HomeActionFilmsHindiHindi Drama

जवान चित्रपट समीक्षा |दिग्दर्शक ॲटली कुमार आणि शाहरुख खान यांचा हाय ऑक्टेन ॲक्शन चित्रपट

Written by : के. बी.

Updated : सेप्टेंबर 9, 2023 | 03:21 AM

Jawan Movie review in marathi and film information
जवान
२०२३. ॲक्शन, नाटक. २ तास ४५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकॲटली कुमार, एस. रमणगिरीवासन
दिग्दर्शकॲटली कुमार
कलाकारशाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पादुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर, गिरीजा ओक, लेहर खान, संगीता भट्टाचार्य, संजय दत्त
निर्मातागौरी खान, गौरव वर्मा
संगीतअनिरुद्ध रविचंदर
प्रदर्शित तारीख७ सेप्टेंबर २०२३
देशभारत
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.८⭐/ ५

कथा :- 

एका रेस्क्यू मिशन मध्ये बंदुकीच्या होणाऱ्या बिगाडा मुळे काही जवानांना जीव गमवावा लागतो. भारतीय जवान विक्रम राठोड (शाहरुख खान) बंदुकीचे सप्लायर्स उद्योजक काली ( विजय सेतुपती ) यांच्यावर आरोप करून त्याच्या बंदुकीच्या सप्लायर्स वर बंदी आणतो. आपल्या धंद्यात नुकसान झालेले पाहून काली विक्रम राठोड ला मारून टाकतो. आणि त्याच्या पत्नीवर खोटी केस करतो. तिला फाशीची शिक्षा होते. तेव्हा ती एका आझाद जन्म देते. आझाद आपल्या वडिलांचा बदला घेईल का? आणि आपल्या आईला देलेले वाचन पृर्ण करेल का? ते सिनेमाघरात नक्की पहा.

जवान” चित्रपट समीक्षा :-

साऊत इंडियन फेमस दिग्दर्शक ॲटली कुमार यांनी राजा राणी (२०१३), थेरी (२०१६), मेर्सेल (२०१७), बिगील (२०१९), हे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यातील ३ चित्रपटांत विजय थालापती यांनीच मेन लीड रोल ॲक्टर म्हणून काम केले आहे. आणि आता २०२३ ला “जवान” चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आणि त्यांनीच लिहिला सुद्धा आहे. स्टोरी तशी साधीच आहे एका रोबिन हूड सारखी दिसून येते. यातील आझाद नांव ऐकले कि सनी देओल यांचा इंडियन चित्रपटातील आझाद आठवतो आणि विक्रम राठोड चे नांव ऐकल्यावर अक्षय कुमार चा “रावडी राठोड” मधला विक्रम सिंघ राठोड आठवतो. यात तुम्हांला हाय ऑक्टेन ॲक्शन, इमोशन, समाज सेवक, देशभक्त असे अनेक रुपात दिसून येईल. आपल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांची व्यथा आणि सरकारी दवाखाण्यातील दशा आणि इलेक्शन बद्दल सामाजिक संदेश या चित्रपटातून आपणाला मिळेल. याचसोबत काही ठिकाणी तुम्ही हसाल, काही ठिकाणी तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा येईल. सुरुवातीपासून ते शेवट पर्यत तुम्ही बघत राहणार कुठेही तुम्हांला बोअर होणार नाही असे याचे स्क्रीन प्ले आहे. दिग्दर्शक ॲटली कुमार यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे. “जिंदा बंदा” ह्या गाण्यात थोड्या क्षणासाठी शाहरुख खान सोबत नाचताना दिसतात. त्यांनी एक छोठासा केमियो केला आहे.

कमरेला असलेला पट्टा हातात असणारे जळते सिगारेट धूर सोडत होणारी विक्रम राठोड ची मास एन्ट्री असो या आझाद च्या होण्याऱ्या एन्ट्री ला सिनेमा ग्रहात शिट्यांचा आवाज घुमू लागतो. त्यांनी बोलले संवाद ऐकल्यावर अजून शिट्यांचा आवाज येतो. बाप बाप दाखवला आहे आणि बेटा बेटा दाखवला आहे तरुण असा . दोन्ही रूपे तशी वाटतात. शाहरुख खान यांनी विक्रम राठोड आणि आझाद यांची अप्रतिम डबल भूमिका केली आहे. एन. एस. जी. ऑफिसर नर्मदा राय ची भूमिका नयनतारा यांनी उत्तम केली आहे. विजय सेतुपती यांनी खलनायक म्हणून अप्रतीम भूमिका निभावली आहे. हसण्यातून भय निर्माण करणे हे त्यांना चांगलेच जमते. दीपिका पादुकोण विक्रम राठोड यांची पत्नीची भूमिका साकारली आहे. त्यात्य त्यांनी जीव ओतला आहे, आझाद सोबत जेलर मधील सहा कैदी सान्या मल्होत्रा – डॉ. इरम, प्रियामणी – लक्ष्मी, गिरीजा ओक – ईश्क्रा, लेहर खान – कल्की म्हणून भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. संजय दत्त यांनी केमियो उत्तम केला आहे. त्यांच्या एन्ट्री ला शिटी वाजते. सुनील ग्रोवर, संगीता भट्टाचार्य आणि इतरांनीही भूमिका चांगल्या केल्या आहेत.

प्रत्येक सीन मध्ये त्यात ॲक्शन असो या इमोशन फील होण्यासाठी बॅकग्राऊंड म्युजिक उत्तम असावे लागते. ते उत्तम प्रकरे बॅकग्राऊंड म्युजिक अनिरुद्ध यांनी दिले आहे. चित्रपटातील दोनच गाणी चांगली आहेत. ऐकायला भारी वाटतात. शाहरुख यांनी केलेल्या वेगवेगळ्या भूमिका दमदार दिसतात त्याचे कारण तसे मेकअप आर्टिस्ट चे उत्तम काम दिसतं. बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज, गाड्यांचा थरार, वरून येणारे हेलिकॉप्टर, ट्रेन मधील फायटिंग इतर फायटिंग सीन यातील व्ही. एफ. एक्स. चे काम उत्तम आहे. ६ ॲक्शन दिग्दर्शकांनी ॲक्शन शूट करण्यात आले आहे. पण ॲक्शन सीन थोडे जास्तच फास्ट दाखवले आहेत.

हा चित्रपट तुम्ही परिवारासोबत पाहू शकता.

जवान” चित्रपट कुठे पाहू शकतो..?

आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.

लेखक स्टार रेटिंग : –

उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.९ स्टार देईन.

तुम्ही जवान चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *