HomeAdventureEnglishScience FictionShort Films

अ ट्रिप टू द मून (1902) – सायलेंट शॉर्ट मुव्ही | A Trip to the Moon (1902) – Silent Short Movie

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 6:23 PM

अ ट्रिप टू द मून (1902) – सायलेंट शॉर्ट मुव्ही  | A Trip to the Moon (1902) – Silent Short Movie 

कालावधी : – 12 मिनिटे 47 सेकंद   
शैली : – विज्ञान कथासाहसी                                                      “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.9 / 5

लेखक                    : –  जॉर्जेस मेलिस ( Georges Melies ) 
दिग्दर्शक                : –  जॉर्जेस मेलिस 
निर्माता                   : –  जॉर्जेस मेलिस
कलाकार                : –  जॉर्जेस मेलिस , ब्लूएट बेर्णोन (Bleuette Bernon), फ्रँकॉईस लल्लेमेंट (François                                                    Lallement), हेनरी देलान्नोय (Henri Delannoy)

A%20Trip%20to%20the%20Moon%20(1902)
 A Trip to the Moon (1902) 

प्रदर्शित तारीख       : –   1 सप्टेंबर 1902
वेळ                        : –  12 मिनिटे 47 सेकंद
भाषा                      : – मूक चित्रपट
देश                        : –  फ्रान्स

सारांश : – 

          हा मुव्ही ब्लॅक अँड व्हाईट १२ मिनिटे ४७ सेकंद चा आहे. जॉर्जेस मेलिस यांनी दिग्दर्शित केला गेला आहे. या मुव्ही मध्ये चंद्रावर जाण्यासाठी एक रॉकेट कॅप्सूल बनवतात. रॉकेट बनवल्या नंतर रॉकेट लाँच करण्यासाठी लोक जमलेले आहेत त्या  प्रेक्षकांना हात दाखवत आहेत. कॅप्सूल लाँच काही महिला सुद्धा काम करत आहेत. कॅप्सूल मध्ये ६ जण बसतात. आणि कॅप्सूल लाँच होते. ते रॉकेट कॅप्सूल चंद्रावर येऊन पोचते. सर्वजण कॅप्सूल मधून बाहेर येतात आणि जल्लोष व्यक्त करतात. काही वेळाने ते चंद्रावर फिरत असताना त्यांना चंद्रावरील अलिएन सभ्यता दिसतात. ते अलिएन त्यांना पकडून त्यांच्या स्थानामध्ये घेऊन जातात. पण ते सहाजण त्यांच्या जाळ्यातून  पळतात. त्यांना पकडायला त्यांच्या पाठीमागे अलिएन लागतात. सहाजण कसेबसे ते रॉकेट कॅप्सूल जवळ येऊन कॅप्सूल मधून बसतात. कॅप्सूल चंद्रावरून पृथ्वी कडे लाँच होते. ते सुखरूप पृथ्वी वर येऊन जल्लोष साजरा करतात. हा  मुव्ही  त्या काळी बनवला ज्या वेळी साधन सामग्री  ऍनिमेशन, व्ही एफ एक्स.  उपलब्ध नव्हती. यामध्ये सेट डिजाईन, त्यांच्या वेशभूषा डिजाईन जॉर्जेस मेलिस यांनी केले. त्यांनी आपल्या फिल्म मध्ये काही रंगाचे तर वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट देऊन त्यांनी फिल्म जगात नवीन कल्पना आणली. म्हणून जॉर्जेस मेलिस यांना  ग्रॅन्डफादर ऑफ स्पेशल इफेक्ट म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *