टायगर ३ समीक्षा | वाय आर एफ स्पाय युनिव्हर्स ची पाचवी फिल्म
Written by : के. बी.
Updated : नोव्हेंबर 12, 2023 | 07:31 PM
टायगर ३ |
लेखक | श्रीधन राघवन, अंकुर चौधरी, आदित्य चोप्रा |
दिग्दर्शक | मनीष शर्मा |
तारांकित | सलमान खान, कतरिना कैफ, इम्रान हाश्मी, रेवथी, कुमुद मिश्रा, रिद्धी डोग्रा |
निर्माता | आदित्य चोप्रा |
संगीत | प्रीतम |
प्रदर्शित तारीख | १२ नोव्हेंबर २०२३ |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
कथा :-
टायगर आपल्या मुलाला वाचवेल या त्याच्यावर लागलेला देशद्रोही चा आरोप मिठवण्यासाठीचा लढा.
“टायगर ३” चित्रपट समीक्षा :-
किसी का भाय किसी कि जान असनारे सलमान खान यांचा चित्रपट टायगर ३ पहिला. हा चित्रपट यशराज फिल्म निर्मित वाय आर एफ स्पाय युनिव्हर्स ची पाचवी फिल्म आहे. टायगर सिरीज मधील पहिली फिल्म “एक था टायगर” (२०१२) दुसरी फिल्म “टायगर जिंदा है” (२०१७), आणि आता टायगर ३ (२०२३) हि तिसरी फिल्म आहे. याचे निर्माते आदित्य चोप्रा आहेत. याचे दिगदर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.
पहिलाच शो बघितला चित्रपटाची सुरुवात भूतकाळात घडलेली स्टोरी दाखवून टायगर ची एन्ट्री दाखवली आहे. त्या एन्ट्री ला म्युजिक ची सलामीला सिनेमा ग्रहात शिट्ट्यांच्या आवाज घुमू लागतो. त्यानंतर खलनायक ची एन्ट्री साधी पण मस्त दाखवण्यात आली आहे. मध्यांतर पर्यंत यात फायटिंग आणि बिल्डिंग वरून बाईक ची रेस बघयाला मिळेल. पात्रांचे भूमिका समजून देतात. मध्यांतरानंतर आपल्याला थोडफार रहस्य दिसून येतील पण त्याने काही मजा येणार नाही. पण तुम्हाला ॲक्शन धडाकेबाज, तडफदार दिसून येयील. फक्त यात तुम्ही कोणते लॉजिक या फिजिक्स चा नियम जोडू नका नाहीतर टायगर ने उडी मारून कसा काय हेलीकॉप्टर पकडला असेल तुम्हाला विचार करायला भाग पाडेल कारण हेलीकॉप्टर ला कायम फास्ट फिरणारे पंखे असतात. जास्त काही तुम्हांला रोमांचक सीन बघायला मिळत नाहीत. ॲक्शन सोडला तर चित्रपटात खास असे काही दिसत नाही. यात जास्त इमोशन दिसून येत नाही जसे पहले दोन फिल्म मध्ये दर्जेदारपणा होता. शाहरुख खान ची एन्ट्री ला आणि टायगर व पठाण दोघांना एकत्र पाहून प्रेक्षकांनी जास्त शिट्या मारल्या होत्या. थोडस हसू सुद्धा येत होत. मजा पण येत होती हे फक्त त्याच सीन च बोलतोय. खलनायक म्हणून इम्रान हाश्मी यांची दर्जेदार भूमिका होती. पण त्यांना तशी कमी स्क्रीनिंग मिळाली आहे तरीपण त्यांनी एक चांगली छाप निर्माण केली आहे. कारण यात जास्त फोकस टायगर वर देण्यात आला आहे. शेवट तसा तुफानी नव्हता. पण लास्ट पोस्ट क्रेडीट सीन दाखवला त्यात रहस्य वाटत होत. ते रहस्य आपण वॉर २ चित्रपट मध्ये पाहायल मिळणार आहे. तुम्हाला फक्त ॲक्शन चित्रपट आवडत असेल आणि सलमान खान यांचे फॅन असाल तर हा चित्रपट तुम्हाला बोर वाटणार नाही.
या चित्रपटात तुम्हाला सलमान खान, कतरिना कैफ, इम्रान हाश्मी, रेवथी, कुमुद मिश्रा, रिद्धी डोग्रा, हे प्रमुख भूमिकेत आहेत. यात तुम्हाला इम्रान हाश्मी यांची भूमिका दर्जेदार वाटेल हे नक्की. इतरांनी ही योग्य असे काम केले आहे.
“लेके प्रभू का नाम” हे गाणे खूप हिट झाले आहे. हे गाणे चित्रपटाचे शेवट ला आहे. याच्यावर रील्स बनत आहेत. हे गाणे अरिजित सिंघ आणि निखीता गांधी यांनी गायले आहे. आणि द्सुरे गाणे “रूआं” हे अरिजित सिंघ यांनी गायले आहे. स्कोअर तनुज टिकू यांचे आहे. ते उत्तम प्रकारे आहे.
“टायगर ३” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २.७ स्टार देईन.
हे पण वाचा :-
पठाण फिल्म समीक्षा | वाय. आर. एफ. स्पाय युनिवर्स ची चौथी फिल्म्स | शाहरुख खान यांची ॲक्शन वाली फिल्म
तुम्ही टायगर ३ चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.