२०१० . (यू) . कालावधी : - २ तास ५ मिनिटे
दिग्दर्शक : - प्रियदर्शन
लेखक : - मनीषा कोरडे (स्क्रीनप्ले)
कलाकार : - अतुल कुलकर्णी, रितुपर्ण सेनगुप्ता, दर्शील सफारी
समीक्षा
२०१० साली प्रदर्शित झालेला हा हिंदी सिनेमा भाऊ बहीणीच्या गोड नात्यातील समंजसपणा ठळकपणे दर्शवतो. आपल्या वडिलांना कळू न देता काही दिवस ते दोघं बहीण भाऊ चप्पलचा एकच जोड दोघांत मिळून कसा वापरतात आणि आपल्या चिमुकल्या बहीणीला नवीन चप्पल घेऊन देण्यासाठी हा छोटासा भाऊ काय करतो ते अतिशय सुंदररीत्या आणि हळुवारपणे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
२०१६ . (यू / ए) . कालावधी : - २h ११m
दिग्दर्शक : - उमंग कुमार
लेखक : - उत्कर्षिणी वशिष्ठा, राजेश बेरी
कलाकार : - ऐश्वर्या राय बच्चन, रणदीप हुडा, रिचा चड्डा
समीक्षा
सरबजीत हा एक हिंदी चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. ऐश्वर्या राय आणि रणदीप हुडा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका खऱ्या कहाणीवर बनवण्यात आलेला आहे. सरबजीत सिंग हा भारतीय चुकून एकदा दारुच्या नशेत भारत पाकिस्तान ची सीमा ओलांडून पाकिस्तान मध्ये जातो आणि पाकिस्तानी सैन्याकडून पकडलि जातो आणि मग पुढे दलबिर ही त्याची बहीण त्याला सोडवण्यासाठी काय प्रयत्न करते.
१९९९ . (यू) . कालावधी : - २ तास ५७ मिनिटे
दिग्दर्शक : - सुरज बर्जत्या
लेखक : - सुरज बर्जत्या (संवाद
कलाकार : - सलमान खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर, मोहनीश बहाल, तब्बू, सोनाली बेंद्रे
समीक्षा
कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित हा सिनेमा बघताना कधीच कंटाळा येत नाही. सलमान खान, सैफ अली खान, मोहनीश बहल हे तीन भाऊ आणि एकुलती एक लाडकी बहिण निलिम कोठारी यांच्या नात्यांची सुंदर गुंफण या चित्रपटात दाखवली आहे. . बहीणीवर संकट आल्यावर सगळे भाऊ मिळून कसे पाठीशी उभे राहतात हे या चित्रपटात पाहायला मिळतं.
२००५ . (यू) . कालावधी : - २ तास १२ मिनिटे
दिग्दर्शक : - नागेश कुकुनू
लेखक : - नागेश कुकुनूर, विपूल के नायर
कलाकार : - शेयर्स तळपदे, नसरूडदीन शाह, प्रतीक्षा लोणकर
समीक्षा
मुकबधीर असलेल्या आपल्या भावाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहचवण्यासाठी त्याची बहीण त्याला कशाप्रकारे प्रोत्साहन देते ते या सिनेमात दाखवण्यात आले आहे. . श्रेयस तळपदे याची प्रमुख भूमिका असून श्वेता प्रसाद बासू त्याची छोटी बहीण दाखविली आहे.
२०05 . (यू) . कालावधी : - २ तास १२ मिनिटे
दिग्दर्शक : - राकेश मेहरा
लेखक : - प्रसून जोशी
कलाकार : - फरहान अख्तर, दिव्या दत्ता, जपतेज सिंग. फरहान अख्तर, दिव्या दत्ता, जपतेज सिंग
समीक्षा
प्भारतीय धावपटू व पद्मश्री पुरस्कार विजेता मिल्खा सिंग ह्याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. . फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांच्या भुमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. तर दिव्या दत्ता हीने नेहमीप्रमाणे शांत, समंजस आणि भावावर मनापासून प्रेम करणारी, त्याची काळजी करणारी बहीणीची भुमिका सुंदर केली आहे.
२०१5 . (यू/ए). कालावधी : - २h ५०m
दिग्दर्शक : - झोया अख्तर
लेखक : - झोया अख्तर, रीमा कागटी, जावेद
कलाकार : - फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा जोनस, अनिल कपूर
समीक्षा
रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा हे दोघं भाऊ बहीणीच्या भुमिकेत आहेत. ज्यांच्या नात्याचा बंध अतिशय घट्ट पण तेवढाच साधा सहज दाखविण्यात आला आहे.. . क्रूझ वरील प्रवास आणि त्या दरम्यान नात्यातील वीण, चढ उतार सगळंच सगळ्यांना अनुभवायला मिळतं. प्रवासादरम्यान आयुष्यातील एक नवीन धडा घेऊन प्रत्येक जण बाहेर पडतो.