डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस्स चित्रपट समीक्षा | Doctor Strange in the Multiverse of Madness Film Review
Written by : के. बी.
Updated : जुलै 17, 2022 | 9:24 AM
डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस्स चित्रपट समीक्षा, बघा डॉक्टर स्ट्रेंज आणि वांडा मॅक्सिमॉफ ची लढाई | Doctor Strange in the Multiverse of Madness Film Review, Watch Doctor Strange and Wanda Maximoff battle
2022 सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास ६ मिनिटे
शैली : – ॲक्शन, कल्पनारम्य, साहसी, सुपरहिरो “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.2✰ / 5✰
लेखक : – मायकेल वॉल्ड्रॉन
दिग्दर्शक : – सॅम रैमी
कलाकार : – बेनेडिक्ट कंबरबॅच, एलिझाबेथ ऑल्सेन, बेनेडिक्ट वोंग, झोचिटल गोमेज, चिवेटेल इजिओफर, रेचल मॅकॅडॅम्स
|
निर्माता : – केविन फिगे
संगीत : – डॅनी इल्फमॅन
प्रदर्शित तारीख : – ६ मे २०२२
भाषा : – इंग्लिश
देश : – सयुंक्त अमेरिका
कथा :-
डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस्स मध्ये अमेरिका चावेज एका युनिव्हर्स मधून दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये जाऊ शकते हे अमेरीका चावेज डॉक्टर स्ट्रेंज ला सांगते. दुसऱ्या युनिव्हर्स मधून विचित्र जीव पॉवर घेण्यासाठी अमेरीका चावेज च्या पाठीमागे आले आहेत. डॉक्टर स्ट्रेंज वांडा ला मदत करण्यास सांगतो. वांडा डार्क जादू च्या अधीन झाली आहे तिला आपल्या मुलांसोबत राहण्यासाठी अमेरिका चावेज ची शक्ती आत्मसात करायची आहे.
समीक्षा : –
डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस्स चा सुरुवातिच्या स्पेस मध्ये दुसऱ्या पृथ्वीचा डॉक्टरवर स्ट्रेंज, लढत असतो. झोपेतून उठलेला डॉक्टर स्ट्रेंज. आणि स्पेस मध्ये डार्क जादू पुस्तक वाचलेला, तिसरा डोळा असलेला डॉक्टर स्ट्रेंज असे तीन रूप डॉक्टर स्ट्रेंज चे तुम्हाला दिसतील. बेनेडिक्ट कम्बरबॅच तिन्हीही डॉक्टर स्ट्रेंज ची भूमिका चांगली पार पडली आहे. अनेक मॉनस्टर अमेरिका चावेज ची पॉवर घेण्यासाठी तिच्या माघे आले आहेत. तिचे रक्षण करण्यासाठी डॉक्टर स्ट्रेंज आपली पूर्ण ताकद लावून मॉन्स्टरशी लढत असतो. यातील मॉन्स्टर खूपच अक्राळविक्राळ आकाराचे दाखवले ते बघायला भय निर्माण होते. थोडेसे डॉक्टर स्ट्रेंज आणि अमेरिका चावेज यांच्या जीवनातील घडलेले काही क्षण दृश्य दाखवले आहे. अमेरिका चावेज एक तरुणी जिच्याकडे भरपूर प्रमाणात शक्ती आहे जी मल्टिव्हर्स चा प्रवास करू शकते. या एम सी यु नवीन पात्राची भर पडिली आहे. याची योग्य भूमिका झोचिटल गोमेज यांनी केली. वांडा आपल्या मुलासोबत खुशीने राहत आहे. पण ते अस्तित्वात नाही आहे हे डॉक्टर स्ट्रेंज सांगतो पण त्याचा काही उपयोग होत नाही. वांडा डार्क जादूच्या पूर्ण अधीन झाली आहे. डार्क जादू ची वांडा निर्माण झाल्यावर ती डॉक्टर स्ट्रेंज, वोंग च्या कमर ताज वर हल्ला करते. आपल्या मुलासोबत राहण्यासाठी तिला अमेरिका चावेज ची शक्ती खूप गरजेची आहे. त्यात ती डार्क जादूचा वापर करते. यातून तुम्हाला वांडा मॅक्सिमॉफ उर्फ स्कारलेट विच चे डार्क जादुई भयानक रूप एलिझाबेथ ओल्सन यांनी चालल्या प्रकारे केली आहे. जी डार्क जादुई दुनिया ची राणी वाटते. जिच्या पुढे सर्व काही नमन करतील. त्याचसोबत डॉक्टर स्ट्रेंज च्या प्रत्येक कामामध्ये साथ देणारा वोंग याची भूमिका बेनेडिक्ट वोंग ने केली. डॉक्टर स्ट्रेंज ची लव्हर क्रिस्टीन पामर ची भूमिका रचेल मॅकॅडॅम्स यांनी केली.
चित्रपटांच्या मध्यांतरात कार्ल मोर्डो अमेरिका चावेज आणि डॉक्टर स्ट्रेंज ना इलूमिनाटी कडे घेऊन येतो. वांडा त्या ठिकाणी येऊन ज्याप्रकारे पेगी कार्टर, ब्लॅकगर बोलटागॉन, मारिया रॅम्ब्यु, रीड रिचर्ड्स, आणि चार्ल्स झेवियर सर्वांकडे वेगवेगळी पॉवर होत्या तरी वांडा त्यांना एक मिनिटांत खतम करते. हे मारवेल फॅन आहेत त्यांना पचणे जरा जडच जाईल.
मारवेल सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील डॉक्टर स्ट्रेंज सुपरहिरो ची पहिली फिल्म्स “डॉक्टर स्ट्रेंज” १३ ऑक्टोबर २०१६ ला स्कॉट डेर्रिक्सन यांनी दिग्दर्शन केले होते. आणि आता दुसरी फिल्म मारवेल कॉमिक्स च्या आधारावर मायकेल वॉल्ड्रॉन लिखित डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस्स चे दिग्दर्शन सॅम रैमी यांनी केले. चित्रपटांच्या नांवामध्ये डार्क शब्द असला तरी फिल्म पूर्ण डार्क झोन मध्ये दिसत जशी डी. सी. युनिव्हर्स च्या चित्रपटांमधून जो डार्कनेस्स दिसतो तसा याठिकाणी दिसत नाही. यामध्ये तुम्हाला डार्क रेड रंग बघायला मिळेल. त्यामुळे असे वाटते कि रेड डार्क फिल्म्स आहे. पण या चित्रपटांतील ऍक्शन, त्यातील मॉन्स्टर असो या बॅकग्राउंड असो प्रत्येक वेळी तुम्हाला वेगळे असे काही चित्र दिसते जे तुम्ही फक्त स्वप्नांत पाहू शकतो. पूर्ण फिल्म्स चे व्ही. एफ. एक्स. काम उत्तम आहे. जे तुम्हाला खरा असलेला भाव प्रस्तुत करते. डॅनी इल्फमॅन यांनी दिलेले संगीत चांगले प्रकार आहे
या चित्रपटामध्ये डॉक्टर स्ट्रेंज चे तीन डॉक्टर स्ट्रेंज चे अस्तित्व व त्या तिघांचे टाईमलाईन ते कोणत्या युनिव्हर्स चे आहेत ते समजायला कठीण आहे. त्या मल्टिव्हर्स यातील पृथ्वी – ६१६ व पृथ्वी – ८३८ चा अंदाज लागू शकतो. जर का मारवेल सिनेमॅटिक युनिव्हर्स सर्व फिल्म्स पाहले नसले तरी चालेल पण तुम्हाला “वांडा व्हिजन” सिरीज, “स्पायडर मॅन नो वे होम” आणि डॉक्टर स्ट्रेंज ची पहिली फिल्म “डॉक्टर स्ट्रेंज” पाहावी लागेल तेव्हा तुम्हाला डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस्स फिल्म समजेल.
डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस्स चित्रपट मारवेल स्टुडिओ ने निर्माण केला आहे आणि वॉल्ट डिस्ने स्टुडिओ द्वारे वितरित करण्यात आले आहे. या चित्रपटांचे अनेक भाषांमधे भाषांतर केलं गेलं आहे. हि फिल्म फॅमिली सोबत पाहू शकता आणि आनंद घेऊ शकता.
डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस्स चित्रपट कुठे पाहू शकतो..?
ऍमेझॉन प्राईम विडिओ, नेटफ्लिक्स. डिजनी प्लस हॉटस्टार, झी फाईव्ह, गुगल प्ले मुव्ही, यू ट्यूब, ॲपल टी. व्ही. या ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म वरती डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस्स चित्रपट पाहू शकता. तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी भाडे द्यावे लागेल. प्रत्येक ओ. टी. टी प्लॅटफॉर्म चे रेंट ची अमाऊंट वेगवेगळी आहे. रेंट ची किमंत बदलत राहते.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफर, भूमिका, व्ही. एफ. एक्स. यासाठी माझ्याकडून “डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस्स” ला ५ स्टार पैकी ३. ४ स्टार देईन.