HomeActionCrimeDramaFilmsSouth Indian

के. जी. एफ. : प्रकरण – २ चित्रपट समीक्षा (२०२२) | KGF : Chapter- 2 Film review (2022)

Written by : के. बी.

Updated : मे 9, 2022 | 7:14 PM

के. जी. एफ. : प्रकरण – २ चित्रपट समीक्षा (२०२२) – यश, संजय दत्त, रविना टंडन, श्रीनिधी यांचा चित्रपट | KGF : Chapter 2 Film review (2022) Yash, Sanjay Datt, Ravina Tandan, Srinidhi Film

के. जी. एफ. : प्रकरण – २

२०२२   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – २ तास ४८ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, गुन्हेगारी, नाटक,                               “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.9 5   
लेखक                       : –  प्रशांत नील 
दिग्दर्शक                   : –  प्रशांत नील 
कलाकार                   : – यश, श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त, रविना टंडन, प्रकाश राज
KGFChapter2
K.G.F. : Chapter 2 Image source: @prashant_neel
निर्माता                      : –   विजय किर्गंदुर
संगीत                        : –  रवी बसुरुर
संपादक                    : – उज्वल कुलकर्णी 
प्रदर्शित तारीख         : –  १४ एप्रिल २०२२
वेळ                           : –  २ तास ४८ मिनिटे  
भाषा                         : – कन्नड,
डबिंग भाषा              :-  हिंदी, तेलुगू , तमिळ, मल्याळम  
देश                           : – भारत 
कथा :-   
           कोलार गोल्ड फिलड्स ( के. जी. एफ.) सत्ताधीश गरुडाची हत्या करून रॉकी ( के. जी. एफ.) चा सत्ताधीश बनतो. ( के. जी. एफ.) ची सत्ता मिळवण्यासाठी बरेच शत्रू अधीरा सोबत पुढे येतात, सरकार सुद्धा सुव्यवस्थेसाठी  के. जी. एफ. वर नजर ठेवून रॉकी च्या माघावर आहेत. यातून दोन्ही बाजूनी आलेल्या संकटाशी लढून रॉकी ला आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करायचे आहे.  
समीक्षा : – 
                के. जी. एफ.  प्रकरण – २ च्या अगोदर पहिले प्रकरण बघणे खूप आवश्यक आहे नाही तर तुम्हाला थोडीशी स्टोरी काही समजणार नाही. पण जे चाललंय ते समजेल त्यासाठी पहिले प्रकरण बद्दल थोडक्यात कथा जाणून घेऊ. 
           कोलार गोल्ड फिलड्स ( के. जी. एफ.) प्रकरण – १ पत्रकार आनंद इंगलंगी यांनी एल डोरोडॊ १९५१ ते २०१५ पर्यंत घडलेली कथा लिहिली आहे. त्या कथेला बंदी असून सुद्धा एका दूरचित्रवाहिणी ने ती कथा पत्रकार आनंद यांनाच  वाचण्यास सांगितली. मुंबईत शेट्टी च्या हाताखाली काम करत असलेला रॉकी ला  “पुरी बम्बई तेरी” अशी ऑफर अँड्रूज ने  दिल्यावर रॉकी गरुडा ला मारण्यासाठी बंगलोर ला येतो. गरुडाला मारायचा पहिला डाव फसतो. आता रॉकी ने दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ( के. जी. एफ.) च्या इलाखा मध्ये प्रवेश करतो. गरुडा सर्वसामान्य माणसांना खोदकाम  करण्यास भाग पाडत असतो. तेथील चारी बाजूने असलेले भयानक गार्ड्स काम नाही झाले कि  त्यांचावर अत्याचार करत असतात. रॉकी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधून अखेर सर्वांसमोर गरुडाला ठार मारतो. रॉकी लोकांचा देव बनतो. असा असलेला चित्रपट खुपच हिट झाला. सर्वजण  दुसरा पार्ट कधी येणार याची वाट पाहू लागले.
           कोलार गोल्ड फिलड्स  (के. जी. एफ.)  प्रकरण – २ मध्ये पत्रकार आनंद इंगलंगी यांची प्रकृती बिघडली ते लास्ट स्टेज  वर आहेत. दूरचित्रवाहिला पुढे काय झाले यात रहस्य आहे त्यामुळे पुढे कोण वाचणार तर त्यांचा मुलगा विजयेंद्र  पुढे कथा वाचतो.  रॉकी गरुडाला मारून के. जी. एफ. चा सत्ताधीश बनला. खाणीत काम करणारी प्रत्येक व्यक्ती आता आनंदाने काम करून राहत आहेत. काहीजण गार्डस चे शिक्षण सुद्धा घेत आहेत. रॉकीने राजेंद्र ची मुलगी रीना ला  त्यांच्याच अड्ड्यावरून घेऊन जातो.  के. जी. एफ. चा पहिला प्रमुख रक्षक अधीरा परत येतो सर्वजण घाबरतात . अधीरा आणि रॉकी दोघेही एकमेकांला एक एक जीवन दान देतात. (के. जी. एफ.) सत्ता काबीज करण्यासाठी काही राजेंद्र, अँड्रूज, शेट्टी, इनायत खलील, पांडियन सारखे  शत्रू कट रचतात. आणि त्याचबरोबर  सरकार पण आर्मी फोर्स पाठवून रॉकी च्या अटकेची तयारी करत आहेत. अशा संकटावर मात करून आपल्या आईला दिलेले वाचन पूर्ण करतो कि नाही ते तुम्ही चित्रपटांत पाहू शकता.
प्रशांत नील यांनी अप्रतिम असे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा, त्यातील सवांद खूप छान आहेत. लढाईचे सीन, ॲक्शन बघायला आल्हादायक वाटतात. झूम अँगल, स्लो मोशन, बघायला चांगले दिसतात.  छायांकन उत्तम प्रकारे करण्यात आले आहे. बॅग्राऊंड म्युजिक स्कोअर खूपच छान आहे. 
या चित्रपटांत मला एक सीन खूपच आवडला तो म्हणजे गन मशीन (बडी माँ ) मधून गोळ्या झाडतो एका पाठोपाठ एक  पोलीस गाडी हवेत उडते. ४ ५ मिनिटाच्या फायर नंतर मशीन गन  ची नळी ज्वलनशील बनते तेव्हा रॉकी सिगारेट काढून सिगारेट त्या ज्वलनशील नळीवर ठेवून पेटवतो. हा सीन बघायला मजा येते. थिएटर मध्ये या सीन दिसल्यावर बसलेल्या काही जणांनी शिट्ट्या सुद्धा वाजवल्या. केसांची स्टाईल, वाढवलेली दाढी चे स्टाईल, फिट असलेले कपड्यांची स्टाईल, बाईक, व डायलॉग  रॉकी नावाची जे कलाकृती प्रचंड हिट झाली. यश यांनी अप्रतिम रॉकी ची भूमिका पार पाडली.  गन मशीन चा सीन ट्रेलर मध्ये पण दाखवला आहे. संजय दत्त यांनी खलनायक अधीरा ची भूमिका अद्भुत होती. संजय दत्त यांनी यांनी साकारलेला अग्नीपथ मधला कांचा ची भूमिका बघितल्यावर मनामध्ये चीड येते, भीत वाटते, त्याचप्रमाणे के. जी. एफ.  : प्रकरण – २ मधील  आधिरा पाहिल्यावर क्रूर राक्षस, हातामध्ये तलवार घेऊ रक्ताची नदी वाहणारा, विनाशक, असे काही शब्दांनी वर्णन करू शकतो. जर तुम्ही वाय किंग इंग्लिश वेबसेरीज पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल. आधिराचा लूक पाहिल्यावर तुम्हाला कदाचित वाय किंग वाय किंग इंग्लिश वेबसेरीज मधला रॅगनार लोथब्रोक चा  लुक असल्यासारखे भासते.  प्राईम मिनिस्टर रमिका सेन (रविना टंडन ) यांनी म्हंटलेला   “घूस के मारेंगे ” हा  डायलॉग जेव्हा कानी पडतो, पाहतो  तेव्हा पुढे रॉकी चे काय होणार…? हा प्रश्न निर्माण होतो. चित्रपटाच्या मध्यांतर च्या नंतर रविना टंडन यांचे बोलणे, भवनातील चालणे खूप प्रभावी होते. तिरस्कार, राग, आणि हळू हळू प्रेम भावना जागृत होणारी व्यक्तीरेखा  श्रीनिधी यांनी खुप चांगल्या प्रकारे रंगवली. 
यातील बंदुकीतील गोळी असो व बॉम्ब चा विस्फोट असो फाईटिंग जो सीन आहे तो उत्तम दर्शिवण्यात आला आहे, व्ही. एफ. एक्स टीम ने खूप मेहनत घेतली आहे असे दिसते. साऊंड इफेक्ट, बॅग्राऊंड म्युजिक उत्तम आहे. पहिल्या पार्ट मधील गाणी प्रचंड गाजली तेव्हढी प्रकरण दुसऱ्यातील गाणी जास्त हिट नाहीत. 
विशेष माहिती : – 

लास्ट सीन मध्ये तुम्हाला पार्ट ३ चा अर्धा हिस्सा दाखवून या चित्रपटाचा तिसरा पार्ट येणार आहे याची हिंट दिली आहे. 
के. जी. एफ.  : प्रकरण – ३ मध्ये रॉकी ने कोलार गोल्ड ची सत्ता आपल्या हातात घेतल्यावर, रॉकी फक्त भारतात च नाहीतर पूर्ण देशभर आपले जाळे पसरवण्यासाठी देशाबाहेर गेला आणि  त्यातूनच काही आंतरराष्ट्रीय स्तरातील  संघटनाचे शत्रूत्त्व निर्माण झाले. रॉकी ला शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय काही संघटना भारताशी संपर्क करतील. शी असण्याची शक्यता आहे. 
  
रेटिंग स्टार : दिग्दर्शन, अभिनय, बॅग्राऊंड म्युजिक, व्ही. एफ. एक्स. पाहून  या फिल्म साठी माझ्याकडून  ५ स्टार पैकी ३.९  
के. जी. एफ.  : प्रकरण – २  कुठे बघायचे… ?
थिएटर मध्ये जाऊन बघू शकता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *