अवतार : द वे ऑफ वाटर | २०२२ मधील जगातील सर्वात महागडा चित्रपट
Written by : के. बी.
Updated : डिसेंबर 25, 2022 | 11:31 PM
अवतार : द वे ऑफ वाटर |
लेखक | जेम्स कॅमेरून |
दिग्दर्शक | जेम्स कॅमेरून, रिफ जाफा, आमंडा सिल्व्हर, जोश फ्रिडमन, शेन सालेर्नो |
कलाकार | सॅम वर्थिंगटन, जोय सल्डाना, केट विन्सलेट, सिगॉर्नी विवर, स्टीफन लँग, ब्रिटिन डाल्टन |
निर्माता | जेम्स कॅमेरून, जोन लँडौ |
संगीत | सायमन फ्रँग्लेन |
प्रदर्शित तारीख | १६ डिसेंबर २०२२ |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
नेयटिरी आणि जेक सुली आपल्या परिवारासोबत पँडोरा मध्ये हसत खेळत राहत आहेत. मेलेला क्वारीच याची स्मृती अवतार मध्ये उपलोड करतात. क्वारीच जेक ला मारण्यासाठी पांडोरो ग्रहावर पुन्हा एकदा आक्रमण करतो.
“अवतार : द वे ऑफ वाटर” चित्रपट समीक्षा :-
जेम्स कॅमेरून यांनी बनवलेला १९९७ सालचा टायटॅनिक” चित्रपट सर्वांनीच बघितला आहे. या चित्रपटाला ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट हाच होता. नंतर जेम्स कॅमेरून यांनी १८ डिसेंबर २००९ ला “अवतार” चित्रपट प्रदर्शित केला. आपण कल्पना नाही करू शकत असा हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला. सर्वात जास्त पैसे कमावणारा चित्रपट ठरला. टायटॅनिक चा रेकॉर्ड मोडीत काढाला. बऱ्याच वर्षांनी “अव्हेंजर्स : एन्डगेम” चित्रपटाने “अवतार” चा रेकॉर्ड तोडला पण त्यासाठी त्यांना दुसऱ्यांदा चित्रपट प्रदर्शित करावा लागला. आता जेम्स कॅमेरून आपल्याला अवतार चा सिक्वेल “अवतार : द वे ऑफ वाटर” नावाचा चित्रपट घेऊन आलेत.
चित्रपट पाहिला असे वाटले नाही कि मी एक ऍनिमेशन फिल्म बगतोय. सर्व काही हुबेहूब दिसणारे ते एलिअन्स. त्यांचे राहणीमान. तेथील जमीन, त्यांची रूपरेषा, वेशभूषा, बघून असे थक्क व्हायला लागते. अशा प्रकारचे हि एलिअन्स असू शकतात हे आपल्याला खरे वाटते. दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी निर्माण केलेले हे अवतार चे पाहायला मोहून टाकते. आपण विचार पण करू शकत अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. उत्तम दिग्दर्शन, उत्तम नियोजन, पाण्यामधील प्रत्येक हालचालीचे योग्य रीतीने पिक्चर कॅप्चर करणारे नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन केले. त्यामुळे पाण्याखालील होणारे पात्रांचे अभिनय अचूक कॅप्चर होऊ लागले. सर्व अडचणीना मात देत “अवतार : द वे ऑफ वाटर” हा चित्रपट निर्माण केला.
जेक सुलि ची भूमिका सॅम वर्थिंगटन आणि जोय सल्डाना यांनी उत्तम भूमिका केल्या. टायटॅनिक ची नायिका केट विन्सलेट “रोनाल” ची भूमिका केली आहे. क्वारीच (खलनायक) ची भूमिका स्टीफन लँग यांनी केली. पहिल्या भागात क्वारीच पात्र खूप भयानक होते. पण या भागात तसे भयानक वाटले नाही.
परिवार महत्वाचा आहे. परिवाराला वाचवण्यासाठी स्वतः चा जीव धोक्यात टाकून परिवाराला वाचवने पहिले ध्येय. जेक आपल्या परिवाराला वाचव्यासाठी प्रयत्न करतोय. परिवाराचे डायलॉग सुद्धा ऐकायला बरे वाटताट. ते पाहून एक परिवारा संबधी भावना मनात घर करून बसतात. स्टोरी तशी साधी सोपी आहे. प्रत्येक सीन वेगवेगळा आहे, महाकाय मासे असतील, विचित्र असे जलचर प्राणी, पाण्याखालील जग अगदी आपण जवळून बघतोय असे वाटते. त्यामुळे कंटाळा येत नाही. व्हिजुअल इफेक्ट, मोशन कॅप्चर इतकं सुंदर बनवले आहे त्या जगात आपण फिरत आहे वाटते. जेम्स कॅमेरून यांच्या चित्रपटांची हीच जादू आहे. जी हुबेहूब दिसते. क्लायमेक्स चा जो सीन आहे, क्वारीच चे जहाज पाण्यात हळू हळू बुडत आहे. ते पाहून टायटॅनिक चे आठवण आल्यावर शिवाय राहणार नाही. क्वारीच अजून जिवंत आहे त्यामुळे पुढील भाग पाहण्याची उत्सुकता आहे.
“अवतार : द वे ऑफ वाटर” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये बघू शकता.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ४.३ स्टार देईन.
तुम्ही “अवतार : द वे ऑफ वाटर” चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.