HindiFilmsHome

“किसी का भाई किसी कि जान” चित्रपट समीक्षा | ४ वर्षानंतर सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या सोबत चा नवीन चित्रपट

Written by : के. बी.

Updated : एप्रिल 24, 2023 | 02:05 AM

किसी का भाई किसी कि जान जिनको केहते है सलमान खान

kisi ka bhai kisi ki jaan
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan image source : @salmankhan

किसी का भाई किसी कि जान
२०२३. ॲक्शन, प्रणय. २ तास २४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकफरहाद सामजी
दिग्दर्शकफरहाद सामजी
कलाकारसलमान खान, पूजा हेगडे, दग्गुबती वेंकटेश, जगपती बाबू
निर्मातासलमान खान
संगीतरवी बसरूर
प्रदर्शित तारीख२१ एप्रिल २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

कथा :- 

आपल्या भावांमध्ये तुटतुत ह्वू नये म्हणून लग्न न करणारा व वस्ती टिकावी म्हणून शत्रूंशी लढा देणार भाईजानला त्यांचे भावंडे आपापल्या प्रीयासिनी ची मदत घेऊन भाईजान ला भाग्यलक्ष्मी ला शोधतात. काय भाईजान चे लग्न होईल का..? काय भाईजान कुणाच्या प्रेमात पडेल का..? हे प्रश्न चित्रपट पाहिल्यावर समजेल.

“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-

सिवा यांनी २०१४ ला “विरम” साऊथ इंडियन चित्रपट बनवला. त्यात अजित कुमार आणि तमन्ना भाटीया यांनी मुख्य भूमिका केल्या. फरहाद सामजी यांनी थोडेफार चेंजस करून सलमान खान फिल्म्स च्या बॅनर खाली चित्रपटाचा रिमेक बनवला आहे. कथेचा सार पठखन लक्षात येतो. भावांबद्दल चे प्रेम दिसून येते. परिवार असणारी गोष्ट आहे. ॲक्शन सोबत काही ठिकाणी विनोद होवून हसायला भाग पडते. आठ गाण्याचा अल्बम पण दिसून येतो. सलमान खान यांच्यावर कॅमेरा फोकस जास्त आहे. स्लो मोशन फायटिंग असो या त्यांची हालचाल असो, यावर भर दिला आहे. सलमान यांची एन्ट्री वर चित्रपटात शिट्टी वाजते आणि सिनेमा घरात पण शिट्टी चा आवाज येतो. सलमान खान फॅन ला ते आवडणारे आहे. वीरम साऊथ चित्रपट तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला खास काही आवडणार नाही. पण ज्यांनी नाही बघितला त्यांचे मनोरंजन तर नक्की होईल. हा चित्रपट पाहताना मैने प्यार किया या चित्रपटाची आठवण नक्की येयील तशी स्टोरी मांडण्यात आली आहे. चित्रपटांच्या मध्यांतर नंतर साऊथ सिटी मध्ये गेल्यासारखे वाटते. हा चित्रपट परिवार सोबत पाहू शकता. एक भावू आपल्या भावासाठी काय करतो आणि दुसरा भावू आपल्या बहिनीसाठी काय करू शकतो ते दाखवले आहे. नाते संबध म्हणजे भावाचे नाते काय असते ते दिसून येयील.

“किसी का भाई किसी कि जान” असे चित्रपटाचे नांव ऐकल्यावर या चित्रपटाचा हिरो सलमान खान च आहे हे नक्की. ४ वर्षा नंतर त्यांचा चित्रपट रिलीज झाला. त्यांनी आपल्या अंदाज मध्ये परत एकदा मनोरंजन केले. लास्ट च्या सीन मध्ये शर्ट काढून केलीली फायटिंग एक उत्तजेक होती. ५७ वर्षाचे असून सुद्धा त्यांनी कमावलेलं बॉडी बिल्डिंग हे आजच्या तरुणाईला लाजवेल अशी आहे. सलमान सोबत पूजा हेघडे यांनी म्हणून काम केले. त्याच बरोबर दग्गुबती वेंकटेश यांनी इंटरव्हल नंतर एका भाग्यलक्ष्मी च्या भावाची भूमिका खूपच केली आहे. रोहिणी हट्टंगडी यांना थोडीशी भूमिका केली आणि त्यांनी त्याचे सोनं केलं. डान्सर राघव जुयाल आणि अशोक सम्राट मालीकेचा नायक सिद्धार्थ निगम, जेस्सी गिल यांनी सलमान च्या भावांच्या भूमिका केल्या. पाहुणा कलाकार म्हणून राम चरण यांनी एका गाण्यात १ मिनिट भर डान्स केला आहे.

जगभरून फिल्म्स” चित्रपट कुठे पाहू शकतो..?

आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.

लेखक स्टार रेटिंग : –

३ .०⭐/ ५

वरील चित्रपट तुम्ही पहिला असेल तर तुम्हांला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *