एक महानायक : डॉ. बी. आर. आंबेडकर हिंदी टीव्ही मालिका समीक्षा | Ek Mahanayak : Dr. B. R. Ambedkar Hindi TV Series Review
Written by : के. बी.
Updated : मार्च 4, 2022 | 6:49 PM
एक महानायक : डॉ. बी. आर. आंबेडकर हिंदी टीव्ही मालिका समीक्षा | Ek Mahanayak : Dr. B. R. Ambedkar Hindi TV Series Review
शैली : – नाटक, इतिहास जगभरून फिल्म्स रेटिंग : – ३.5✰ / ५✰
लेखक :- शांती भूषण
दिग्दर्शक :- इम्तियाज पंजाबी
कलाकार :- प्रसाद जावडे, आयुध भानुशाली, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुणे, नारायणी वरणे, सौद मन्सुरी, अथर खान, वंशिका यादव
निर्माता :- स्मृती शिंदे
प्रदर्शित तारीख :- १७ डिसेंबर २०१९
वेळ :- २२ मिनिटे ( प्रति एपिसोड)
भाषा :- हिंदी
देश :- भारत
कथा :-
डॉ बाबासाहबे आंबेडकर यांचे बालपणा पासून ते भारताचे सविंधान लिहिण्या पर्यंतचा प्रवास दाखवला आहे.
समीक्षा :-
रामजी सकपाळ बाबासाहबे यांचे वडिलांनी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये शिक्षणाचे ध्येय पेरले. शिक्षण विविध पदव्या घेऊन आपल्या लोकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला. शिकत असताना, संघर्ष करत असताना, आणि त्यांच्या वैयक्तीती जीवनात आलेले चढउतार, त्यांचे भाषण, त्यांचे विचार या मालिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. १७ डिसेंबर २०१९ अँड टीव्ही चॅनेल वर हि मालिका प्रसारित करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता हि मालिका सुरु व्हायची.
इम्तियाज पंजाबी यांनी अतिशय उत्तम रित्या दिग्दर्शन केले आहे.
आयुध भानुशाली – (बाबासाहेब यांचे बालपण), अथर्व कर्वे – (तरुण बाबासाहेब), प्रसाद जावडे – बाबासाहेब यांची मुख्य भूमिका केली. नेहा जोशी – (भीमाबाई सकपाळ) , जगन्नाथ निवंगुणे (रामजी सकपाळ), नारायणी वरणे – ( रमाबाई ) सौद मन्सुरी, अथर खान, यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.
निशांत राजा यांनी साहेब मेरे भीमराव गीताला संगीत दिले आणि त्यांनीच ते गायले आहे.
विशेष माहिती
या मालिकेचे कन्नड भाषेतून डबिंग करून ४ जुलै २०२० पासून झी कन्नड, झी तेलगू या चॅनेल वर सुद्धा दाखवण्यात आले. झी ५ वर २१ सप्टेंबर २०२० मालिका दाखवण्यात आली आहे. त्या मालिकेचे नाव “माना आंबेडकर” हे होते.