HomeFilms News

जगातील मुव्ही इतिहास – जगातील पहिला चित्रपट, पहिला चित्रपट प्रदर्शन, पहिला फिचर चित्रपट, पहिला रंगीत चित्रपट, पहिला ध्वनी चित्रपट | World Movie History – World’s first film, first film exhibition, first feature film, first color film, first sound film

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 1, 2022 | 6:41 PM

          प्रत्येकजण  चित्रपट पाहत असतो पण चित्रपटाची सुरुवात कशी झाली. हे सगळ्यांनाच माहित आहे असं नाही. कदाचित कोणत्या तरी परीक्षे मध्ये नाही तर कोण बनणार मराठी करोडपती मध्ये हा प्रश्न विचारला तर…  चटकन सांगून पटकन तुम्ही एक पायरी चढाल नाही का…? त्यासाठी माहिती करून घेणं आणि ती वाचणं खूप चांगली गोष्ट आहे. म्हणूनच थोडीशी माहिती तुमचे ज्ञान वाढवू शकते. आता पाहूया चित्रपटांची सुरुवात कशी झाली.           

World%20Movie%20History
World Films History

चित्रपटाची ची सुरवात कशी झाली.?  

  1. जगातील पहिला मोशन पिक्चर – 1878
  2. जगातील पहिला चित्रपट – 1888
  3. जगातील पहिला मोशन  पिक्चर व्हिव कॅमेरा – कायनेटोग्राफ 1890, म्यूटोस्कोप 1894
  4. जगातील प्रथम चित्रपट प्रदर्शन – सिनेमॅटोग्राफ 1895, बायोस्कोप – 1895
  5. जगातील पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या – 1896
  6. ग्रॅन्डफादर ऑफ स्पेशल इफेक्ट – 1896
  7. जगातील पहिला फिचर चित्रपट – 1906
  8. जगातील पहिला रंगीत चित्रपट – 1917
  9. ध्वनी चित्रपट – १९२७
  10. फिल्म इंडस्ट्री


जगातील पहिला मोशन पिक्चर

ईडवेर्ड मुयब्रिज  ( Eadweard Muybridge ) यांनी 19 जून 1878 मध्ये “द हॉर्स इन मोशन” ( The Horse in Motion ) हा पहिला मोशन पिक्चर निर्माण कारण्याचे काम केले. 

          ईडवेर्ड मुयब्रिज ( Eadweard Muybridge ) ब्रिटीश फोटाग्राफर होते. त्यावेळी “झूप्रॅक्सिस्कोप”(Zoopraxiscope) तंत्राचा वापर केला. एक वूमन पायरी वरून खाली चालत येत आहे याचे फोटोग्राफिक केलेला एक मोशन स्टडी करण्यासाठी ईडवेर्ड मुयब्रिज यांनी क्रोनोफोटोग्राफिक (Chronophotographic) चा वापर केला. 

घोडा पळताना काही क्षणापर्यंत त्याचे चारही पाय हवेत स्तिर राहतात कि नाही हे  दाखवण्यास एक प्रयोग चालू केला. एका रेसट्रॅक वर जाऊन रेसट्रॅक च्या बाजूनी  कॅमेरा असे लावले होते कि घोडेस्वारी करताना प्रत्येक कॅमेरा घोडेस्वारी च्या प्रत्येक हालचाली च्या प्रतिमा काढता येईल अश्याप्रकारे लावण्यात आले होते. अश्या टिपलेल्या छायाचित्रातून घोड्याचे पाय काही क्षणासाठी का होईना ते हवेत स्तिर राहतात असे या संशाधनातून सिद्ध झाले. मोशन पिक्चर ला चालना मिळाली.


जगातील पहिला चित्रपट

14 ऑक्टोबर 1888 साली “राउंडहे गार्डन सीन” (Roundhay Garden Scene) हा जगातील पहिला चित्रपट होता.  

          लुइस ले प्रिन्स (Louis Le Prince)  हे एक फ्रेंच संशोधक होते. त्यांनी लंडन मधील ओकवूड ग्रेन्ज (Okwood Grange) राउंडहे (Roundhay)  उपनगरात  “राउंडहे गार्डन सीन” (Roundhay Garden Scene) नावाचा हा जगातील पहिला चित्रपट निर्माण केला. या फिल्म मध्ये कोणताही आवाज नव्हता ती एक सायलेंट फिल्म होती कारण त्यावेळी तसले तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. यात सिंगल लेन्स कॅमेरा चा वापर करण्यात आला होता. हा चित्रपट 1.66 सेकंड वेळेचा बनवला होता. “राउंडहे गार्डन सीन” (Roundhay Garden Scene) फिल्म जगातील पहिली शॉर्ट फिल्म आहे आणि हि फिल्म एक ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. या शॉर्ट फिल्म नंतर नवनवीन शॉर्ट फिल्म बनवण्यास सुरुवात झाली. 



जगातील पहिला मोशन पिक्चर व्हिव कॅमेरा

1890 साली थॉमस एडिसन (Thomas Edison) आणि विल्यम डिक्सन (William Dickson) यांनी पहिला मोशन पिक्चर कॅमेरा बनवला होता. त्याचे नाव  कायनेटोग्राफ (Kinetograph) ठेवले गेले. पुढच्याच  वर्षी 1891 साली थॉमस एडिसन यांनी कायनेटोस्कोप (Kinetoscope)  चा शोध लावला. कायनेटोस्कोप च्या पिफोल व्हिवर विंडो (Peephole Viewer Window) मधून व्यक्ती पाहू शकते. 1893 साली  ब्रूकलिन इन्स्टिटयूट ऑफ आर्टस् अँड सायंस (Brooklyn Institute of Arts and Science ) येथे थॉमस एडिसन यांनी कायनेटोस्कोप चे पहिले सार्वजनिक प्रदर्शन भरवण्यात आले. 21 नोव्हेंबर 1894 साली स्कॉटिश संशोधक डब्लू. के, एल. डिक्सन (W.K.L. Dickson) आणि अमेरिकन संशोधक हर्मन कॅसल (Herman Casle) यांनी “म्यूटोस्कोप” (Mutoscope) चा शोध लावला. म्यूटोस्कोप हे एक मोशन पिक्चर चे साधन आहे. कायनेटोस्कोप प्रमाणेच म्यूटोस्कोप मध्ये ऐकावेळी एकच व्यक्ती पाहू शकते.

        

जगातील प्रथम चित्रपट प्रदर्शन

22 मार्च 1895 साली ऑगस्टे लुमिअर (Auguste Lumiere) आणि लुइस लुमिअर ( Louis Lumiere )  या लुमिअर बंधूनी (Lumiere Brothers)  ग्रँड कॅफे, पॅरिस मध्ये जगातील पहिली फिल्म स्क्रीन वर प्रदर्शित केली. त्यांनी सिनेमॅटोग्राफ (Cinematograph) नावाचा मुव्ही प्रोजेक्टर बनवला होता. मुव्ही प्रोजेक्टर म्हणजे मोशन पिक्चर फिल्म एखाद्या स्क्रीन वर सादर करणे. यातून पाहण्यारानी पैसे हि देऊ केले . या लुमिअर बंधूनी सादर केल्याला जगातील पहिल्या सार्वजनिक स्क्रिनिंग पासून व्यवसाय करण्यास सुरुवात झाली. याठिकाणी 10 शॉर्ट फिल्म सादर करण्यात आले होते. त्यांनी वेगवेगळ्या देशात जाऊन केलेल्या फिल्म चे प्रदर्शनही केले.

 

लुमिअर बंधूनी त्यांच्या फिल्म मध्ये काय आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी फिल्म चे पोस्टर” बनवले होते. हे जगातील पहले पोस्टर असावे. जसे आता च्या युगात  फिल्म प्रेक्षकांसाठी दाखवण्याच्या अगोदर एक आकर्षक पोस्टर तयार करत असतात, जेणे करून लोकांना त्या फिल्म मधून काय पाहायला मिळणार ते थोडक्यात त्या पोस्टर वरून समजून प्रेक्षककांनी ती फिल्म पाहण्यासाठी आवर्जून यावेत आशिच भावना प्रत्येक चित्रपट निर्माता पाहतो.

बायोस्कोप” (Bioscop) – स्क्लाडानोव्स्की बंधू

1895 मध्ये जर्मन संशोधक आणि चित्रपट निर्माते मैक्स स्क्लाडानोव्स्की  (Max Skladanowsky) आणि त्यांचे भाऊ इमिल स्क्लाडानोव्स्की (Emil Skladanowsky) या स्क्लाडानोव्स्की बंधूनी बायोस्कोप” (Bioscop) चा शोध लावला. या बायोस्कोप चा वापर करून नोव्हेंबर 1895 मध्ये स्क्लाडानोव्स्की बंधूनी तयार केल्याला फिल्म चे प्रदर्शन केले. 


बौअर्नटांज ज़्वियर किंडर
 डाई सर्पेंटिन्टेन्झेरिन

दास बॉक्सेंडे कानगुरु

स्क्लाडानोव्स्की बंधूनी अशा वेग वेगळ्या  प्रकारच्या अनेक ब्लॅक अँड व्हाईट सायलेंट शॉर्ट फिल्म तयार करून त्यांनी प्रेक्षकांना दाखवल्या. 

लुमिअर बंधूनी व स्क्लाडानोव्स्की बंधूनी यांनी एकाच जागेवर कॅमेरा ठेवून वरील सर्व फिल्म चे चित्रीकरन हे एकाच शॉट मध्ये बनवण्यात आले आहेत.

जगातील पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या. 

ॲलिस गाय-ब्लाच (Alice Guy-Blache) फ्रेंच मधील  जगातील पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शक होत्या. त्यांनी पहिला कथात्मक आणि काल्पनिक चित्रपट निर्माण केला. ॲलिस गाय-ब्लाच ह्या जगातील पहिल्या महिला चित्रपट निर्मात्या होत्या. 1896 मध्ये “द फेरी ऑफ द कॅबेजेस” (The Fairy of the Cabbages) हा चित्रपट एका महिलेने दिग्दर्शन केलेला जगातील पहिला चित्रपट होता.

ग्रॅन्डफादर ऑफ स्पेशल इफेक्ट 

जॉर्जेस मेलिस  ( Georges Melies )  एक फेंच जादूगार होते. जादू करून दाखवत असत. जॉर्जेस मेलिस यांनी ल्युमिअर चे फिल्म पहिल्या नंतर त्यांच्या डोक्यात कप्लना सुचू लागल्या. ल्युमिअर बंधूनी त्यांचे उपकरण मागितले तेव्हा त्यांनी देण्यास नकार दिल्यावर जॉर्जेस मेलियस लंडनला गेले. त्यांनी एक सिनेमॅटोग्राफ खरीदी केला त्याच्यात त्यांनी आपल्या पद्धतीने शोध करून एक नवीन कॅमेरा तयार केला. त्या उपकरनामध्ये आवाज येत असल्याने त्यांनी त्याचे “मशीन गन” असे नांव  ठेवले. 

1896 मध्ये जॉर्जेस मेलिस यांनी “प्लेयिंग कार्ड्स” (Playing Cards) हि त्यांची पहिली डॉक्युमेंटरी फिल्म निर्माण केली. त्यांनी फिल्म बनवण्यासाठी एक सेट उभारला. त्यांच्या हे लक्ष्यात आले कि कॅमेरा एकदा थांबला आणि परत चालू केला असता दर्शकांना ते समजून येत नाही कि कॅमेरा थांबला आहे. फिल्म बनवण्यासाठी स्टोरीबोर्ड चा उपयोग करू लागले. आणि सेट अप तयार केला. तसे स्टुडिओज निर्माण होऊ लागले. चित्रपटांचा वेळ वाढवला. 1896 साली “द व्हॅनिशींग लेडी” (The Vanishing Lady), 1898 साली द फोर ट्रबलसम हेडस (The Four Troublesome Heads), 1900 साली “जोन ऑफ आर्क” (Joan of Arc), १९०२ साली “अ ट्रिप टू द मून” (A Rrip to the Moon) ह्या शॉर्ट फिल्म तयार केल्या. त्यांनी ५०० हुन अधिक चित्रपट तयार केले. त्यांच्या प्रत्येक फिल्म मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेडी, साहसी कथा , विज्ञान कथा, असत. त्यांनी आपल्या फिल्म मध्ये काही रंगाचे तर वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट देऊन त्यांनी फिल्म जगात नवीन कल्पना आणली. म्हणून त्यांना  ग्रॅन्डफादर ऑफ स्पेशल इफेक्ट म्हणतात.


 वेगळे मुव्ही शॉट

1903 साली अमेरिकन एडविन एस. पोर्टर (Edwin S. Porter) यांनी एडिसन कंपनीसाठी एक मुव्ही बनवला. त्या चित्रपटाचे नावं होते “द ग्रेट ट्रेन रोबरी ” (The Great Train Robbery). ह्या चित्रपटासाठी २० शॉट घेण्यात आले आणि त्याचे शूट पण वेगवेगळ्या ठिकाणी इनडोअर आणि आऊटडोअर जसे आजच्या काळात शूट होते तसे. या मुव्ही चा कालावधी १२ मिनिट पर्यंत होता. या फिल्म मध्ये शॉट कट करणे आणि ईडिटिंग पद्धत पहिल्यांदाच वापरण्यात आले.

जगातील पहिला फिचर चित्रपट 

1906 मध्ये ऑस्ट्रेलियन चार्ल्स टेट (Charles Tait) यांनी “द स्टोरी ऑफ द केली गॅंग” (The Story of the Kelly Gang) हा जगातील पहिला फिचर लांबीचा मूक चित्रपट बनवला. हा जगातील पहिला फिचर लांबीचा चित्रपटाचे रनिंग वेळ १ तासाचे होते.

त्यांनतर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची जास्त आवड निर्माण झाली. यामुळे काही ठिकाणी सायलेंट चित्रपट स्टुडिओज स्थापन होऊ लागले. त्यातून अनेक वैशिष्ट्य मूक चित्रपट निर्माण करायला सुरुवात झाली. पहिले महायुद्ध सुरु झाले. या महायुद्धाच्या काळात सुद्धा भारतात 1913 मध्ये “दादासाहेब फाळके” (Dadasaheb Phalke) यांनी “राजा हरिश्चंद्र” (Raja Harishchandra) हा वैशिष्ट्य मूक माहितीपट चित्रपट बनवला. या वैशिष्ट्य फिल्म ची रनींग वेळ 40 मिनिट होती. 1915 साली “द बर्थ ऑफ अ नेशन” (The Birth of a Nation) नावांचा मूक नाटक चित्रपट बनवला. या चित्रपटाचे दिग्दर्शन डी. डब्लू. ग्रिफिथ (D. W. Griffith) यांनी केले. या फिल्म ची रनींग वेळ 193 मिनिट होती.

लेखक, निर्माता, अभिनेता, संगीतकार, संपादक, दिग्दर्शक, सर्वगुण संपन्न असणारे “चार्ली चॅप्लिन” Charlie Chaplin) सर्वाना माहीतच आहे. 1921 साली “द कीड” (The Kid) मूक विनोदी – नाटक चित्रपट बनवला होता. दिग्दर्शक म्हणून त्यांचा द कीड” हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट होता. द ट्रॅम्प” (The Tramp) हे त्यांचे अजरामर पात्र. जे कोणीच विसरू शकत नाही.

जगातील पहिला रंगीत चित्रपट 

1895 मध्ये एडिसन कंपनी ने हातानी रंगवलेला पहिला चित्रपट बनवला होता. जॉर्जेस मेलियस च्या चित्रपटामधून पण हातानी रंगकाम केलेले दिसते. 

1906 जॉर्ज अल्बर्ट स्मिथ (George Albert Smith) यांनी “कायनेमाकलर” (Kinemacolor) चा शोध लावला. यामध्ये फक्त लाल आणि हिरवा या २ कलर चा समावेश होता. 1906 मध्ये त्यांनी एक टेस्ट म्हुणुन “टारटन्स ऑफ स्कॉटिश क्लॅन्स” (Tartans of Scottish Clans) ४५ सेकंड ची कलर फिल्म बनवली. .  

1908 मध्ये जॉर्ज स्मिथ यांनी डायरेक्ट केलेला पहिला रंगीत लघुपट “अ व्हिजिट टू  द सिसाईड” (A Visit to the Seaside) कलर मध्ये बनवला. 

1912 साली “विथ और किंग अँड क्वीन थ्रो इंडिया” (With Our King and Queen Through India) या कायनेमाकलर चा वापर करून जगातील पाहिला वैशिष्टये रंगीत चित्रपट तयार केला. हा चित्रपट 150 मिनिटाचा होता.

1914 साली बोस्टन मध्ये टेकनीकलर (Technicolor) ची स्थापना झाली. पहिल्या प्रक्रिये नंतर टेकनीकलर मध्ये बऱ्याचशा सुधारणा होऊ लागल्या.

1917 मध्ये  टेकनीकलर चा वापर करून हा “द गल्फ बिटवीन” (The Gulf Between) हा जगातील पहिला वैशिट्य लांबीचा रंगीत चित्रपट बनवला. हा चित्रपट 58 मिनिटाचा होता.  टेकनिकलर ची तिसरी रंग प्रक्रिया हि एक उत्कृष्ट रंग दाखवणारी होती. पण हा चित्रपट हरवला आहे. टेकनिकलर ची तिसऱ्या रंगाची प्रक्रिया हि एक उत्कृष्ट रंगाची होती. द विझार्ड ऑफ ओज ( The Wizard of Oz – 1939)द ऍडव्हेंचरस ऑफ रॉबिन हूड  (The Adventures of Robin Hodd – 1938),  डाउन अर्जेन्टिन वे (Down Argentine Way – 1940) असे काही त्या काळात अश्याप्रकारे अनेक  रंगीत चित्रपट निर्माण होऊ लागले. 

ध्वनी चित्रपट

1937 साली वॉल्ट डिस्नी यांनी “स्नोव व्हाईट अँड द सेव्हन व्डॉर्फस” (Snow White and the Seven Dwarfs) हि पहिली व्यावसायिक साउंडट्रॅक फिल्म होती. पण हि एक ॲनिमशन फिल्म होती. ऑर्खेस्ट्रल (Orchestral)  पहिला साउंडट्रॅक अल्बम “रुड्यार्ड किपलिंग जंगल बुक” (Rudyard Kipling Jungle Book) हा होता. तुम्हाला माहीतच असेल जंगल बुक मधला मोगली. 

६ ऑक्टोबर १९२७ साली “विटाफोन” (Vitaphone) चा वापर करून “द जाझ सिंगर”(The Jazz Singer) हा जगातील पहिला बोलपट वैशिष्ट्ये लांबीचा चित्रपट बनवला होता. ॲलन क्रॉसलँड (Alan Crosland) यांनी दिग्दर्शन केलेला पहिला संगीत, गाणी आणि डायलॉगसह चित्रपट होता. वॉर्नर ब्रदर्स (Warner Bros.) यांनी निर्माण केले. आणि मग बोलके वैशिष्ट्ये लांबीचे चित्रपट निर्माण होऊ लागले.

फिल्म इंडस्ट्री

 भारतातील मुंबई मध्ये असणारी बॉलीवूड इंडस्ट्री (Bollywood Industry) आणि अमेरिका मध्ये हॉलिवूड इंडस्ट्री (Hollywood Industry) यासारख्या अनके देशातील चित्रपट इंडस्ट्री आहेत. जसे जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान पसरू लागले. तस तसे चित्रपट बनवण्यासाठी नवनवीन टेकनिक निर्माण होऊ लागले. चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचे या इंडस्ट्री वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट बनवू लागले आहेत. वेगवेगळ्या देशातील त्यांच्या भाषेतील निर्माण झालेलं चित्रपट डबिंग करून आपण आपल्या मूळ भाषेतून सुद्धा पाहत असतो. लघुपट (Short Movie), वैशिट्य लांबीचे चित्रपट(Feature Movie), टेलिव्हिजन वरील मालिका (TV Serial ), व्हिडिओ गाणे (Video Songs), आणि वेब सिरिज( Web Series). आताच्या काळात वेब सिरिज जास्त लोकप्रिय होत आहेत. अश्याच वेगवेगळ्या शैलीतल लघुपट, वैशिट्य लांबीचे चित्रपट, टेलिव्हिजन वरील मालिका, व्हिडिओ गाणे, आणि वेब सिरिज तुम्हाला बघायला मिळत होते, बघायला मिळत आहेत, पुढे पण बघायला मिळणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *