ट्रान्सफॉर्मर्स : राईज ऑफ द बीस्टस | ट्रान्सफॉर्मर्स सिरीज ची सातवी फिल्म
Written by : के. बी.
Updated : जून 15, 2023 | 12:59 AM

ट्रान्सफॉर्मर्स : राइज ऑफ द बिस्ट्स |
लेखक | जॉबी हॅरोल्ड |
दिग्दर्शक | स्टीवन केपल ज्यूनियर |
कलाकार | ऍंथोनी रामोस, डॉमनिक फिशबॅक |
निर्माता | मायकेल बे, डॉन मॉर्फी, टॉम डीसँटो, लॉरेन्झो डी बोनाव्हेंटुरा, मार्क वह्राडियन, डंकन हेंडरसन |
संगीत | जोंगनिक बोंटेम्प्स |
प्रदर्शित तारीख | 9 २०२३ |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
युनिकॉर्न ला भूक लागली आहे. प्रवेश द्वार उघडण्यासाठी ट्रान्सफॉर्मर ची चावी हवी आहे. ट्रान्सफॉर्मर चावी मॅक्सिमल यांनी पृथ्वी ग्रहावर लपवून ठेवली आहे. ती चावी मिळवण्यासाठी युनिकॉर्न चे सेवक पृथ्वी वर आले आहेत. ऑटोबोट रक्षक व मॅक्सिमल रक्षक आणि मानव हे काय युनिकॉर्न ला थांबवू शकतात कि नाही ते सिनेमा ग्रहात पहा.
“ट्रान्सफॉर्मर्स : राईज ऑफ द बीस्टस” चित्रपट समीक्षा :-
ट्रान्सफॉर्मर सिरीज पहिला चित्रपट ट्रान्सफॉर्मर २००७ ला प्रदर्शित होऊन प्रचंड गाजला. आणि ९ जुने २०२३ ला ट्रान्सफॉर्मर सिरीज चा सातवा चित्रपट ट्रान्सफॉर्मर्स : राइज ऑफ द बीस्टस प्रदर्शित झाला. ट्रान्सफॉर्मर शब्द ऐकल्यावर एक भलेमोठे रोबोट्स जे आपला आकार अचानक ते वेगवेगळ्या कार्स मध्ये बनवून घेतात. त्यांच्याकडे अंगातून हातातून बाहेर येणारे शस्त्र, गन्स बघितल्यावर अंगावर रोमांचक उभा होऊन राहतो.
स्टीवन केपल ज्यूनियर यांनी उत्तम प्रकारे दिग्दर्शन केले. मार्वल युनिव्हर्स, डी सी युनिव्हर्स निर्माण झाले आहे त्याप्रकारे आता हा चित्रपट पाहिल्यावर ट्रान्सफॉर्मर युनिव्हर्स तुम्हाला तयार झालेले दिसेल. मार्वल युनिव्हर्स स्टोन्स मिळवण्यासाठी, डी सी युनिव्हर्स बॉक्सेस मिळवण्यासाठी लढताना दाखवले आहे आणि आता ट्रान्सफॉर्मर युनिव्हर्स मध्ये ट्रान्सफॉर्मर चावी मिळवण्यासाठी लढाई दाखवली आहे. स्टीवन केपल ज्यूनियर यांनी ट्रान्सफॉर्मर चा युनिव्हर्स खुला केला त्यामुळे आपल्याला ट्रान्सफॉर्मर चे अनेक भाग बघायला मिळणार. याची चित्रपटाची कथा तशी चांगली आहे. जर तुम्ही मार्वल, डी सी युनिव्हर्स बघितले असेल तर तुम्हाला कदाचित कथा साधारण वाटेल. मॅक्सिमाल प्रजाती ची प्रजाती दाखवण्यात आली आहे जी एक गोरिला सारखी आहे. प्रत्येकी पात्रे डोळ्याला मोहून टाकणारी आहेत. अधून मधून होणारे छोटे मोठे विनोद ऐकल्यावर तुम्ही नक्की हसाल. मिराज नाव्याच्या पात्र असे जे तुम्हाला खूपच हसवेल. आणि तास म्हणायला गेले तर सर्वच पात्रांचे हिंदी व्हर्जन डबिंग प्रॉपर मॅच होतो. त्यामुळं ऐकायला भारी वाटते. व्ही. एफ. एक्स. ऍनिमेशन इतकं प्रॉपर बनवण्यात आले आहे एकक्षण पण सा तुम्हाला खराब वाटणार नाही.
हा चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकता.
“ट्रान्सफॉर्मर्स : राईज ऑफ द बीस्टस” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.5 स्टार देईन.
तुम्ही ट्रान्सफॉर्मर्स : राईज ऑफ द बीस्टस चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.