झांसी कि राणी भारतातील पहिला टेक्नीकलर चित्रपट (१९५३) | Jhansi Ki Rani Indian First Technicolor Film (1953)
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 10, 2022 | 7:04 PM
झांसी कि राणी (१९५३)
सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – १४८ मिनिटे
शैली : – नाटक, जीवन चरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.6✰ / 5✰
दिग्दर्शक : – सोहराब मोदी
Jhansi Ki Rani (1953) |
छायांकन : – अर्नेस्ट हाल्लेर
संपादित : – रसेल लॉईड
कलाकार : – सोहराब मोदी, मेहताब, सप्रू
प्रदर्शित तारीख : – २४ जानेवारी १९५३
वेळ : – १४८ मिनिटे
भाषा : – हिंदी
देश : – इंडिया
समीक्षा : –
24 जानेवारी १९५३ साली “झांसी कि राणी” (Jhansi Ki Rani) हा ऐतिहासिक चित्रपट भारतातील पहिला टेक्नीकलर चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतील आहे. सोहराब मोदी (Sohrab Modi) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
झांसी चा राजा गंगाधर राव यांच्याशी मनू चे लग्न झाले. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. त्यांना एक पुत्र झाला पण काही गंभीर आजाराने निधन झाले. दरबारी मंडळींच्या सांगण्यावरून राजाने एक मुलगा दत्तक घेतला पण त्याचे हि निधन झाले. इंग्रजांनी राजाला पात्र लिहिले कि राजाकडे कोणी उत्तराधिकारी नाही आहे. त्यामुळे झांशी वर आता इंग्रजांचे राज्य असेल असे म्हंटले. इंग्रजानी झांसी वर कब्जा करण्यास सुरुवात केली. झांसी च्या राणीने सोडून जावे असे फर्मान सुद्दा पाठवण्यात आले पण झांसी च्या राणीने त्या इंग्रजांना मी माझी झांसी नाही देणार असे ठणकावून सांगितले. झांसी आणि इंग्रज यांच्यात यद्ध सुरु झाले. एक स्त्री हि इंग्रजांविरुद्ध लढू शकते. झांसी ची राणी म्हणजे राणी लक्ष्मीबाई यांची शौर्य गाथा सांगणारा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये टेकनिकलर चा उपयोग करून भारतातील पहिली टेकनिकलर चित्रपट बनवला.