HomeDramaFantasyFilmsHindi

आलम आरा” (१९३१) भारतातील पहिला बोलपट चित्रपट | “Alam Ara” (1931) Indian first talkie film

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 9, 2022 | 6:34 PM

आलम आरा (१९३१)

सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – १२४ मिनिटे   
शैली : – नाटक, काल्पनिक                                                      “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.8 / 5

पथकथा                 : –  अर्देशीर  इराणी
दिग्दर्शक                : –  अर्देशीर  इराणी 
कलाकार                : –  मास्टर विठ्ठल, झुबेदा,पृथ्वीराज कपूर
Alam%20Ara%20(1931)
 Alam Ara (1931)
निर्माता                   : –  अर्देशीर  इराणी
छायाकार               : –   आदी इराणी
संपादित                 : –  एझरा मीर 
प्रदर्शित तारीख      : –  १४ मार्च १९३१
भाषा                      : – हिंदुस्थानी 
देश                        : – इंडिया 

भारतातील पहिला बोलपट चित्रपट

         14 मार्च 1931 साली अर्देशीर इराणी (Ardeshir Irani) यांनी “आलम आरा” (Alam Ara) हा भारतातील पहिला बोलपट वैशिष्ट्य चित्रपट बनवला. भारतात पहिल्यांदाच “आलम आरा” चित्रपटांमध्ये सात गाण्याचा समावेश केला. “दे दे खुदा के नाम पे प्यार” हे गाणे मुहम्मद वजीर खान यांनी गायले. त्या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली. “दे दे खुदा के नाम पे प्यार” भारतातील हे पहिले गाणे आणि पहले गायक म्हणून मुहम्मद वजीर खान यांना ओळखले जाते. यानंतर चित्रपटांमध्ये गाणे असने हि एक प्रथाच बनली.
          त्या काळात साऊंड रेकॉर्डिंग करणे खूपच कठीण होते. इम्पेरिअल फिल्म कंपनी रेल्वे फाटक च्या बाजूला असल्याने साऊंड रेकॉडिंग करताना बाहेरील अनावश्यक आवाज रेकॉर्डिंग होत होता , त्यामुळे जेव्हा रात्रीच्या १ ते ३ मध्ये ट्रेन बंद झाल्यावर रात्रीच्या १ ते ३ मध्ये आलम-आरा चे शूटिंग होऊ लागले. आलम-आरा या चित्रपटांमध्ये भारतात पहिल्यांदाच गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. यात ७ गाणे दाखवण्यात आले. दे दे खुदा के नाम पर हे खान यांनी गायलेले गाणे खूपच प्रसिद्ध झाले. 
          एका राजाला दोन पत्नी एकीचे नांव दिलबहार आणि नवबहार होते, पण त्यांना संतान प्राप्ती झाली नाही. एकेदिवशी एक फकीर येतो नावबहार ला सांगतो कि ज्यावेळी मासाच्या गळ्यात बांधलेला हार भेटेल. तेव्हा तुम्हाला संतान प्राप्त होईल. तो मासा राजवाड्यातील तलावात दिसेल.  दिलबहार च्या राजवाड्यातील सेनापती आदिल शी प्रेम संबंध आहे हे राजाला कळते. आदिल ने पहिल्यांदा फूस लावली असे दिलबहार राजाला सांगते. हे ऐकल्यावर राजाने आदिल ला बंदिस्त करतो. आदिल ची बायको मेहर निगार हि गर्भवती असते तरीपण राजा तिला राजवाड्यातून बाहेर काढतो. मेहर निगार  आलम आरा जन्मास देऊन मरण पावते. एक शिकारी आर चा सांभाळ करते. नवबहार ला सांगितलेलं भविष्य कळल्यावर दिलबहार च्या मनामध्ये इर्षा निर्माण होते. राजा आपल्याकडे दुर्लक्ष करेल. दिलबहार कुटील कारस्थान करत असते. आलम आराला माहित आहे कि आपल्या वडिलांना राजाच्या बंधनातून  मुक्त करायचे आहे. त्यासाठी ती राजवाड्यात प्रवेश करते. आलम आरा ची  राजकुमार शी होते. त्यांचे एकमेकांशी प्रेम निर्माण होते. दिलबहार कुटील कारस्थान सर्वाना माहित होते, त्यानंतर राजकुमार आणि आलम आरा यांचे लग्न होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *