HomeAwardsHindi

कुठे पार पडला २०२४ चा “फिल्मफेअर पुरस्कार” सोहळा? कोणा कोणाला मिळाली “ब्लॅक लेडी”.?

कुठे पार पडला २०२४ चा “फिल्मफेअर पुरस्कार” सोहळा? कोणा कोणाला मिळाली “ब्लॅक लेडी”.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : मार्च 03, 2024 | 02:29 PM

69th Filmfare awards 2024

आपल्या कलेची पावती मिळावी हे प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. प्रत्येक क्षेत्रात ही पावती मिळावी यासाठी वेगवेगळे पुरस्कार सोहळे होत असतात. असाच “Filmfare Award” मिळणं हे प्रत्येक हिंदी – मराठी कलाकाराचं स्वप्नं असतं. १९५४ साली सुरू झालेला हा पुरस्कार सोहळा दरवर्षी नव्या रूपात नव्या जल्लोषात साजरा केला जातो. भारतीय सिनेसृष्टीत फिल्मफेअर पुरस्कार हा एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. त्यामुळे दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याकडे कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं सुद्धा लक्ष लागून असतं. प्रत्येक कलाकाराला वाटत असतं पुरस्कार म्हणून मिळालेली ती ब्लॅक लेडी आपल्या हातात असावी. चला मग बघुया यावर्षी संपन्न झालेल्या या सोहळ्यात या पुरस्काराचे मानकरी कोण कोण ठरले.
यावर्षी पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच हा पुरस्कार सोहळा गुजरात मध्ये पार पडला. पहिल्यांदाच हा पुरस्कार सोहळा मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी संपन्न झाला. २८ जानेवारी २०२४ रोजी गुजरात मधील गांधीनगर येथे ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सुत्रसंचलनाची जबाबदारी करण जोहर, आयुषमान खुराना आणि मनीष पॉल यांनी पार पाडली. या संपूर्ण सोहळ्यामध्ये २०२३ साली प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ट्वेल्थ फेल या चित्रपटाचा गाजावाजा होता तसेच रणबीर कपूर च्या ॲनिमल या चित्रपटाची सुद्धा जोरदार चर्चा होती.
या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा मान “ट्वेल्थ फेल” या चित्रपटाला मिळाला असून विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. त्याचसोबत सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटीक्स) हा मान मनोज वाजपेयी याच्या देवाशिष मखीजा दिग्दर्शीत “जोरम” या चित्रपटाला मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणबीर कपूर तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट यांची वर्णी लागली आहे. आणि अर्थातच सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटीक्स) हा पुरस्कार आपल्या विक्रांत मेस्सी याला मिळाला आहे. ट्वेल्थ फेल या चित्रपटात अतिशय सुंदर आणि नैसर्गिक अभिनय करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्यामुळे हा पुरस्कार त्याला मिळाल्याने चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटीक्स) हा पुरस्कार शेफाली शाह(चित्रपट – थ्री ऑफ अस) आणि राणी मुखर्जी (चित्रपट – मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) यांना मिळाला आहे.
कलाकारांसोबतच इतरही अनेक पुरस्कार या पुरस्कार सोहळ्यात दिले जातात. आता २०२३ साठीचे हे इतर पुरस्कार कोणाला मिळाले हे बघू.

पुरस्कार पुरस्कार मानकरी कशासाठी मिळाला
सर्वोत्कृष्ट चित्रपटट्वेल्थ फेल“ट्वेल्थ फेल” या चित्रपटासाठी मिळाला.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकविधू विनोद चोप्राहा पुरस्कार विधू विनोद चोप्रा यांना “ट्वेल्थ फेल” या चित्रपटासाठी मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेतारणबीर कपूर“ॲनिमल” चित्रपटातील रणविजय सिंघ या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीआलीय भट्ट“रॉकी और राणी कि प्रेम कहाणी” चित्रपटातील राणी चॅटर्जी या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेताविकी कौशल“डंकी” चित्रपटातील सुखी या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीशबाना आझमी“रॉकी और रानी की प्रेम कहानी” चित्रपटातील जामिनी चॅटर्जी या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट कथाअमित राय
देवाशीष माखिजा
“ओएमजी २” चित्रपटातील कथासाठी
“जोरम” चित्रपटातील कथासाठी
सर्वोत्कृष्ट पटकथाविधू विनोद चोप्रा“ट्वेल्थ फेल” चित्रपटातील पटकथासाठी
सर्वोत्कृष्ट संवादइशिता मोईत्रा“रॉकी और रानी की प्रेम कहानी” चित्रपटातील संवादासाठी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीअविनाश अरुण धावरे“थ्री ऑफ अस” चित्रपटातील सिनेमॅटोग्राफीसाठी
सर्वोत्कृष्ट संगीतप्रीतम,
विशाल मिश्रा,
भूपिंदर बब्बल,
श्रेयस पुराणिक,
जानी,
आशिम केमसन,
हर्षवर्धन रामेश्वर,
गुरिंदर सीगल,
मनन भारद्वाज
“ॲनिमल” चित्रपटातील संगीत साठी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकभूपिंदर बब्बल “ॲनिमल” चित्रपटातील अर्जन वेल या गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकाशिल्पा राव “पठान” चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकतरुण डुडेजा“धक धक” चित्रपटातील पदार्पण दिग्दर्शक साठी
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)आदित्य रावल“फराज” चित्रपटातील निब्रास या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)अलिझे अग्निहोत्री“फॅरी” चित्रपटातील नियती या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनसुब्रत चक्रवर्ती
अमित रे
“सॅम बहादूर” चित्रपटातील प्रॉडक्शन डिझाइनसाठी
सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्सरेड चिलीज व्हीएफएक्स“जवान” चित्रपटातील व्ही.एफ.एक्स. साठी
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनगणेश आचार्य“रॉकी और रानी की प्रेम कहानी” चित्रपटातील व्हॉट झुमका? या गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट ॲक्शनपटजवान“जवान” चित्रपटातील ॲक्शन साठी
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइनकुणाल शर्मा
सिंक सिनेमा
“सॅम बहादूर” चित्रपटातील साऊंड डिझाइनसाठी
ॲनिमल
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोरहर्षवर्धन,
रामेश्वर
“ॲनिमल” चित्रपटातील बॅकग्राऊंड स्कोर साठी
जीवनगौरव पुरस्कारडेव्हिड धवन

७ जानेवारी आणि २८ जानेवारी असे दोन दिवस चाललेल्या या पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलेब्रिटी उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्यांचं जगभरून फिल्म्स तर्फे मनःपूर्वक अभिनंदन…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *