छत्रपती शिवाजी (1952) – मराठी चित्रपट | Chatrapati Shivaji (1952) – Marathi Movie
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 15, 2022 | 5:39 PM
छत्रपती शिवाजी (1952)
सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास ३६ मिनिटे
शैली : – नाटक, जीवन चरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.3✰ / 5✰
दिग्दर्शक : – भालजी पेंढारकर
निर्माता : – भालजी पेंढारकर
छाया : – गणपत शिंदे
कलाकार : – ललिता पवार, चंद्रकांत, जागिरदार, बाबुराव पेंढारकर, आळतेकर, मा. विठ्ठल, लीला, वनमाला, शकुंतला, रत्नमाला, रंजना,
Chatrapati Shivaji (1952) |
संगीत : – सी. रामचंद्र
गायक : – लता मंगेशकर, चितळकर.
प्रदर्शित तारीख : – १९५२
वेळ : – २ तास ३६ मिनिटे
भाषा : – मराठी
देश : – इंडिया
कथा :-
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले माता जिजाऊ यांच्या पुत्र शिवाजी यांचे बालपण, औरंगजेब च्या कैदेतून पलायन, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक पर्यंत घडलेला जीवन प्रवासाचा इतिहास दाखवला आहे.
समीक्षा : –
मी लहान असताना शेजारच्या घरात ब्लॅक अँड व्हाईट टी. व्ही. असायचा. त्या ब्लॅक अँड व्हाईट ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पिक्चर लागणार होता. “छत्रपती शिवाजी” असे त्या चित्रपटांचे नांव होते. त्यांची महान कार्य आम्ही चौथी च्या पुस्तकामध्ये वाचले, आणि ऐकले होते. ते आता आम्हाला डोळ्याने पाहायला भेटणार यामुळे खूप खुश होतो. पण लाइट जावू नये यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना सुद्धा केली कि “देवा आज काय पिक्चर संपे पर्यंत लाईट जाऊ देऊ नकोस.” त्या दिवशी मी तो चित्रपट बघितला.
हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट आहे. ललिता पवार, चंद्रकांत, जागिरदार, बाबुराव पेंढारकर, आळतेकर, मा. विठ्ठल, लीला, वनमाला, शकुंतला, रत्नमाला, रंजना, यांनी चांगल्या प्रकारे भूमिका साकारल्या आहेत राजदरबार, महालातील आतील रचना, त्यांच्या वेशभूषा अप्रतिम दाखवली आहे. सी. रामचंद्र यांनी संगीत दिले आहे. लता मंगेशकर, चितळकर यांनी गाणी गायली आहेत. काही काळानंतर छत्रपती शिवाजी हा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट कलर मध्ये पण बनवण्यात आला आहे. “छत्रपती शिवाजी” चित्रपट रंगीत मध्ये तुम्ही यु ट्यूब वर पाहू शकता.
कुठे बघायचे : –
“छत्रपती शिवाजी” हा चित्रपट यु ट्यूब वर पाहू शकता.