Films NewsFilmsHindiHome

गदर २ व ओएमजी २ बॉक्स ऑफिस कलेक्शन | “गदर २” चित्रपट अक्षरशः गदर करत सुपर फास्ट धावत आहे आणि “ओएमजी २” चित्रपट सुद्धा त्या सुपर फास्ट रुळावरून धावत आहे.

Written by : के. बी.

Updated : ऑगस्ट 20, 2023 | 11:12 PM

Gadar 2 and Omg 2 movie information and review and Record breaking earnings information

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर २ हा चित्रपट ११ ऑगस्ट ला रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत. आजचा दुसरा रविवारी हि चित्रपट पाहण्यास गर्दी होत आहे. प्रेक्षकांनी सिनेमा हॉल मध्ये भरलेला दिसत आहे. गदर २ चे बजेट अंदाज ८० करोड रुपये आहे. आजचा दुसरा रविवारी ३५ ते ४० करोड रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. आता पर्यंत “गदर २” ने जगभरात ४०० करोड चा गल्ला पार केला आहे आणि इंडिया मध्ये ३७६ करोड रुपये कमाई केली आहे. अशी गर्दी पुढेही राहिली तर नक्कीच पुढच्या हप्त्या पर्यंत जगभरात ५०० करोड पार करू शकतो.

“गदर २” चित्रपटाची पूर्ण समीक्षा वाचा : –

गदर २ : द कथा कंटिन्यूज चित्रपट समीक्षा | परत एकदा सनी देओल गदर करताना

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ओएमजी २ हा चित्रपट ११ ऑगस्ट ला रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत. ह्या चित्रपटाने सुद्धा बाजी मारली आहे. अजून पण सर्व शोज फुल आहेत. आजच्या दुसऱ्या रविवारी १३ करोड ची कमाई केली आहे. आता पर्यंत ओएमजी २ ने ११४ करोड ची कमाई केली आहे. जगभरात १४२ करोड ची कमाई केली आहे. याच्या अगोदर अक्षय कुमार यांचा “सेल्फी” चित्रपट आला तो काही चालला नाही. २०२२ मधील सहा चित्रपट त्यांनी नायक म्हणून काम केले त्यातील एकाही चित्रपटाने जास्त काही कमाई केली नाही. काहींनी तर बजेट ची अर्धी रक्कम पण पार नाही केली. असो “ओएमजी २” चित्रपटाने त्यांना पुन्हा एकदा हिट बनवले. सोबत गदर २ असताना सुद्धा ओएमजी २ चित्रपटाने दहा दिवसानंतर हि चांगली कमाई केली आहे. म्हणून ओएमजी २ चित्रपट हि सुपेरहीट च्या यादीत बसला आहे.

“ओएमजी २” चित्रपटाची पूर्ण समीक्षा वाचा : –

ओएमजी २ फिल्म समीक्षा | संवेदनशील ( लैंगिक शिक्षण ) विषय वर आधारित एक शिकवण देणारी फिल्म

याच सोबत ११ ऑगस्ट ला चिरंजीवी, तमन्ना भाटीया आणि कीर्ती सुरेश यांचा “भोला शंकर” तेलुगु चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाची काही जादू चालली नाही. बजेट च्या अर्धी रक्कम सुद्धा कमाई करू शकला नाही.

सुपरस्टार रजीनिकांत सर यांचा “जेलर” तमिळ चित्रपट १० ऑगस्ट ला रिलीज झाला. त्या चित्रपटाने जगभरात ५०० करोड ची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

तुम्ही गदर २“ओएमजी २” चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *