डंकी चित्रपट समीक्षा | दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांचा दुसऱ्या देशात बेकायदेशी मार्गाने जाणारा प्रवास (डंकी) दाखवणारा चित्रपट
डंकी |
लेखक | राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, कणिका धिल्लन |
दिग्दर्शक | राजकुमार हिरानी |
कलाकार | शाहरुख खान, तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर |
निर्माता | राजकुमार हिरानी |
संगीत | प्रीतम, अमन पंत |
प्रदर्शित तारीख | २१ डिसेंबर २०२३ |
देश | इंडिया |
भाषा | हिंदी |
कथा :-
लालतु गावातील ४ युवकांना आपली परिस्थिती सुधारण्यासाठी लंडन मध्ये जायचे ठरवले आहे. तुम्हाला इंग्लिश येत असेल तरच लंडन ला जाऊ शकता. अन्यथा तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. त्यांच्यात आणखीन एक सोल्जर (हार्डी) ची भर पडते तर ते ५ युवक इंग्लिश शकतील या डंकी चा रस्ता निवडतील हे नक्की पहा.
“डंकी” चित्रपट समीक्षा :-
राजकुमार हिरानी नांव ऐकल्यावर आपल्याला “थ्री इडियट्स” चित्रपट डोळ्यासमोर यतो तर कोणाला “मुन्नाभाई एम. बी. बी. एस.” व “पिके” आठवेल. त्यांचे सर्वच चित्रपट सुपर – डुपर हिट आहेत. आणि आता त्यांचा “डंकी” चित्रपट २१ डिसेंबर २०२३ ला रिलीज झाला. अभिजात जोशी, कणिका धिल्लन आणि राजकुमार हिरानी यांनी लिहिले आहे. स्टोरी नवीन आहे जे तुम्ही डंकी शब्द कधी ऐकला नसेल. ऐकला असेल तर त्याचा अर्थ काही माहित नसेल तर ते या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. स्क्रीनप्ले चांगला आहे. संवाद जास्त काही उठावदार दिसत नाहीत. पहिला भाग तुम्हाला पात्रांचे उद्दिष्ट त्यांची मनोकामना कळेल त्यातून काही ठिकाणी तुम्हाला हसू येईल. हार्डी आणि मनु ची प्रेम जुळणारी प्रेम कहाणी बघून काही मजा येत नाही. इंटरवल च्या शेवटला इंग्लिश परीक्षेचा कालवधीत तुम्ही खूप हसाल. इंटरवल च्या नंतर भाग खूप ताणला गेला असा वाटतो. त्यांच्या प्रवासात होणाऱ्या अडचणी काही मनाला भेद करून जात नाहीत. शौचालय चा एक सीन पाहून थोडं मनाला वेगळे वाटते. त्या इलीगल मार्गावर अशा ही अडचणी येऊ शकतात ते समजते. शेवट मात्र असे सवांद नाही जे मनात घर करून जातील. पुढे काय होईल हे आपणाला समजते. शेवटी सत्य घटनेचे फोटो दाखवून स्टोरीला कनेक्ट करण्याचा पर्यंत केला आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना नेहमी प्रमाणे या चित्रपटांत दबदबा कायम राखता आला नाही. ट्रेलर मध्ये बंदुकीचा, गोळ्यांचा आवाज बघून आलास असाल तर तुम्हाला यात ॲक्शन बघायला मिळणार नाही. राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटामध्ये तुम्हाला ॲक्शन नाही सोशल संदेश मिळतो. पण या चित्रपटात तसा मनाला स्पर्श करून जाणारा संदेश एकच आहे. जो तुम्हाला कोर्टाच्या सीन मध्ये दिसेल.
पठाण, जवान नंतर शाहरुख खान यांनी “डंकी” चित्रपटात काम केले. यात पण त्यांनी एक जवान युवकाची हार्डी ची भूमिका केली आहे पण तशी चेहऱ्याने जवान युवक दिसत नव्हते. पण त्यांची भूमिका अति उत्तम केली आहे. विक्की कौशल यांनी सुखी मंगल ची उत्तम दर्जाची भूमिका केली आहे. थोड्या वेळेच्या भूनिकेत त्यांनी उठाव अशी कामगिरी करून दाखवली आहे. त्याच सोबत विक्रम कोचर ( बुगु ) आणि अनिल ग्रोवर ( बल्ली ) ची भूमिका मजेदार केली आहे. तापसी पन्नू यांनीही चांगली भूमिका केली आहे. बोमन इराणी गीतू गुलाटी एका शिक्षकाची भूमिका चांगली केली आहे फक्त त्यांनी काढलेला आवाज एवढा जुळत नव्हता.
“मै लुटपुट गया” आणि “ओ माही ओ माही” हे गाणे गाजले आहे. अरिजित सिंघ यांनी गायलेले हे गाणे ऐकायला छान वाटते. प्रीतम यांनी संगीत दिले आहे. संगीत बऱ्यापैकी आहे.
“डंकी” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २.५ स्टार देईन.
तुम्ही डंकी चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.