HomeFilmsHindi

ओएमजी २ फिल्म समीक्षा | संवेदनशील ( लैंगिक शिक्षण ) विषय वर आधारित एक शिकवण देणारी फिल्म

Written by : के. बी.

Updated : ऑगस्ट 14, 2023 | 01:43 AM

omg 2 oh my god 2 movie review and information in marathi
ओएमजी २
२०२३. विनोदी, नाटक. २ तास ३६ मिनिटे. [ ए ]
लेखकअमित राय
दिग्दर्शकअमित राय
कलाकारअक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम
निर्माताअरुण भाटीया, विपुल शाह, राजेश बहल, अश्विन वर्दे
संगीतविक्रम मॉँन्ट्रोज, हंसराज रघुवंशी, प्रणय, संदेश शांडल्य
प्रदर्शित तारीख११ ऑगस्ट २०२३
देशभारत
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.६⭐/ ५

कथा :- 

भगवान महादेव चे भक्त कांती मुदगल यांच्या मुलाची स्टोरी आहे. शाळेत केलेल्या गैर वर्तनुकीचा म्हणजे जे आपण चार चौघात बोलत नाही असा एक विडीओ व्हायरल होतो. त्याला शाळेतून काढून टाकण्यात येते. आपल्या मुलावर असे आरोप झाल्यावर कांती भगवान महादेवाकडे मदत मागतो आणि महादेव आपल्या दुताला पाठवतात. शिवजी चा दूत कशाप्रकारे मदत करेल ? काय कांती मुदगल आपल्या मुलाला न्याय मिळवून देईल का ? हे पाहण्यसाठी चित्रपट नक्की पहा.

“ओएमजी २” चित्रपट समीक्षा :-

“ओएमजी : ओह माय गॉड” हा चित्रपट २०१२ ला प्रदर्शित झाला एक नास्तिक विषय खूपच काही सांगून गेला. मंदिरात कसा बाजार चालू असतो याच्यावर स्पष्टपणे दाखवण्यात आले होते. यात श्री कृष्णाची भूमिका अक्षय कुमार, कांती ची भूमिका परेश रावल आणि खलनायक पुजारी ची भूमिका मिथुन चक्रवर्ती यांनी केली होती. याचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले होते. तो चित्रपट खूपच हिट झाला. आणि आता तब्बल बारा वर्षांनी त्याचा सिक्वल ११ ऑगस्ट २०२३ ला प्रदर्शित केला. दुसऱ्या भागाचे दिग्दर्शक अमित राय यांनी उत्तम प्रकारे केले आहे. एक संवेदनशील ( लैंगिक शिक्षण ) विषय आहे. याच्या अगोदर असा विषय कोणी मांडला नाही. असा विषय शाळेत शिकवला जात नाही कि घरात शिकवला जात नाही. आणि त्याबद्दल जास्त काही कोणी बोलत नाही. पण सेन्सर बोर्ड ने काही शूट आणि संवाद बदलायला लावले आहेत. त्यांनी हा संवेदनशील विषय परखडपणे मांडण्यात आला आहे. यातून आपल्याला हसवून त्यांनी विचार करायला लावला आहे. स्टोरी टेलिंग प्रभावी आहे. तशी स्टोरी हि छान आहे. कोर्ट कचेरी सामना तसा जोरदार नव्हता कारण तसे स्पष्ट दिसून येते कि कोण जिंकणार. विरुद्ध पार्टी कडून तसे पुरावे जास्त सदर करता आले असते तर आणखीन मजा आली आसती. पण असो तुम्हाला असा कोणताही क्षण बोर नाही वाटणार. तुम्ही हसत हसत काही शिकवून जाणार.

शिवजी चा दूत म्हणून अक्षय कुमार यांनी भूमिकेचे उत्तम प्रकारे सादरीकरन केलं आहे. त्यांची देहबोली, वेश भूषा हि आणि त्यांची केसाची स्टाईल दिसायला योग्य वाटते. अक्षय कुमार यांचा तसा स्क्रीन टाईम जास्त नव्हता. परेश रावल यांनी कांजी लाल मेहता ची भूमिका उत्तम साकारली होती तशीच पंकज त्रिपाठी यांनीही उत्तम प्रकारे कांती मुदगल ची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेली भूमिका नैसर्गिक भूमिका केल्या सारखे वाटते. त्यांची संवांद बाजी त्यांची होणारी हालचाल यातून प्रेक्षक खप हसू लागतात. त्यांनी केलेल्या भूमिकेची किमया आहे. त्याच बरोबर विरुद्ध वकिलाची भूमिका करणारी यामी गौतम यांनीही प्रोपेशनल वकिलाची भूमिका प्रोपेशनल प्रमाणे केली आहे. कांती मुदगल च्या मुलाची भूमिका असो त्यांच्या परिवाराची कास्टिंग चांगली आहे त्यांनी भूमिका योग्य केल्या आहेत. इतरांची भूमिका चांगल्या आहेत.

हा चित्रपट अठरा वर्षाखालील वर्ग पाहू शकत नाही. अठरा वर्षापुढील व्यक्ती पाहू शकते. तरीही तुम्ही अठरा वर्ष हून जास्त असाल आणि तुम्ही परिवार सोबत चित्रपट बघत असाल तर तुहाला लाज वाटू शकते. पण मला वाटत हा चित्रपट पॅरेंट्स नी नक्की पाहावा.

ओएमजी २” चित्रपट कुठे पाहू शकतो..?

आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.

लेखक स्टार रेटिंग : –

उत्तम दिग्दर्शन, भूमिका, संवेदनशील विषय यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.5 स्टार देईन.

तुम्ही ओएमजी २ चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *