HomeEnglishFilms

अवतार: फायर अँड ॲश (२०२५) रिव्यू | आग, दुःख आणि एक नवीन पँडोरा युद्ध दिग्दर्शित जेम्स कॅमेरॉन

Avatar: Fire and Ash (2025) Review | Fire, Sorrow, and a New Pandora War Directed by James Cameron

Written by : के. बी.

Updated : डिसेंबर 19, 2025 | 01:14 PM

जेम्स कॅमेरून यांनी बनवलेला १९९७ सालचा टायटॅनिक” चित्रपट सर्वांनीच बघितला आहे. या चित्रपटाला ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट हाच होता. आपण अशी कल्पना हि करू शकता नाही असे चित्र आपल्या डोळ्यासमोर पाहत असतो. त्या कलाकृती मध्ये विलीन होवून जातो असा हा “अवतार” चा चित्रपट जेम्स कॅमेरॉन यांनी दिग्दर्शित केला आहे. “अवतार” चा पहिला चित्रपट १८ डिसेंबर २००९ ला रीलीज झाला होता. आणि तो प्रचंड गाजला होता या चित्रपटाने जगात कमाई चे सर्व रोकॉर्ड मोडले. आणि सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. दुसऱ्या चित्रपटासाठी पाण्यातील सीन शूट करण्यासाठी त्याप्रकारचे कॅमेरा तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने तब्ब्ल १०, १२ वर्षांनी जेम्स यांनी अवतार चा दुसरा भाग अवतार: द वे ऑफ वॉटर १६ डिसेंबर २०२२ ला रिलीज केला. २०२२ मधील जगातील सर्वात महागडा चित्रपट होता. याही चित्रपटाने जास्त कमाई केली. आणि आता जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार फ्रेंचायजी चा तिसरा चित्रपट “अवतार: फायर अँड अ‍ॅश” जगभरातील चित्रपट गृहांमध्ये १९ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉन यांनी अवतार चित्रपटाचे प्रत्येक ३ पार्ट डिसेंबर महिण्यात रिलीज केलेले आहेत. हे आपल्याला दिसून येते. तिसरा भाग कसा आहे ते सविस्तर वाचा.

Avatar: Fire and Ash (2025) Review | Fire, Sorrow, and a New Pandora War Directed by James Cameron
अवतार: फायर अँड ॲश
२०२२, ॲक्शन, साहसी, विज्ञान कथा, कल्पनारम्य. २ तास १२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकजेम्स कॅमेरून, रिक जाफा, अमांडा सिल्व्हर, जोश फ्रीडमन, शेन सालेर्नो
दिग्दर्शकजेम्स कॅमेरून, रिफ जाफा, आमंडा सिल्व्हर, जोश फ्रिडमन, शेन सालेर्नो
कलाकारसॅम वर्थिंगटन, जोय सल्डाना, केट विन्सलेट, सिगॉर्नी विवर, स्टीफन लँग
निर्माताजेम्स कॅमेरून, जोन लँडौ
संगीतसायमन फ्रँग्लेन
उत्पादन कंपनीLightstorm मनोरंजन
वितरित20th Century स्टुडिओ
प्रदर्शित तारीख१९ डिसेंबर २०२५
भाषाइंग्लिश
देशयुनाइटेड स्टेट
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ४.२⭐/ ५

कथा :- 

नेयटिरी आणि जेक सुली आपल्या परिवाराला वाचवन्याचे संघर्ष.

अवतार: फायर अँड ॲश” चित्रपट समीक्षा :-

          यावेळी स्टोरी पुन्हा एकदा गॉडशी निगडित आहे. या स्टोरीत रिलेशनचे जाळे निर्माण केलेले दिसून येते. नेहमी प्रमाणे जेम्स "अवतार" ची स्टोरी सिम्पल प्रमाणे असली स्टोरी आहे आणि अशी स्टोरी कोणीही समजू शकेल. जास्त काही डोकं लावावे लागत नाही, जसे कि ख्रिस्टोफर नोलन च्या चित्रपटांसारखे डोकं लावावे लागतं.  याचे मला जेम्स दिग्दर्शकाचे कौतुक वाटते. स्टोरी आणि दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉन यांनीच केले आहे. 
           चित्रपट पाहिला असे वाटले नाही कि मी एक ऍनिमेशन फिल्म बगतोय. सर्व काही हुबेहूब दिसणारे ते एलिअन्स. त्यांचे राहणीमान. तेथील जमीन, त्यांची रूपरेषा, वेशभूषा, बघून असे थक्क व्हायला लागते. अशा प्रकारचे हि एलिअन्स असू शकतात, हे आपल्याला खरे वाटते. दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी निर्माण केलेले हे अवतार चित्रपटाचे जग पाहायला आपण मोहून जातो. आपण विचार पण करू शकत अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. उत्तम दिग्दर्शन, उत्तम नियोजन, आगीचे रूपांतर, पाण्यामधील प्रत्येक हालचालीचे योग्य रीतीने कॅप्चर केलेले पिक्चर दिसते.

चित्रपटाला सुरुवात होते भव्य दिव्य नजाराने होते. जालावरच्या जहाजाचे रूप आपण एका हवाई जहाजावर बघतो तेव्हा ते खूप रमणीय वाटते. एक विशिष्ट प्रकारच्या पेशी हवाई जहाज वाहत नेत असतात ते पाहून थक्क व्हायला होतं. एकमेकांचा बचाव करत असताना जंगलमय वातावरण होते. इंटरवल लगेच आला असा वाटतो. कारण त्यातील दृश्य आपल्याला चांगले दिसणारे वाटतात. ते पाहल्यावर माणूस एका वेगळ्या जगात बसल्या सारखे भासते. असा चित्रपट ३डी मध्ये बघण्याचा अनुभव चांगला वाटत जातो. काही ठिकणी फिल्म ताणलेला वाटत असतो पण ते भावनिक दृष्ट्या योग्य सीन ठेवणे गरज असू शकते यासाठी दिग्दर्शकाने ते सीन जास्त काळ ठेवले असावे. तरीपण आपण कुठे बोरिंग होणार नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. जसे कि शोले मधून वीरू ला कैद केलेले असते आणि त्याला सोडण्यासाठी बसंती नाचत असती, तसे अवतार ३ मध्ये जेक ला वाचवण्यासाठी नेयटेरी नाचत नाही तर सर्व तोडफोड करून सर्वाना नाचवते, पळवते कशी ते बघण्यासारखे वाटते. अखेर च्या क्षणात जलस्वारी, वायूस्वारी लढाई पाहण्यात दंग व्हायला होते. अशी ॲक्शन पाहायला मजा येते. पण या तीन भागाची एंडिंग ची लढाई पहिल्या, दुसऱ्या भागासारखीच सेम लढाई दर्शवते असे फील होतं.

या मध्ये काहीही बृटल कृती नाही आहे, यात कोणताही इंटिमेन्ट सीन नाहीत, त्यामुळे तुम्ही हा चित्रपट परिवारासोबत बघू शकता. शेवट चित्रपट संपल्यावर थांबण्याची गरज नाही कारण पोस्ट क्रेडीट सीन नाही आहे. पण तुम्ही “अवतार” चित्रपटाचे भाग १ आणि भाग २ बघणे गरजेचे आहे. ज्यामुळे अवतार तिसऱ्या भागातील पात्रे समजून येतील नाहीतर कोणते पात्रे कोणाशी निगडीत आहे हे सगळे डोक्यावरून जाऊ शकते आणि स्टोरी काही समजून येणार नाही. पण तरीपण जे दिसतंय ते बेस्ट व्हिज्यूयल ईफेक्ट असल्याने पाहण्याची मजा वेगळीच आहे.

दिग्दर्शन:
जेम्स कॅमेरॉनची दूरदृष्टी आणि संकल्पना अतुलनीय आहे. यात नवीन जमातींनी समावेश केला आहे. नवनवीन संकप्लना निर्माण केल्या आहेत. अवतार चित्रपटाच्या आदींच्या भागा नुसार तिसऱ्या भागात सुद्धा भावनात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. चित्रपट पाहिल्यावर त्यांचे ते उत्कृष्ट दर्जाचे काम दिसून येते. म्हणूनच ते एक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत.

कास्टिंग सादरीकरणे:
जेक सुलि ची भूमिका सॅम वर्थिंगटन आणि जोय सल्डाना यांनी उत्तम भूमिका केल्या. टायटॅनिक ची नायिका केट विन्सलेट “रोनाल” ची भूमिका आणि क्लिफ कर्टिस यांनी सहाय्यक भूमिका केली आहे. क्वारीच (खलनायक) ची भूमिका स्टीफन लँग यांनी केली. पहिल्या भागात क्वारीच पात्र खूप भयानक होते. पण सध्याचे तिसऱ्या भागात तेव्हढे भयानक दिसून आले नाही. यात काही डायलॉग हास्यस्पद होते, आणि ते प्रेक्षकांना पसंत सुद्धा आले. सिगॉर्नी वीव्हरच्या अभिनयाला सुद्धा पसंत करण्यात आले आहे.

संगीत:
सायमन फ्रँगलेन यांनी संगीत दिले आहे. या संगीतात आदिवासी जमातीचा संगीताचा आवाज आणि भव्य ऑर्केस्ट्राचे सूर यांचा मिलाफ साधला आहे. पार्श्वसंगीत ठीक म्हणायला काहीही हरकत नाही.

टेक्निकल:
व्ही. एफ. एक्स. अप्रतिम आहेत कि, वेगळे प्राणी, पक्षी, निसर्ग, तंत्रज्ञान, स्पेस, ज्वालामुखी प्रदेश, अग्निमय लढाया मधील युद्धकला आपण जे काही बघत आहे ते जणू काही सत्यात आहेत. ते समोरच आहेत असे भासतात. प्रत्येक सीन एक सत्याचा भास करून देतो. प्रत्येक सीन बघण्यास मजा येते. बघतच राहावे असे वाटते. कॅमेऱ्याचे काम आणि सेटची रचना उत्तम करण्यात आले आहे.

अंतिम निकाल:
कोणी पाहावा: जेम्स कॅमेरॉनच्या भव्यदिव्य निर्माण आणि अत्याधुनिक व्हीएफएक्सचे चाहते असाल आणि साय-फायच्या भव्यतेमध्ये मांडलेल्या कृतीचा अनुभव घेऊ इच्छिणारे प्रेक्षक नक्की पाहू शकतील. आयमॅक्स आणि थ्रीडीचे शौकीन वाले तुमच्या साठी एक मेजवानी आहे.
कोण पाहू शकत नाही : जे पूर्णपणे नवीन कथानकाची अपेक्षा करत आहेत ज्यांना एक नवीन असलेली कथा हवी आहे त्यांना फारसा काही आवडणार नाही. लांब कालावधीच्या चित्रपट पाहू शकत नाही.

विशेष माहिती:
अवतार चित्रपटाचे पुढील पार्ट येणार कि नाही?
अवतार चे अजून २ भाग म्हणजे अवतार चार (२०२९) ला आणि अवतार पाच (२०३१) ला चित्रपट येणार आहेत. पण अजून अधिकृत तारीख सांगितलेली नाही.

अवतार: फायर अँड ॲश” चित्रपट कुठे पाहू शकतो..?

आपल्या जवळच्या थिएटर मध्ये बघू शकता.

लेखक रेटिंग स्टार :-

उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ४.३ स्टार देईन.

अवतार : द वे ऑफ वाटर | २०२२ मधील जगातील सर्वात महागडा चित्रपट

तुम्ही अवतार: फायर अँड ॲश चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *