HomeFilmsMarathiMarathi Films

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : सप्टेंबर 17, 2023 | 3:32 PM

    आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. 
 आपण आतापर्यंत जुलै २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट पाहीले आहेत. आज आपण या लेखात ऑगस्ट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले चित्रपट पाहुया. 
August 2023 Marathi movie list review and information
१. पाहीजे जातीचे
२०२३.नाटक. २ तास ३२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक के. नरेंद्र बाबू, उमा कुलकर्णी, विजय तेंडुलकर
दिग्दर्शकके. नरेंद्र बाबू
कलाकारविक्रम गाजरे, संजना काळे, सयाजी शिंदे, भागीरथीबाई कदम, अमीर ताडवलकर, सुशांत कोळी, नागनाथ साळवे
निर्माताडॉ. मल्लिकार्जुन, एन. गजरे
प्रदर्शित तारीख४ ऑगस्ट २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

पाहीजे जातीचे” चित्रपट समीक्षा :-

ऑगस्ट महिन्यात मराठीमध्ये फक्त दोन चित्रपट प्रदर्शित झाले त्यापैकी पहिला म्हणजे “पाहिजे जातीचे”. साधारण १९७० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगासमोर नाटकस्वरूपात आणण्याचं विजय तेंडुलकर यांनी केलं होतं. याच नाटकवर आधारित हा चित्रपट आहे.
खरं तर पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथेला आताच्या काळानुसार थोडं बदलण्याची किंवा ठळक बदल लक्षात घेऊन पटकथा लिहायला हवी होती तिथे हा सिनेमा कुठेतरी कमी पडतो. चित्रपटाच्या नावावरूनच लक्षात आलं असेल की जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
तर आपल्या कथेचा नायक हा एका मागासवर्गीय कुटुंबातील असून तो अतिशय हुशार असतो. हि कथा एक गावातील असून त्या गावातील शाळेत एका शिक्षकाची गरज असते तिथे हा नोकरीसाठी अर्ज करतो. नोकरी मिळते देखील परंतु निव्वळ एका मागास जातीतील असल्यामुळे त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच त्याचं प्रेम एका अशा तथाकथित वरच्या जातीतील मुलीवर होतं जी नेमकी त्या शाळेच्या चेअरमनची पुतणी असते.
हे चेअरमन म्हणजे गावचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांना समाजात एक वेगळं स्थान असतं. तर आता या नायकाचं पुढे काय होतं.? त्यांची प्रेमकहाणी पुर्णत्वास जाते का ? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच मिळतील. अजुनही आपल्याकडे टॅलेंट असून सुद्धा फक्त जातीचा शिक्का बसल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढे जाता येत नाही. आता हे चित्र बदलत चाललय खरं. तर अशाच विद्यार्थ्यांचं, तरूणांचं भवितव्य हे जातीवर कसं अवलंबून असायचं हे दाखवणारा हा चित्रपट आहे.
सयाजी शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अभिनय उत्तम आहे. तर नवीन जोडी विक्रम गजरे आणि संजना काळे यांनी सुद्धा अतिशय सुंदर काम केलं आहे. प्रमोशन न झाल्याने हा चित्रपट कधी आला आणि गेला तेच कळलं नाही. त्यामुळे मोठ्या पडद्यावर या चित्रपटाला आपली जादू दाखवता आली नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. सुभेदार
२०२३. इतिहास, नाटक. २ तास ३४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक दिग्पाल लांजेकर
दिग्दर्शकदिग्पाल लांजेकर
कलाकारअजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अभिजित श्वेतचंद्र, दिग्विजय रोहिदास
निर्माताचिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे
प्रदर्शित तारीख२५ ऑगस्ट २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.३⭐/ ५

सुभेदार” चित्रपट समीक्षा :-

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक मधील पाचवे पुष्प म्हणजे “सुभेदार”. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट दणक्यात अजुनही प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणत आहे.
सुभेदार तानाजी मालुसरे आणि कोंढाण्याची लढाई आपल्याला माहीत आहेच. लहानपणापासून हि लढाई पुस्तकांमधून, गोष्टीरुपात आपण ऐकत आलोच आहोत परंतु हीच लढाई मोठ्या पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तारलं सुद्धा.
नेहमीप्रमाणेच या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर याने चांगली भूमिका साकारली आहे. आऊसाहेब म्हणून मृणाल कुलकर्णी उत्तम. आणि अर्थात सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भुमिकेला सर्वार्थाने न्याय दिला आहे तो अजय पुरकर यांनी. पावनखिंड मध्ये बाजीप्रभू देशपांडे म्हणून जितकी भुमिका ते जगले तेवढीच सुभेदार म्हणून ही भूमिका सुद्धा त्यांनी जिवंत केली.
उदयभान आणि तानाजी मालुसरे यांच्यातील लढाई बघताना अंगावर काटा उभा राहतो. ही लढाई अजून दाखवता आली असती. आणि पुर्वार्ध थोडा कमी दाखवला असता तर अजून प्रभावी चित्रपट होऊ शकला असता. काही ठिकाणी अजून चांगल्या प्रकारे इफेक्ट्स दाठवता आले असते परंतु त्याने फारसा फरक पडत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम अशा प्रकारे पडद्यावर साकारणं हे सोपं नाही. स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी व इतर सहकलाकार या सगळ्यांनीच उत्कृष्ट अभिनय केला आहे.
तानाजी मालुसरे हे महाराजांचे सुभेदार आणि जवळचे मित्र होते. जीव ओवाळून टाकायला तयार असणाऱ्या मावळ्यांपैकी एक मावळा. म्हणुनच स्वतःच्या मुलाचं लग्न टाकून ते कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी मोहीमेवर गेले. या चित्रपटाच्या निमित्ताने मालुसरे कुटुंबात अजुनही चालु असलेल्या एका नवीन प्रथेबद्दल कळलं जी प्रथा सुभेदार आणि मावळे धारातीर्थी पडल्यामुळे रायबाच्या लग्नापासून सुरू झाली. आता ती कोणती प्रथा ते चित्रपट बघा मग कळेल.
एकंदरच हा चित्रपट प्रत्येकाने बघावा असा आहे. आपल्याला मिळालेलं हे स्वराज्य सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या सारख्या असंख्य मावळ्यांच्या बलिदानामुळे मिळालं आहे हे सांगणारा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.

हे पण वाचा :-

जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | या मराठी चित्रपटांनी केली २०२३ ची धमाकेदार सुरवात!

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

Content Writer
Writer

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *