HomeFilmsSouth Indian

कुली: द पॉवर हाउस (२०२५) रिव्यू | लोकेश कनगराज यांच्या एका भव्य अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटांमध्ये सुपर स्टार रजनीकांत, नागार्जुन, अमीर खान दिसणार

Coolie: The Power House (2025) Review | Superstars Rajinikanth, Nagarjuna, Aamir Khan to be seen in Lokesh Kanagaraj’s grand action drama Movie

Written by : के. बी.

Updated : ऑगस्ट 15, 2025 | 04:09 PM

कुली (२०२५) हा चित्रपट रजनीकांतचा तमिळ चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन लोकेश कनगाराज यांनी केले आहे. कथा, दिग्दर्शन, कामगिरी, संगीत, दृश्ये, रनटाइम, प्रेक्षकांची चर्चा लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स (LCU) मधील पार्ट आहे कि नाही आणि का पाहावे याबद्दल स्पष्ट निर्णय घेणारा स्पॉयलर-मुक्त रिव्यू वाचा.

Coolie: The Power House (2025) Review | Superstars Rajinikanth, Nagarjuna, Aamir Khan to be seen in Lokesh Kanagaraj's grand action drama Movie
कुली: द पॉवर हाउस (Coolie: The Power House) 2025
२०२५. ॲक्शन, थ्रिलर, ड्रामा. २ तास ४९ मिनिटे. [A]
लेखकलोकेश कनगराज
दिग्दर्शकलोकेश कनगराज
कलाकाररजनीकांत, नागार्जुन, श्रुती हासन, सौबिन शाहीर, सत्यराज, उपेंद्र, रचिता राम
निर्माताकलानिथी मारन
संगीतअनिरुद्ध
रिलीज तारीख१४ ऑगस्ट २०२५
देशभारत
भाषातमिळ
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

कथा आणि पटकथा: 

देवा चा जवळच्या मित्राच्या मृत्यूचा उलगडा करण्याचा प्रयत्न त्याला गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये ओढतो, त्याच्या भूतकाळातील एक जुना अध्याय पुन्हा सुरू करतो.

“कुली: द पॉवर हाउस” चित्रपट समीक्षा :-
लोकेश कनागराज यांचा कुली हा भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित झालेला तमिळ भाषेतील अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्याच दिवशी १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी चित्रपट ‘वॉर २’ सुद्धा रिलीज झाला. त्यामुळे दोन्ही चित्रपटात संघर्ष नक्की होणार. या चित्रपटात रजनीकांत यांनी नागार्जुन, सौबिन शाहीर, उपेंद्र, श्रुती हासन, सत्यराज यांच्यासह मुख्य भूमिका साकारल्या आहेत आणि आमिर खान आणि पूजा हेगडे यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत. संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचे आहे, छायांकन गिरीश गंगाधरन यांचे आहे आणि संकलन फिलोमिन राज यांचे आहे. १७० मिनिटांचा हा चित्रपट ४०० करोड बजेटमध्ये बनवण्यात आला होत आहे आणि तो संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगू भाषेत डब सुद्धा रिलीज करण्यात आला आहे.

स्टोरी & स्क्रीनप्ले:
कुली हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच्या उत्साहासाठी बनवलेला आहे सुपरस्टार रजनीकांत यांचे आकर्षक क्षण आणि नेत्रदीपक कृतींनी भरलेला चित्रपट आहे. जेव्हा तो त्या शक्तींचा वापर करतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडतो. देवाच्या मध्यवर्ती लढाईच्या पलीकडे जाताना कथा मंदावते. पहिला भाग पात्रांची उलघडा समजण्या अगोदर थोडासा मंदावतो आणि मधल्या भागात प्रभावी आणि पद्धतशीर पद्धतीने ट्विस्ट देतो आणि परत ट्विस्ट देतो असे अनेक ट्विस्ट आहेत जे पाहण्यास उत्सुकता वाढवते. दुसरा भाग एक चांगली जागा शोधतो, फ्लॅशबॅक भावनिकदृष्ट्या थक्क करणारे असतात.

कुली हा चित्रपट तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही अशी याची स्टोरी लाईन आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे आपण प्रेडिक्ट करू शकता नाही. आपल्याला वाटेल असे होईल पण तसे होत नाही. याचमुळे हा चित्रपट वेगळा ठरतो.

पॉवर हाउस या शब्दाला चित्रपटाच्या शेवटी महत्व येते. त्यामुळे पिक्चर च्या टायटलशी आपण कनेक्ट होतो.

दिग्दर्शन:
लोकेशचे LCU लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील “कैथी”, “विक्रम”, “लिओ” चित्रपटांचे यांचे उत्तम दिग्दर्शन केले आहे. त्याचसोबत आता त्यांचा कुली चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम प्रकारे केले आहे. स्टोरीलाईनअप भारी आहे. फायटिंग सीन, संवाद त्याचसोबत बॅकग्राऊंड उत्तम आहे. लोकेश कनागराज यांनी एका प्रेरणादायी ध्वनीचित्रफित आणि स्पर्शक्षमतेच्या जोरावर मस्कुलर सेट-पीस सादर केले आहेत. मेन व्हिलन मधील कधी कधी भय निर्माण होते. त्यात जरा वीक पणा आहे.

मागील कामांच्या तुलनेत: हे कैथी किंवा विक्रमपेक्षा व्यापक, अधिक मास-फॉरवर्ड आउटिंग आहे आणि त्या चित्रपटांपेक्षा थीमॅटिकदृष्ट्या कमी सुसंगत आहे.

किंगपिन ची नांव हे मार्वल ची “डेअरडेव्हिल्स” सीरीज मधला किंगपिन खलनायकाचे नांव असल्यासारखे वाटते. जे गुन्हेगारी जगतात खलनायक म्हणून “किंगपिन” हे नांव विख्यात आहे. दिग्दर्शकाने किंगपिन नाव का निवडले असावे.

परफॉर्मर्स:
रजनीकांत (देवा): त्यांचे हास्य, नजर जे प्रेक्षकांना घायाळ करते. सूक्ष्म हावभाव, भुवया उंचावणे, जलद क्रिया अशीच उत्तम स्टाईलस आहेत. फिल्म इंडस्ट्रीत त्यांना ५० वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले आहेत. तरी सुद्धा त्यांची ५० वर्षा पूर्वी ची स्टाईल अजूनहि कायम आहे.

नागार्जुन (सायमन): उत्कृष्ट संयमासह प्रभावी आहे परंतु शेवेच्या टप्प्यात जास्त भीती निर्माण होत नाही.

सौबिन शाहीर (दयाल): या पात्राला स्क्रीन टाइम जास्त भेटला आहे. सौबीन यांनी त्या पात्राचे सोनं केलं आहे. यांनी उत्तम अशी भूमिका केली आहे. त्या भूमिकेत क्रृरता, हिंसा, कधी बायकोचे प्रेम तर कधी फसवणुक सर्व प्रकारच्या कला दिसून येतात. त्याची उपस्थिती आर्किटाइप्सच्या पलीकडे राहते.

श्रुती हासन (प्रीती): तिच्या संवादातून एक भावनिक पोस्ट सारखे कलाकृती निर्माण होते जी त्यांनी उत्तम साकारली आहे.

उपेंद्र (कालीशा): उपेंद्र (कालीशा) बिना बोलता उत्स्फूर्तता व्यक्त करताना दिसतो.

सत्यराज (राजशेकर) : सत्यराज (राजशेकर) कथेच्या हृदयाला शक्ती देणाऱ्या मैत्रीचा स्तंभ म्हणून उभा आहे.

आमिर खान (दाहा): आमिर खान विशेष भूमिका म्हणून संभाषण सुरू करणारा कॅमिओ आहे. त्यांची एन्ट्री चांगली आहे.

पूजा हेगडे (मोनिका): पूजा हेगडे विशेष भूमिका म्हणून “मोनिका” गाण्यात डान्स केला आहे.

संगीत आणि पार्श्वसंगीत:
गाणी आणि बीजीएम: अनिरुद्धचे पार्श्वसंगीत उत्तम काम करते. संबंध वाढवते, लढाऊ स्फोटक, फायटिंग सीन आणि भावनिक सीन साठी आपण जोडले जातो. गाणी नाट्यमय प्रतिसादासाठी तयार केली आहेत. त्यातील “मोनिका” हे सोंग हिट आहे. जे प्रेक्षकांना सौबीन (दयाळ) आणि पूजा हेगडे (मोनिका) यांच्या डान्स वर फेमस झाले आहे. परंतु एकूणच साउंडट्रॅक हा चित्रपटाच्या “मास” डिझाइनसाठी एक प्रमुख साधन आहे.

छायांकन आणि दृश्ये:
कॅमेरा सीन उत्तम शूट केले आहेत. त्यातील कुऱ्हाडीचा सीन आहे, देवा च्या हातातून सायमन च्या हातात कुऱ्हाड जात असते तसा कॅमेरा मूव्ह होत जातो.

व्ही एफ एक्स (VFX): व्ही एफ एक्स बऱ्यापकी आहे. देवा आणि सत्यराज यांच्यातील पूर्वीचा कालावधी चांगला दाखवण्यात आले आहे. संशोधन मशीन चांगल्या प्रकारे दाखवले आहे.

प्रॉडक्शन डिझाइन: शिपयार्ड, गोदामे आणि कामगार निवासस्थाने राहण्यायोग्य वाटतात.

अंतिम निर्णय:
रजनीकांत यांचे स्क्रीन प्रेझेन्स, नाट्यमय मास क्षण, थरारक ॲक्शनपट आहे आणि त्याचसोबत अनिरुद्ध संचालित उत्तम बीजीएम आहे. कुली हा एक स्टार-चालित मोठा रिव्हेंज ड्रामा आहे जो ॲक्शन, स्वॅगर आणि काही उत्तेजक ट्विस्ट वर ट्विस्ट खुलासे देतो. रजनीकांतच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये नक्की पहावा असा आहे. सुपरस्टार रजनीकांत च्या जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे.

कुली हा लोकेश कनगरज सिनेमॅटिक युनिव्हर्स (LCU) चा भाग आहे का?
एलसीयू संबंधांबद्दल चर्चा निर्मात्यांनी नाकारली आहे. हा एक स्वतंत्र चित्रपट आहे. आणि त्यामुळे शेवटी पोस्ट क्रेडिट सीन साठी थांबायची गरज नाही.

रिलीजच्या दिवशी लाईव्ह अपडेट्स दरम्यान जोरदार आगाऊ बुकिंग आहे. पहाटे चे शो सुद्धा फुल होते. पहिल्या दिवसाच्या प्रमोशनची सुरुवात प्रभावी संख्या आणि एकूणच सकारात्मक प्रतिसादाने झालेली आहे.

ह्रतिक रोशन यांचा चित्रपट वॉर २ वर क्लीक करून पूर्ण रिव्यू वाचा.

कुली: द पॉवर हाउस” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.

लेखक स्टार रेटिंग:
कथेसाठी, दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २.४ स्टार देईन.

तुम्ही कुली: द पॉवर हाउस चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *