HomeHindiSongs

गणेशोत्सवाची हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी

Written by : आकांक्षा कोलते

Updated : सेप्टेंबर 01, 2022 | 12:55 AM

आता सगळ्यांनाच आतुरता आहे ती बाप्पाच्या आगमनाची. बाप्पा येणार म्हटल्यावर आधीचे आठ दिवस सुद्धा मंतरलेले असतात. एक मंगलमय वातावरण निर्माण होतं. यातच भर असते ती म्हणजे बाप्पाची गाणी.

Ganesh Festival in Hindi movies 1

अगदी फार पूर्वीपासून म्हणजे जुन्या टेपरेकॉर्डर वर लोकं गाणी ऐकायचे तेव्हापासून बाप्पासाठी अनेक गाण्यांची रचना करण्यात आली. आणि मग नंतर नंतर चित्रपटांमध्ये सुद्धा गणपती बाप्पा वर असलेली बरीच गाणी चित्रित करण्यात आली. फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्या बाप्पावर आधारित बरीच गाणी चित्रित केली गेली.

आता चौकाचौकातच नाही तर अगदी घराघरांत सुद्धा  बाप्पाची ही गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. त्या गाण्यांमुळे तर वातावरणात विशेष चैतन्य निर्माण होतं. आजचा हा विशेष लेख त्यासाठीच. हिंदी चित्रपटातील बाप्पा वर चित्रित केली गेलेली काही लोकप्रिय गाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 ) देवा श्री गणेशा

वर्ष : २०१२  कालावधी : ५ मिनिटे २७ सेकंद
चित्रपट         : अग्निपथ
गायक           : अजय गोगावले
संगीतकार    : अजय – अतुल
कलाकार      : हृतिक रोश, प्रियांका चोप्रा

धरती अंबर सितारे, उसकी नज़रे उतारे

डर भी उससे डरा रे, जिसकी रखवालिया रे

करता साया तेरा

हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा….

सार्वजनिक गणेशोत्सव आणि स्पीकर वर वाजणारं गाणं आणि त्याच्या तालावर थिरकणारी तरुणाई, हे ठरलेलं समीकरण. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या “अग्निपथ” या चित्रपटात हृतिक रोशन याच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याची वेगळीच क्रेझ आहे.

अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या या गाण्याला संगीतबद्ध केले आहे अजय अतुल यांनी. अजय अतुल यांच्या संगीतामध्ये नक्कीच काहीतरी जादू असते. अजय गोगावले यांनी गायलेल्या या गाण्याने रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

 ) देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कौन

वर्ष : १९८१  कालावधी :  ७ मिनिटे २२ सेकंद
चित्रपट         : हमसे बढकर कौन
गायक           : म. रफी, आशा भोसले, भुपिंदर सिंग, सपन चक्रवर्ती, शैलेश सिंग
संगीतकार    : राम – लक्ष्मण
कलाकार      : मिथून चक्रवर्ती, अमजद खान, रणजीता, डॅनी

देवा हो देवा…गणपती देवा..

तुमसे बढकर कौन….

स्वामी तुमसे बढ़कर कौन

और तुम्हारे भक्तजनों में हमसे बढ़कर कौन…..?

हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे जेवढं की ते १९८१ साली झालं होतं. हिंदी चित्रपटांमध्ये बऱ्याचदा चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपण बाप्पा वर चित्रित झालेलं एखादं गाणं बघतो किंवा मग एखाद्या संकटप्रसंगी.‌कधी कधी विसर्जन मिरवणूकीवर चित्रित केलेली काही गाणी बघायला मिळतात.

मिथून चक्रवर्ती, अमजद खान, रणजीता, डॅनी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या “हमसे बढकर कौन” मधील हे गाणं विशेष लोकप्रिय झालं होतं. म. रफी, आशा भोसले, भुपिंदर सिंग, सपन चक्रवर्ती, शैलेश सिंग यांनी एकत्रितपणे गायलेलं हे गाणं संगीतबद्ध केले आहे राम – लक्ष्मण यांनी. रविंद्र रावळ यांची रचना असलेलं हे गाणं आताही सार्वजनिक गणेशोत्सवात हमखास ऐकू येतं.

 ) गणपती अपने गांव चले

वर्ष : १९९०  कालावधी : ६ मिनिटे २६ सेकंद
चित्रपट         : अग्निपथ
गायक          : कविता कृष्णमूर्ती, अनुपमा देशपांडे, सुदेश भोसले
संगीतकार    : लक्ष्मीकांत – प्यारेलाल
कलाकार      : अमिताभ बच्चन, मिथून चक्रवर्ती ,माधवी, रोहीणी हट्टंगडी, निलम कोठारी

अमिताभ बच्चन यांची हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख ज्या चित्रपटाने करून दिली तो म्हणजे १९९० साली प्रदर्शित झालेला “अग्निपथ”. या चित्रपटाने अनोखे रेकॉर्ड केले. लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या या चित्रपटातील हे गाणं सुद्धा तेवढंच लोकप्रिय झालं होतं.

“गणपती अपने गांव चले….

कैसे हमको चैन पड़े…

जिसने जो माँगा उसने वह पाया

रस्ते पे हैं सब लोग खड़े”

बाप्पा आपला निरोप घेऊन जातो तेव्हा आपल्याला खरचं चैन पडत नाही. तो पुढच्या वर्षी येणार हे माहीत असूनही त्याचं विसर्जन करणं हा न आवडणारा सोहळा असतो. तोच या गाण्यात दाखवण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन, मिथून चक्रवर्ती ,माधवी, रोहीणी हट्टंगडी आणि निलम कोठारी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात बाप्पाला विसर्जन करण्यासाठी घेऊन जाताना मिथुन आणि निलम यांचं नृत्य बघायला मिळतं. कविता कृष्णमूर्ती, अनुपमा देशपांडे आणि अमिताभ यांच्या आवाजासाठी अर्थात सुदेश भोसले यांनी हे गाणं गायलं आहे.

४ शेंदूर लाल चढ़ायो

वर्ष : १९९९  कालावधी :  ३ मिनिटे ८ सेकंद
चित्रपट         : वास्तव : द रिॲलिटी
गायक           : रविंद्र साठे
संगीतकार    : जतीन पंडित
कलाकार      : संजय दत्त, नम्रता शिरोडकर, मोहनीश बेहल, शोवजी साटम, संजय नार्वेकर

शेंदूर लाल चढ़ायो…अच्छा गजमुख को

दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहार को

हाथ लिए गुदा लड्डु सनी सुखार को

महिमा कही ना जाय लगत हु पद को

जय देव जय देव….

वास्तव या चित्रपटात एका मंदिरात चित्रित करण्यात आलेली ही आरती सर्वांनाच आठवत असेल. खरं तर ही आरती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण या चित्रपटामुळे ती एका वेगळ्या ढंगात ऐकायला मिळाली .

वास्तव द रिॲलिटी हा १९९९ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीवर आधारित असा चित्रपट होता. त्या काळी बरेच गुंड, भाई यांच्यात मुंबईवर राज्य करण्यासाठी कुरघोडी होत होत्या.

ही आरती चालू असतानाच एका बाजूला मुंबई पोलिसांना आव्हान देणाऱ्या अशाच गुंडांचं एन्काऊंटर करतानाचं दृश्य बघायला मिळतं. ज्याप्रकारे या गाण्याला जतीन पंडित यांनी संगीतबद्ध केले आहे ते ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. रविंद्र साठे यांनी हे गाणं गायलं असून या चित्रपटासोबत या गाण्याला सुद्धा रसिकांच्या मनात वेगळं स्थान आहे.

 ) एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि

वर्ष : २००५  कालावधी :  मिनिटे ४२ सेकंद
चित्रपट         : विरूद्ध
गायक           : शंकर महादेवन
संगीतकार    : अजय – अतुल
कलाकार      : अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, जॉन अब्राहम

हिंदी चित्रपटांमध्ये बऱ्याचदा कथेला वळण देताना ते एखाद्या बाप्पावर चित्रित केलेल्या गाण्यातून ती कथा सांगितली जाते. किंवा चित्रपटाची सुरुवात एखाद्या गणेशाच्या गाण्याने केली जाते. आणि मग बाप्पावरील ते गाणं विशेष लोकप्रिय होतं हे सांगायला नकोच. हे गाणं सुद्धा अतिशय लोकप्रिय झालं.

अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेला “विरूद्ध : फॅमिली फर्स्ट” हा चित्रपट २००५ साली आला होता. त्यातील गणेश स्तुती असलेलं हे गाणं शंकर महादेवन यांनी गायलं असून अजय – अतुल गोगावले या भन्नाट जोडीने संगीतबद्ध केलं आहे.

 ) सुखकर्ता दुःखहर्ता

वर्ष : २०१७  कालावधी : ६ मिनिटे ५५ सेकंद
चित्रपट         : सरकार ३
गायक           : अमिताभ बच्चन
संगीतकार    : रोहन विनायक
कलाकार      : अमिताभ बच्चन

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची…

बाप्पाची आरती…नुसती कानावर पडली तरी आपसूकच हात जोडून टाळ्या वाजवतो आपण. आतापर्यंत हीच आरती बऱ्याच गायकांनी गायली आहे.  वेगवेगळ्या संगीतकारांनी विविध चालींमध्ये ती आपल्यासमोर सादर केली आहे. आणि प्रत्येक वेळी ती आपल्याला तेवढीच जवळची वाटते आणि आवडते.

२०१७ साली प्रदर्शित झालेल्या सरकार ३ या चित्रपटात सुद्धा आपल्या बाप्पाची आरती बघायला मिळते. इथे ती गायली आहे स्वतः अमिताभ बच्चन यांनी. आणि संगीत दिले आहे रोहन विनायक यांनी.

७ ) गजानना गजानना…

वर्ष : २०१५  कालावधी : ३ मिनिटे ३१ सेकंद
चित्रपट         : बाजीराव मस्तानी
गायक           : सुखविंदर सिंग
संगीतकार    : श्रेयस पुराणिक
कलाकार      : रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा

गणपती येतात ते आठ दिवस तसे मंतरलेलेच असतात. या दिवसांमध्ये एक वेगळाच जोश संचारलेला असतो. वातावरण अतिशय मंगलमय आणि प्रसन्न असतं.

खरं तर वर्षाच्या बाराही महिने बाप्पाची आराधना केली जाते. आपण रोज बाप्पाची पूजा करतोच की. पण चित्रपटांमध्ये मात्र ही पूजा अतिशय साग्रसंगीत आणि एखाद्या साजेशा गाण्यातून दाखवली जाते.

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात सुद्धा बाप्पाची सुंदर आरती करताना दाखवली आहे. या गाण्याची रचना प्रशांत इंगोले यांनी केली असून सुखविंदर सिंग यांनी ती भारदस्त आवाजात गायली आहे. रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित केलीली ही आरती सार्वजनिक गणेशोत्सवात नक्कीच ऐकू येते.

८ ) रे बाप्पा तू 

वर्ष : २०१६  कालावधी :  ३ मिनिटे २७ सेकंद
चित्रपट         : बँजो
गायक           : विशाल दादलानी
संगीतकार    : विशाल – शेखर
कलाकार      : रितेश देशमुख, नर्गिस फाकरी, धर्मेश येलांडे 
 
रे बापा तू …
रे विघ्नहर्ता….. रे बाप्पा विघ्नहर्ता…….
 
        हे हिंदी गाणे बॅन्जो या चित्रपटातील आहे. विशाल शेखर यांचे अफलातून संगीत. विशाल यांनीच ते गाणे गायले आहे. रितेश देशमुख आणि धर्मेश यांनी बॅन्जो आर्टिस्ट भूमिका केली आहे.  सुरुवातीच्या बँजो चा आवाज ऐकल्यावर पाय आपोआपच हालू लागतात. उभे राहून नाचू असे वाटते. आणि त्यातील गाण्याचे बोल आपल्या आपल्या बाप्पाला आपण हाक मारतो आहे असे वाटते.

 

 ) सड्डा दिल वी तू (ग ग गणपती)

वर्ष : २०१३  कालावधी : ६ मिनिटे ५९ सेकंद
चित्रपट         : एबिसीडी – एनिबडी कॅन डान्स
गायक           : हर्द कौर
संगीतकार    : सचिन – जिगर
कलाकार      : प्रभू देवा, के के मेनन, गणेश आचार्य, धर्मेश येलांडे, सलमान युसुफ खान, नुरीन शा,

ग ग ग गणपती बाप्पा मोरया…

लेट में हीयर, यू से बाप्पा मोरया…

ग ग ग गणपती बाप्पा मोरया…

बाप्पाला सगळ्या भाषा समजतात. म्हणूनच या गाण्यात हिंदी, पंजाबी, मराठी इतकंच काय इंग्लिश सुद्धा सगळेच शब्द आहेत. नृत्य या कलेवर आधारित हा सिनेमा २०१३ साली आला होता. दोन गटांमध्ये नृत्याची स्पर्धा चालू असताना आपली सत्याची बाजू असेल तर बाप्पा सुद्धा आपल्याच सोबत असतो हे दाखवणारं हे गाणं आहे.

मयूर पुरी यांनी हे गाणं लिहिलं असून सचिन – जिगर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला गायलं आहे ते हर्द कौर यांनी. डान्सर लोकांना विशेष आवडणारं हे गाणं तसं सगळ्यांनाच थिरकायला लावतं.

१० ) शंभू सुताय

वर्ष : २०१३  कालावधी :  ३ मिनिटे ३५ सेकंद
चित्रपट         : एबिसीडी – एनिबडी कॅन डान्स
गायक           : सचिन, जिगर, विशाल ददलानी, शंकर महादेवन
संगीतकार    : सचिन – जिगर
कलाकार      : प्रभू देवा, धर्मेश येलांडे, सलमान युसुफ खान

डान्सची क्रेझ, सळसळतं तरुण रक्तं,  ढोलताशांच्या गजरात चालू असलेलं गाणं आणि बाप्पाची मिरवणूक म्हणजे फक्त जल्लोष आणि धमाल.

एबिसीडी या चित्रपटात बाप्पाच्या मिरवणूकीवर चित्रित झालेलं हे गाणं गणेशोत्सवात चौकाचौकात मोठमोठ्या डॉल्बी सिस्टीम वर ऐकताना पाय आपोआप ताल धरतात.

सचिन, जिगर, विशाल ददलानी आणि शंकर महादेवन यांनी गायलेल्या या गाण्याला सचिन जिगर यांनीच संगीतबद्ध केले आहे.

तर मंडळी बाप्पाच्या या गाण्यांपैकी तुमचं आवडतं गाणं कोणतं ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा.

उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना ‘जगभरून फिल्म्स ‘ तर्फे हार्दिक शुभेच्छा!

११ ) मोरया मोरया रे

वर्ष : २००६  कालावधी :  ४ मिनिटे २७ सेकंद
चित्रपट         : डॉन
गायक           : शंकर महादेवन
संगीतकार    : शंकर – एहसान-लॉय
कलाकार      : शाहरुख खान

तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा….

अगले बरस आना है,आना ही होगा….

या गाण्यात थिरकला आहे तो “बॉलिवूडचा किंग खान – शाहरुख खान”. २००६ साली प्रदर्शित झालेल्या डॉन या चित्रपटातील हे गाणं शंकर महादेवन यांनी गायलं आहे.  विसर्जनाच्या वेळी बाप्पाला “पुढच्या वर्षी लवकर या” हे आपण सगळेच सांगतो. चित्रपटांमध्ये मात्र हेच सांगणं असं एखाद्या छान गाण्यातून दाखवलं जातं.

डॉन चित्रपटातील बाप्पा वर चित्रित झालेल्या या गाण्याची रचना जावेद अख्तर यांनी केली असून शंकर – एहसान-लॉय या तिघांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

धन्यवाद.

लेखक – आकांक्षा कोलते

Akanksha 20Kolte 20bio

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *