“आय एम ग्रूट” मार्वल सिरीज – बेबी ग्रूट ची छोटीशी मौजमस्ती
Written by : के. बी.
Updated : डिसेंबर 05, 2022 | 12:09 AM
आय एम ग्रूट |
लेखक | स्टॅन ली, जॅक किर्बी, कस्टर्न लेपोर, लॅरी लिबर, कीथ गिफेन, बिल मैंटलो |
दिग्दर्शक | कस्टर्न लेपोर |
कलाकार | विन डिझेल, ब्रॅडली कूपर, ट्रेवर डेवाला, जेम्स गन, (आवाज) |
निर्माता | मार्वल स्टुडिओ |
संगीत | डॅनियल लुप्पी |
प्रदर्शित तारीख | 10 ऑगस्ट 2022 |
सीजन | १ |
एकूण भाग | ५ |
भाषा |

कथा :-
लहानसा ग्रूट आपल्या लहानश्या वयात आलेला बेबी ग्रूट दाखवला आहे. वेगवेगळे प्रयोग निर्माण करून मजा – मस्ती, करामती करत आहे. दुसऱ्या ग्रहा च्या वातावरणात राहून मजा घेणे.
“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
कस्टर्न लेपोर यांनी दिग्दर्शित केलीली हि छोटीशी शोर्ट सिरीज खपच आल्हादायक वाटते. शोर्ट सिरीज म्हणतोय कारण प्रत्येकी एक भाग आहे ४ मिनिटाचा आहे. मार्वल स्टुडिओज ने मिस मार्वल सिरीज च्या नंतर “आय एम ग्रूट” सिरीज बनवली. हि पूर्ण ॲनिमेशन सिरीज आहे. विन डिझेल यांनी ग्रूट ला आवाज दिला आहे. प्रत्येक भाग ४ मिनिटाचा असला तरी प्रत्येकी भागाची स्टोरी आपल्या पटकन समजून जाते. प्रत्येक भागात नवीन असे काही ॲनिमेशन बघायला मिळते. ग्रूट चे रुसणे, राग येणे, चिडणे, हसणे, मधीच स्मित हास्य करणे हे भाव त्याच्या चेहरावर दिसून येतात. आणि दुसऱ्या ग्रहाचे वातावरणातील दृश्य असो या स्पेसशिप मधील दृश्य खूपच उत्तम दिसतात.
या शोर्ट सिरीज चे ५ भाग आहेत.
१ “फर्स्ट स्टेप्स” : – बेबी ग्रूट असलेली कुंडी बाजूला हटवून त्याठिकाणी एका मोठ्या झाडाची कुंडी लावली जाते. हे बेबी ग्रूट ला आवडले नसते. तो तिथे पाहोण्याची खटपट करोतो.
२ “द लिटल गाय” : – बेबी ग्रूट एक अनोख्या ग्रह वर गेला आहे. तिथे त्याला त्या ग्रहावरच्या एका छोट्याश्या दगडाखाली वेगळ्या स्पेशीस दिसतात. त्याला त्या खूप आवडतात. ग्रूट फुंक मारतो. ग्रूट ची एक फुंक त्या स्पेशीस ना भूंकप आल्या सारखा बाटतो. ग्रूट मजा येते तो तिठे एक छोटीशी काडी टाकतो. त्या स्पेशीस ना ग्रूट ने हल्ला केला सारखे वाटते. त्या स्पेशीस ग्रूट वर हल्ला करता. त्यांच्याकडे हि बंदूक, तोफा, आणि लढाऊ विमान आहेत. त्यांचा वापर करून त्या ग्रूट ला रोखण्याचा प्रयत्न करतात. पुढे काय होते ते तुम्ही नक्की पहा.
३ “ग्रूटस परस्युट” : – स्पेसशिप मध्ये ग्रूट ला एका खाली पडलेल्या बाटलीतून कोणीतरी बाहेर आलेलाचा शोध घेत असतो. त्याला एक त्याचा सारखा असलेला दुसरा ग्रूट भेटतो. आणि तो हि आय एम ग्रूट बिलतो तसा ग्रूट ला राग येतो. ग्रूट ने त्याला कसे बाहेर काढले हे नक्की पहा.
४ “ग्रूट टेक्स अ बाथ ” : – एका दुसऱ्या ग्रहावर स्पेसशिप थांबली आहे. ग्रूट ला गरम पाण्याचा डबका भेटला आहे त्यात तो स्नान करत आहे. त्यातील माती अंगाला लावली कि ग्रूट ला पाने येतात. त्यात तो खुश होतो. पण थोड्या वेळाने पाने गळून जातात. तो परत त्या पाण्यात जावून वेगवेगळ्या प्रकारची शैलीतील पाने आकार देवून हसत असतो. हे पाहून बाजूच्या पक्ष्याची झोप माडते.
५ “मॅगनम ओपस” : – स्पेशीप मध्ये ग्रूट ड्रॅक्स स्नान करत असताना ड्रॅक्स च्या स्नान करण्याचा साबण, झोपलेल्या रॉकेट च्या शेपटीचे काही केस कापून घेतो. बरेच एक एक वस्तू गोळा करत तो पैंटिंग करत असतो. क्विल च्या उडण्याऱ्या बुटाचा ची वापर करतो. आणि पैंटिंग पूर्ण करण्यासाठी स्पेसशिप मध्ये बॉम लावून एक जागा उडवून लावतो त्यातील येणाऱ्या आगीच्या ठिणग्या त्या पैंटिंग वर गोळा करतो. तेवढ्यात रॉकेट येतो. रॉकेट येऊन त्याला विचारतो. ग्रूट त्याला बनवलेली पैंटिंग दाखवतो. ते पाहण्यासाठी नक्कीच भाग आय एम ग्रूट.
“आय एम ग्रूट” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
डिजनी प्लस हॉटस्टार फ्री मध्ये पाहू शकता त्यासाठी डिजनी प्लस हॉटस्टार चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, कथा, ॲनिमेशन, व्ही. एफ. एक्स. यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ४ स्टार देईन.