जवान चित्रपट ट्रेलर समीक्षा | ३ दिवसात ४ करोड (४० मिलियन) लोकांनी पाहिला
Written by : के. बी.
Updated : सप्टेंबर 03, 2023 | 06:11 PM
तीन दिवसापूर्वी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रस्तुत बहुचर्चित चित्रपट “जवान” चा ट्रेलर ३१ ऑगस्ट ला लाँच करण्यात आला. यु ट्यूब वर हा ट्रेलर २० तासा मध्ये २ करोड लोकांनी पाहिला होता. ३ दिवसात ४ करोड (४० मिलियन) व्हीव्ज मिळाले आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.
एक राजा था… असा डायलॉग ट्रेलर च्या सुरुवातीलाच कानावर पडतो. बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज, गाड्यांचा थरार, वरून येणारे हेलिकॉप्टर, ट्रेन मध्ये हायजॅक झालेले पाहायला मिळते. नेमकी स्टोरी हायजॅक वर आहे का हा प्रश्न नक्की पडेल. यात शाहरुख खान आपल्याला वेगवेगळ्या भूमिका करताना पाहणार आहोत. यात देशभक्ती पाहायला मिळणार हे नक्की. नयनतारा आणि दीपिका पादुकोण यांचा स्पेशल अपिअरन्स दिसणार आहेत. विजय सेतुपती यांची होणारी एन्ट्री जबरदस्त दाखवली आहे. धडाकेबाज ॲक्शन दिसून येतो. असा ट्रेलर पाहिल्यावर असे समजते हा एक हाय ऑक्टेन ॲक्शन चित्रपट वाटतो. ट्रेलर पाहिल्यावर लोकांची उत्सुकता वाढलेली दिसून येते कारण ऍडव्हान्स बुकिंग जोरदार चालू आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रस्तुत बहुचर्चित चित्रपट “जवान” ७ सप्टेंबर ला प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन ॲटली कुमार यांनी केले आहे. प्रमुख भूमिकेत शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती आणि दिपिका पादुकोण (स्पेशल अपिअरन्स), हिंदी, तमिळ, तेलुगु या तीन भाषेत रिलीज होणार आहे.
तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला ट्रेलर कसा वाटला ते कॉमेंट नक्की करा.
.