HomeFilmsMarathi

डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जानेवारी 07, 2024 | 3:12 PM

list of Marathi movie release in Dec 2023. Marathi movie  reviews and inforamtion

म्हणता म्हणता २०२३ हे वर्ष संपलं. या वर्षात मराठी चित्रपटसृष्टीने बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. बरेच चित्रपट सुपरहिट ठरले तर काही फ्लॉप झाले.
खरं तर आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
आपण आतापर्यंत नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट पाहीले आहेत. आज आपण या लेखात डिसेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले चित्रपट पाहुया.

१. एकदा येऊन तर बघा
२०२३. विनोदी. २ तास १६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक प्रसाद खांडेकर
दिग्दर्शकप्रसाद खांडेकर
कलाकारतेजस्विनी पंडित, गिरीष कुलकर्णी, ओमकार भोजने, सयाजी शिंदे,पॅडी कांबळे ,भाऊ कदम, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, वनिता खरात
निर्मातापरितोष पेंटर, राजेश कुमार मोहंती, सेजल पेंटर, दिपक चौधरी
प्रदर्शित तारीख८ डिसेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.२⭐/ ५

एकदा येऊन तर बघा” चित्रपट समीक्षा :-

तुम्ही जर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे आणि त्यातील कलाकारांचे चाहते असाल तर हा चित्रपट कदाचित तुम्ही पाहीला असेल. परंतु ज्यांनी पाहिला नाही त्यांना आम्ही सांगतो की हा चित्रपट कसा आहे आणि तो बघावा की बघू नये.
तर मंडळी “एकदा येऊन तर बघा” हा चित्रपट म्हणजे निव्वळ मनोरंजन करणारा एक धमाल विनोदी चित्रपट आहे. हि कथा फुलंब्रीकर कुटुंबाची आहे. श्रावण आणि त्याचे दोन भाऊ फाल्गुन आणि कार्तिक या तीन भावांची ही धमाल गोष्ट आहे. त्यांना एक दिवस अचानक कळतं की त्यांच्या आजोबांचा वडिलोपार्जित वाडा ज्या गावात आहे त्या गावाला आता पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. मग ते आपल्या गावी जायचं ठरवतात आणि तिथे त्या वाड्यात हॉटेल सुरू करायचं ठरवतात. गावी गेल्यावर त्यांना नुतनशेठ भेटतो ज्याला तो वाडा विकत घ्यायचा आहे. परंतु तो वाडा न विकता ते तिघे हॉटेल सुरू करतात.
परंतु खरी धमाल तेव्हा सुरू होते जेव्हा त्या वाड्यात एकापाठोपाठ एक विचित्र गोष्टी घडायला लागतात. आता त्या गोष्टी काय हे बघायला किंवा तो वाडा मंतरलेला आहे की अजून काय ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. हॉटेल सुरू झाल्यावर गिऱ्हाईक येण्यासाठी ही मंडळी काय काय प्रयत्न करते.? त्यातून काय धमाल होते.? हे खूप विनोदी पद्धतीने दाखवलं आहे.
चित्रपटाची खरी मजा म्हणजे या चित्रपटातील कलाकार. मोठा भाऊ श्रावण म्हणजे गिरीश कुलकर्णी यांनी या चित्रपटात विनोदी पण थोडी वेगळी भूमिका साकारली आहे. आणि ही भूमिका अतिशय चोखपणे बजावली आहे. मधला भाऊ फाल्गुन म्हणजे प्रसाद खांडेकर आणि लहान भाऊ कार्तिक म्हणजे ओमकार भोजने यांची देखील भन्नाट कॉमेडी बघायला मिळते. श्रावण च्या पत्नीची भूमिका तेजस्विनी पंडित हिने साकारली आहे. तिची बहीण म्हणून नम्रता संभेराव हि या चित्रपटात आहे.
भाऊ कदम, पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार अशी बरीच मोठी फौज असलेला हा विनोदी चित्रपट तुम्हाला खळखळून हसवणारा नक्कीच आहे. प्रसाद खांडेकर याने या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पहीलं पाऊल टाकलंय. एक कलाकार म्हणून त्याने काम सुंदर केलं आहे परंतु लेखन आणि दिग्दर्शन या गोष्टींमध्ये काही गोष्टी अजून चांगल्या प्रकारे करता आल्या असत्या.
चित्रपटाची कथा पटकथा अजून खुलवता आली असती तर नक्की फरक पडला असता. परंतु मनोरंजन म्हणून एकदा हा चित्रपट खरंच बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. लंडन मिसळ
२०२३. विनोदी, नाटक. २ तास १९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक जालिंदर कुंभार
दिग्दर्शकजालिंदर कुंभार
कलाकारऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, भरत जाधव, गौरव मोरे, निखिल चव्हाण , ऋतुराज शिंदे
निर्मातासुरेश पै
प्रदर्शित तारीख८ डिसेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

लंडन मिसळ” चित्रपट समीक्षा :-

लंडन मिसळ हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे परंतु या चित्रपटाचे फारसे शोज नसल्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांना हा चित्रपट बघता आला नाही. आजकाल बऱ्याचशा मराठी चित्रपटांच लंडनमध्ये चित्रिकरण केलं जातं. जालिंदर कुंभार दिग्दर्शित हा चित्रपट देखील अर्थातच नावाप्रमाणे लंडनमध्ये चित्रित करण्यात आला. या चित्रपटाचं लेखन सुद्धा जालिंदर कुंभार यांनी केलं असून रविंद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून प्रेरित आहे.
चित्रपटाची कथा ही अदिती आणि रेवा दोन बहिणी आणि त्यांच्या वडिलांची आहे. इंग्रजांनी आपल्यावर तब्बल दीडशे वर्षे राज्य केले आणि त्याच रागापोटी आता इंग्रजांच्या जिभेवर आपण राज्य करावं या भावनेने या दोघींच्या वडिलांनी लंडनमध्ये एक मिसळ हॉटेल सुरू केलं होतं. परंतु एका बॉम्बस्फोटात ते हॉटेल जळून खाक होतं.
आता आदिती आणि रेवा या दोन बहिणींना आपल्या वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करायचं असतं. परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही त्यामुळे त्या दोघी बॉईज हॉस्टेल मध्ये मुलं बनून नोकरी करतात. गंमत म्हणजे या हॉस्टेलचा मालक हा बायकांची ॲलर्जी असल्यासारखा त्यांच्यापासून चार हात दूर राहणं पसंत करणारा असतो. हि धमाल भूमिका भरत जाधव यांनी साकारली आहे. आता या मालकाला या दोघींचं गुपित कळतं का.? या दोघी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी अभिनय उत्तम आहे परंतु कथा, पटकथा, संवाद हे ओढून ताणून लिहील्या सारखे वाटतात. चित्रपटाची मुख्य कथा बाजूला ठेवून नको त्या गोष्टी दाखवण्यात जास्त वेळ वाया गेला आहे. स्क्रीन प्ले अजून चांगला असायला हवा होता. एकंदर एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


३. पिल्लू बॅचलर
२०२३. विनोदी, परिवार. २ तास १ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक अरविंद जगताप
दिग्दर्शकतानाजी घाडगे
कलाकारपार्थ भालेराव,सायली संजीव,अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ.मोहन आगाशे, अक्षय टांकसाळे, शिवाली परब, सविता मालपेकर
निर्मातासुनील राजाराम फडतरे, वर्षा पाटील, अभिजित देशपांडे
प्रदर्शित तारीख१५ डिसेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

पिल्लू बॅचलर” चित्रपट समीक्षा :-

मराठी चित्रपटांच्या बाबतीत एक कटू सत्य म्हणजे चित्रपट चालला नाही तर त्याचं खापर प्रेक्षकांवर फोडणं. आता १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला पिल्लू बॅचलर हा चित्रपट पण तसा चालला नाही पण याचं कारण निर्माते आणि दिग्दर्शक यांनी शोधलं तर त्यांना कदाचित स्वतःची चूक मान्य करावी लागेल.
विषय आणि कथा चांगली असूनही, चांगल्या कलाकारांची भली मोठी फौज असूनही निव्वळ अति कॉमेडीच्या नादात हा चित्रपट भरकटला हे खरंय. अरविंद जगताप यांची कथा ,पटकथा ,संवाद चांगले आहेत परंतु काही कारणास्तव ते परिणामकारक वाटत नाही.
आजही समाजात मुलगा मुलगी असा भेदभाव केला जातो. सगळ्याच घरांमध्ये नसेल परंतु बऱ्याच कुटुंबांमध्ये वंशाचा दिवा हवा हा हट्ट, ही मागणी असते. आणि जर मुलगा, मुलगी अशी दोन मुलं असतील तर मुलाचे लाड जास्त प्रमाणात केले जातात. परंतु या सगळ्याचा परिणाम जसा मुलींवर होतो तसा मुलांवर सुद्धा होतो. हेच या चित्रपटातून दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सायली संजीव आणि पार्थ दोघं बहीण भाऊ असतात. पार्थ म्हणजे पिल्लू चे घरात खूप लाड होत असतात. परंतु पार्थ भालेराव म्हणजेच पिल्लू हा एक दिवस अचानक गायब होतो. आता तो का गायब होतो.? त्याला त्याच्या वडिलांना नक्की का धडा शिकवायचा असतो.? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचा प्रयत्न चांगला असला तरी तो नक्कीच फसला आहे. मराठी चित्रपटांच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांनी एकदा प्रेक्षकांना नक्की काय हवंय हे जाणून घेण्याची गरज आहे. असो, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


४. सोंग्या
२०२३. सोशल, नाटक. १ तास ५३ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक मिलिंद इनामदार, दिपक यादव
दिग्दर्शकमिलिंद इनामदार
कलाकाररूतुजा बागवे, अजिंक्य नानावरे, गणेश यादव, प्रदिप डोईफोडे
निर्मातानिशांत काकिर्डे, राहूल पाटील, मिलिंद इनामदार
प्रदर्शित तारीख१५ डिसेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.८⭐/ ५

सोंग्या” चित्रपट समीक्षा :-

१५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट मिलिंद इनामदार यांनी दिग्दर्शित केला असून हा एक सामाजिक संदेश देणारा आणि सोबतच मनोरंजन करणारा चित्रपट आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी काही अघोरी प्रथा, कुप्रथा सुरू आहेत. आणि अर्थातच या सगळ्या कुप्रथांमध्ये लक्ष्य असतात त्या “स्त्रिया”. या अघोरी चालीरीती, विचित्र प्रथांना स्त्रियांना आजही मनाविरुद्ध सामोरं जावं लागतं. अशीच एक कुप्रथा म्हणजे “कौमार्य चाचणी”. कित्येक ठिकाणी आजही ही कौमार्य चाचणी घेतली जाते आणि जर ती चाचणी मनासारखी झाली नाही तर त्या स्त्रिला नको त्या शिक्षा भोगाव्या लागतात. याच सगळ्या प्रकारावर भाष्य करणारा, किंवा या कौमार्य चाचणी विरोधात संदेश देणारा हा चित्रपट आहे.
एका गावातील शुभ्रा नावाच्या मुलीची ही गोष्ट आहे. रूतुजा बागवे हिने ही मध्यवर्ती भुमिका साकारली आहे. शुभ्रा ही एक शिकलेली आणि पुढारलेल्या स्वतंत्र विचारांची मुलगी असते. तिच्या आयुष्यात प्रियकर यशराज म्हणजेच अजिंक्य नानावरे येतो. त्यांच्या लग्नापर्यंत गोष्ट पुढे सरकते परंतु कथेची खरी सुरुवात होते जेव्हा यशराजचे वडील भाऊराव जे आमदार असतात ते कौमार्य चाचणीसाठी मागे लागतात.
आता शुभ्रा ही चाचणी करते का.? या कुप्रथे विरुद्ध, समाजाविरुद्ध ती कशी लढते.? या सगळ्यात यशराज तिच्या सोबत असतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट बघितल्यावरच मिळतील.
या चित्रपटाचा विषय कितीही चांगला आणि गंभीर असला तरी चित्रपटाचं दिग्दर्शनाच्या बाबतीत मिलिंद इनामदार कमी पडले. चित्रपटाची गाणी गुरू ठाकूर यांनी सुंदर लिहीली असली तरी संगीत दिग्दर्शन कमी पडलं. पार्श्वसंगीत सुद्धा म्हणावं इतकं खास नाही. बाकी सिनेमॅटोग्राफी, स्क्रीन प्ले, इतर तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा हा चित्रपट ठिकठाकच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५. छापा काटा
२०२३. विनोदी, नाटक, परिवार. २ तास २४ मिनिटे. [ यु ]
लेखक संदीप नवरे, प्रकाश भागवत
दिग्दर्शकसंदीप नवरे
कलाकारमकरंद अनासपुरे,मोहन जोशी,अरुण, नलावडे,विजय पाटकर,तेजस्विनी लोणारी,रीना मधुकर,ऋतुराज फडके, पंकज विष्णू
निर्मातासुशीलकुमार अग्रवाल
प्रदर्शित तारीख१५ डिसेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

छापा काटा” चित्रपट समीक्षा :-

छापा काटा हा चित्रपट बघताना तुम्हाला दहा बारा वर्षांपूर्वीचा एखादा चित्रपट बघतोय का असा भास होऊ शकतो. त्यामुळेच कदाचित छापा काटा चित्रपट आताच्या प्रेक्षकांवर तेवढीशी छाप पाडू शकला नाही. मकरंद अनासपुरे यांना बऱ्याच काळानंतर चित्रपटात पहायला मिळतं. संदीप नवरे दिग्दर्शित या चित्रपटात मोहन जोशी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर असे बरेच मोठे कलाकार असून हा एक विनोदी कौटुंबिक चित्रपट आहे.
मकरंद अनासपुरे यांनी पुन्हा एकदा एक विनोदी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ते नाम्या हे पात्र साकारत असून नाम्याचं स्वतःचं लग्नाचं वय उलटून गेलं आहे परंतु बहिणींच्या लग्नाची जबाबदारी मुळे तो अजूनही बिनलग्नाचा आहे. लोकांच्या गळ्यात पॉलिसी अडकवून तो पैशांची जुळवाजुळव करून जबाबदाऱ्या पार पाडत असतो.
परंतु गंमत सुरू होते जेव्हा नाम्याच्या धाकट्या बहिणीच्या अर्चनाच्या लग्नात एक अडचण निर्माण होते. तिच्या सासरच्यांना श्रीमंत घरातील मुलगी हवी आहे आणि नेमकं त्याच वेळी त्याच्या आयुष्यात शनाया(तेजस्विनी लोणारी)येते. शनाया नाम्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची ऑफर देते कारण तिला तिच्या आजोबांची(मोहन जोशी) करोडो रुपयांची प्रॉपर्टी तिच्या नावावर करून हवी असते.
आता नाम्या हे लग्न करतो का.? शनायाच्या आजोबांना संशय येतो का.? अर्चनाच्या सासरच्यांना काही शंका येते का.? हा सगळा गोंधळ बघणं मजेशीर आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट बघितल्यावरच मिळतील.
सिनेमातील लोकेशन्स, संकलन किंवा इतर तांत्रिक गोष्टी ठिकठाक आहेत परंतु छापा काटा हा चित्रपट तुमचं मनोरंजन नक्की करेल. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


६. क्लब ५२
२०२३. गुन्हेगारी, नाटक. २ तास ३ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक बजरंग बादशाह
दिग्दर्शकअमित वाल्मिक कोळी
कलाकारहार्दिक जोशी, भरत ठाकुर, राधा सागर, यशश्री व्यंकटेश , भाऊ कदम, शशांक शेंडे
निर्मातावैशाली ठाकूर
प्रदर्शित तारीख१५ डिसेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

क्लब ५२” चित्रपट समीक्षा :-

१५ डिसेंबर रोजी इतर पाच चित्रपटांसोबतच हार्दिक जोशी याचा क्लब ५२ हा चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला. आणि इतर चित्रपटांसारखाच तो सुद्धा फ्लॉप झाला. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. या चित्रपटाचं ना प्रमोशन झालं ना या चित्रपटाला फारशा स्क्रीन मिळाल्या. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सुद्धा हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.
“जुगार” म्हणजेच गॅम्बलिंग या थोड्या वेगळ्या विषयावर हा चित्रपट आधारित आहे. एका क्लब चा मालक असलेल्या दादाचा म्हणजे हार्दिक जोशी याचा लाल्या म्हणजे भरत ठाकुर याच्यावर खूप जीव असतो. त्याला काही झालं तर तो कोणाला सोडणार नाही अशी त्याची भूमिका असते. परंतु पुढे या दोघांमध्ये काहीतरी बिनसतं आणि मारामारी, गैरसमज या सगळ्याला सुरूवात होते. आता हा थोडा सस्पेन्स असल्याने इथं सगळं सांगणं उचित ठरणार नाही. त्यामुळे हा सस्पेन्स काय ते जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्ही बघू शकता. पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी, ॲक्शन सीन्स, स्क्रीन प्ले, अभिनय सगळ्याच बाबतीत हा चित्रपट ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


७. लई झकास
२०२३. परिवार, प्रणय, नाटक. २ तास ४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक बाबू भट
दिग्दर्शकबाबू भट
कलाकारमुकेश भट, मनीषा सिंग, मनोज जोशी, निशा परुळेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले, उदय टिकेकर, निशिगंधा वाड, कमलाकर सातपुते
निर्माताकिशोर यंदे, आर एन पांडे पाटील
प्रदर्शित तारीख१५ डिसेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

लई झकास” चित्रपट समीक्षा :-

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची घोर निराशा केली आहे. या महिन्यात प्रदर्शित झालेला एकही चित्रपट म्हणावा इतका खास नाही. १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला लई झकास हा चित्रपट सुद्धा एक फसलेला प्रयोग ठरला आहे. लई तर नाहीच पण नुसतं झकास म्हणावं असं सुद्धा या चित्रपटात काही नाही.
मनोज जोशी, निशा परुळेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले, उदय टिकेकर, निशिगंधा वाड, कमलाकर सातपुते अशी भली मोठी जुन्या, चांगल्या कलाकारांची फौज असताना सुद्धा हा चित्रपट अगदीच सुमार झाला आहे. चांगले कलाकार असले म्हणजे चित्रपट चांगला होत नाही तर चांगली कथा, पटकथा आणि दिग्दर्शन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु याच गोष्टींची इथं कमतरता जाणवते.
बाबू भट यांचं दिग्दर्शन अगदीच ठिकठाक आहे. कथा सुद्धा तीच घासून पुसून गुळगुळीत झालेली. हि एक प्रेमकथा आहे ज्यात एका श्रीमंत बापाच्या मुलीला एका सर्वसामान्य घरातील मुलावर प्रेम होतं. बापाची भूमिका मनोज जोशी यांनी साकारली आहे. आता ही प्रिया (मनीषा सिंग)परदेशातून परत भारतात शिकण्यासाठी आलेली असते त्यामुळे अर्थातच तिचे वडील अशा प्रेमाला संमती देत नाहीत.
आता या कथेत नावीन्य आणून आणून किती आणणार. मुळात याच एकाच विषयावर चित्रपट का करावेसे वाटतात हा मोठा प्रश्न आहे. मुख्य कलाकार असलेल्या मुकेश भट आणि मनीषा यांचा अभिनय अगदीच ठिकठाक आहे. जिथं सहकलाकार दर्जेदार अभिनय करतात तेव्हा मुख्य भूमिकेत तेवढ्याच ताकदीचा कलाकार असणं अपेक्षित असतं. एकंदर बरा म्हणावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार


तर मंडळी २०२३ मधील तुम्हाला आवडलेले चित्रपट कोणते हे आम्हाला नक्की कळवा.

हे पण वाचा :-

जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | या मराठी चित्रपटांनी केली २०२३ ची धमाकेदार सुरवात!

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *