आदिपुरुष : फिल्म समीक्षा | आजच्या युगातील मॉडर्न रामायण
Written by : के. बी.
Updated : जून 19, 2023 | 02:47 AM

आदिपुरुष |
लेखक | ओम राउत, मुंतशीर |
दिग्दर्शक | ओम राउत |
कलाकार | प्रभास, सैफ अली खान, क्रिती सनन, |
निर्माता | भूषण कुमार, ओम राउत, प्रमोद सुतार, राजेश नायर |
संगीत | अजय – अतुल, संचित – अंकित |
प्रदर्शित तारीख | १६ जून २०२३ |
भाषा | हिंदी |
कथा :-
भारतातील रामायण या पौराणिक कथेवर आधारित हि फिल्म आहे. राघव म्हणजे राम आपल्या वडिलांच्या आदेशावरून वनवासात गेल्यावर घडलेली कथा दाखवलेली आहे.
“आदिपुरुष” चित्रपट समीक्षा :-
“तानाजी द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राउत यांनी केले होते. तो चित्रपट सुपरहिट झाला. त्या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळे आदिपुरुष पण असाच एक नाविन्यपूर्ण असावा त्यात नवीन असे बघायला मिळेल. त्यासाठी चित्रपट ग्रहात गेलो आणि चित्रपट पहिला आणि भरपूर असे काही नवीन पाहायला मिळाले त्याबद्दल आपण पुढे बोलूच.
चित्रपट मेकेर्स च्या मते आत्ताच्या युगाला ग्राह्य धरून आदिपुरुष बनवण्यात आला आहे. म्हणूनच आपल्याला रावण चा लूक आत्ताच्या युगातील स्टायलिश रावण दिसून येतो. हेयर ची स्टाईल, अंगावर घातलेले कपडे, पैलवान सारखे हात फुगवून चालणे पाहून रावण नसून कोणीतरी तानाजी चित्रपटातील खलनायक वाटतो. त्याचप्रमाने प्रत्येक पात्रांमध्ये वेगळेपण दिसेल. कारण जे आपण वाचलेलं पाहिलेलं ऐकलेलं रामायण यात खूपच फरक आहे. भारतातील महान ग्रंथापैकी एक महान ग्रंथ मानला जातो. चित्रपट मेकर्सनी तसे रामायण वाचलेलं पाहिलेलं ऐकलेलं असावे त्यानुसार चित्र काही दिसत नाही आणि महान पुरुषांच्या तोंडी शोभून न दिसणारे त्यांनी लिहिलेलं बरेच डायलॉग दिसून येतात. प्रत्येक पात्राला समजून घेण्यसाठी हवा तसा वेळ दिलेला नाही. त्यामुळे काही भूमिका समजून येत नाहीत. आपल्याला समजून येतात कारण आपण ऐकलंय वाचलंय आपल्याला सर्वच इतिहास माहित आहे. पिक्चर खूपच जास्त पळत आहे असे वाटते. जसे कि राम – लक्ष्मण संवाद, सीतेला कोणी पळवून घेवून गले हे सांगणारा जटायू – राम संवाद, हनुमान आपल्या खांद्यावर राम लक्ष्मण यांनाआपल्या खांद्यावर घेवून जाणे व हनुमान – राम गुरु शिष्य यांचा संवाद, लंकेचा आतील दरबार ज्या ठिकाणी उंच आसनावर बसलेला लंकेश रावण आणि त्यांचे दरबारातील सेनापती आदी पदाधिकारी, अंगद दरबारात येऊन पाय हलवून दाखवण्याचे आव्हान देणे. असे बरेच काही दाखवायला हवे होते.
सुरुवातीलाच आपल्याला रावण दिसतो. रावण पात्रावर वर जास्त भर देण्यात आला आहे. सोन्याची लंका दाखवायला हवी होती त्या सोन्याची काळी लंका दाखवली. रावण च्या लंकेचे सीन आले कि आपण बॅटमॅन पाहतो कि काय असे वाटते. तसे पुष्पविमान म्हणून वटवाघळ दाखवून आकाशात फिरण्याचा चित्र बघायला विचित्र वाटत होतं. जी वटवाघळ दाखवली ती पण २ डी मध्ये दिसणारी. रावण चा पुत्र ज्याने इंद्र देवाला हि पराजित केला असा इंद्रजीत च्या अंगावर दिसणारे टॅटू खास नव्हते. डी सी युनिवेर्स च्या फ्लॅश सारखा फास्ट मूव्ह दिले गेले आहेत. प्रत्येक पात्रांमध्ये वेशभूषा आत्ताच्या युगातील दाखवली आहे. पौराणिक कथा दाखवत आहे म्हणजे त्याकाळची वेशभूषा दाखवायला हवी होती. ज्यांच्या आधारे हि लढाई जिंकण्यात आली असे शूरवीर वानर सेना दाखवली खरी पण नॉर्मल क्रियेटीव्हीटी निर्माण केल्या सारखे वाटते. ५०० कोटी खर्च झाला असे काही माध्यामाकडून कळून येते तरीपण असे साधे ऍनिमेशन, साधे व्ही. एफ. एक्स. दिसून येते. अश्या प्रकारे बर्याच त्रुटी या चित्रपटातून दिसून येतात. त्याच्यापेक्षा तुम्ही जर एकदा रामानंद सागर यांचे १९८७ साली रिलीज झालेली “रामायण” मालिका बघितली तरी माणूस प्रसन्न होवून जातो. लॉकडाऊन च्या काळात परत एकदा रामायण मालिका प्रदर्शित केली. आणि उत्स्फुर्तीने लोकांनी पाहण्यास पसंत केले. जास्त लोकांनी पाहिलेलं रामायण मालिकेचा जगात रेकॉर्ड आहे.
राम दिसल्यावर एक चेहऱ्यावरचे तेज, शांत स्वभाव. सतत आनंदमय चेहरा दिसून येतो. अशी भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी “रामायण” मालिका मध्ये राम यांची भूमिका अजून हि मनात घर करून आहे. त्यांनी साकार केली राम यांची भूमिका अप्रतिम आहे. आदिपुरुष मधील राघव म्हणजे राम यांची भूमिका साऊथ स्टार प्रभास यांनी केलीली आहे. प्रत्येक सीन मध्ये त्यांचा रागीट चेहरा दिसतो. तुम्ही रिलीज पोस्टर मध्ये सुद्धा रागीट चेहरा दिसून येत आहे. सीता यांची भूमिका क्रिती सनन यांनी चांगली केली आहे. रावण ची भूमिका सैफ अली खान यांनी केली आहे. त्यांचा दिसण्याचा लूक सोडला तर त्यांनी केलीली भूमिका विचारात घेतली तर चांगल्या प्रकारे केली आहे. तानाजी चित्रपटात सूर्याजी मालुसरे यांची योग्य अशी भूमिका देवदत्त नागे यांनी केली होती. आणि आता हनुमान यांची भूमिका केली आहे.
चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युजिक ऐकल्यावर पुढे काय होतंय ते बघायची इच्छा होते. रावण एंट्रीचे म्युजिक असो या राम एन्ट्री चे म्युजिक असो खूप छान आहे. “राम सिया राम” हे गाणे प्रचंड गाजले आहे. अजय – अतुल व संचित – अंकित यांनी चित्रपटातील म्युजिक खूप चांगले बनवले आहे.
“आदिपुरुष” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम म्युजिक यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी १.१ स्टार देईन.
तुम्ही आदिपुरुष चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.