाडिलकर) सारी स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास असलेला तिचा भाऊ बिस्कीट(अथर्व कदम) तिच्यासाठी नक्की नक्की काय काय करतो हे बघताना आपसूकच आपले डोळे पाणावतात. अथर्व आणि वेदश्री चा अभिनय बघून नक्कीच त्यांच्या प्रेमात पडाल. "झी 5" वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला ५✰ पैकी ३.५✰ रेटिंग देईन.
२०२२ . (यू) . कालावधी : - २ तास २ मिनिटे
दिग्दर्शक : - प्रताप फड
लेखक : - प्रताप फड
कलाकार : - हृता दुर्गुळे, अमेय वाघ, चेतन चिटणीस
समीक्षा
हा चित्रपट बघताना तुम्हाला जाणवेल की आपल्या बहिणीला/ भावाला त्यांच्या पडत्या काळात, अडचणीच्या काळात आपल्या आधाराची किती गरज असते. धनंजय देशमुख ( सुव्रत जोशी ) हा अनन्या च्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे . एकंदरच आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा आपली भावंड, कुटुंब यांचा आधार सगळ्यात जास्त महत्वाचा हे
१९९१ . (यू) . कालावधी : - २ तास १९ मिनिटे
दिग्दर्शक : - विजय कोंडके
लेखक : - अण्णासाहेब देऊळगावंकर
कलाकार : - रमेश भाटकर अलका कुबल, विजय चव्हाण, अजिंक्य देव
समीक्षा
भाऊ बहीणीच्या नात्याविषयी चित्रपट म्हटलं की माहेरची साडी हे नाव सगळ्यात आधी आठवत. या चित्रपटा शिवाय ही यादी अपूर्ण राहील. या चित्रपटात अलका कुबल आणि अजिंक्य देव यांनी बहिण भावाच्ं नातं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. . हा चित्रपट बघताना मोठी माणसं, तेव्हाचा काळ अनुभवलेल्या स्त्रिया आजही तेवढंच रडतात. हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य.
२०१४ . (यू) . कालावधी : - २ तास १० मिनिटे
दिग्दर्शक : - सचिन कुंडलकर
लेखक : - सचिन कुंडलकर
कलाकार : - अतुल कुलकर्णी, प्रिया बापट कृतिका देव
समीक्षा
प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी यांची जबरदस्त केमिस्ट्री असलेली भावा बहिणीची जोडी या चित्रपटात पाहायला मिळते. मृत्यु नंतर सुद्धा बहीण भावाचं किती घट्ट असतं ते या सिनेमात दाखवण्यात आले आहे. . अवखळ, अल्लड अशी प्रिया बापट आणि तेवढाच जबाबदारचं ओझं पेललेला भाऊ अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटात अतिशय सुंदर अभिनय केला आहे.