FilmsBiographyDramaEnglishHindiHistoryHome

डॉ. बाबासाहेब आंबेडकर द अंटोल्ड ट्रुथ (२000) समीक्षा | Dr. Babasaheb Ambedkar The Untold Truth (2000) Movie Review, Best films

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 26, 2022 | 7:50 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर द अंटोल्ड ट्रुथ

वर्ष : 2000   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : –  २ तास ५३ मिनिटे  
शैली : – जीवनचरित्र, इतिहास                                               “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 4.1 / 5
लेखक                     : – दया पवार, अरुण साधू, सोनी तारापोरेवाला,  
दिग्दर्शक                 : –  जब्बार पटेल
कलाकार                 : – मामुट्टी, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, मोहन गोखले, प्रिया बापट, गोविंद नामदेव,                                      अंजन श्रीवास्तव, 
dr.%20babasaheb%20ambedkar%202000

Dr. Babasaheb Ambedkar The Untold Truth (2000) Image source : social media

निर्माता                    : – त्रिलोक मलिक 
छाया                       : – अशोक मेहता
संपादक                  : – विजय खोचीकर  
संगीत                      : – अमर हळदीपूर 
प्रदर्शित तारीख       : – २000
अवधी                     : –  २ तास ५३ मिनिटे
भाषा                       : – इंग्लिश
डबिंग भाषा            : – मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, पंजाबी, उडिया, गुजराती 
देश                         : – भारत  

कथा :- 

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे.

समीक्षा : – 

                डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः शिक्षण पुर्ण करून गुलाम गिरीत पडलेल्या समाजाला गुलामगिरीतुन मुक्त केले. माणूस म्हुणुन जगण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी  न्यायानेच संघर्ष केला. देशासाठी संविधान लिहिले. अशी महान केलेली कामगिरी आणि त्यांचे वयक्तित जीवन प्रवासाची गाथा सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट बघितल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे वाक्य तुमच्या डोक्यात नक्कीच घुमेल.अशी प्रतिमा निर्माण करणारा हा “डॉ बाबासाहेब आंबेडकर – द अंटोल्ड ट्रुथ” चित्रपट सर्वोत्तम चित्रपट आहे.  

जब्बार पटेल यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर द अंटोल्ड ट्रुथ चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाची मूळ भाषा इंग्लिश आहे. त्यानंतर  मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, पंजाबी, उडिया, गुजराती या भाषेतून डबिंग केलं गेले आहे. पथकथा लेखन दया पवार, अरुण साधू, सोनी तारापोरेवाला, यांनी उत्तमरित्या रचलेलं आहे. प्रसिद्ध अभिनेते मामुट्टी यांनी डॉ बाबासाहेब यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेली भूमिका अविश्वसनीय आहे. त्याच सोबत रमाबाई – सोनाली कुलकर्णी, सविता आंबेडकर – मृणाल कुलकर्णी, महात्मा गांधी – मोहन गोखले, रमाबाई (तरुण असताना ) – प्रिया बापट, रामजी सकपाळ – गोविंद नामदेव, सयाजीराव गायकवाड – अंजन श्रीवास्तव यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.

 यामध्ये ४ गाणे ऐकायला मिळतील.  कबीर कहे ये जग अंधा  हे गाणे  खूपच हिट झाले. चित्रपटातील पार्श्व संगीत लोकांना आवडतो . रेल्वे स्टेशन, वाहने, पार्लमेंट ऑफ इंडिया कार्यालय, रंग भूशा, वेशभूषा यांचे दृश्य उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे. 

विशेष माहिती :-

सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र  शासनाने ८.९५ कोटी रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी अर्थ मदत केली . 

१९९९ मध्ये भारतीय राष्ट्रीय ३ पुरस्कार मिळाले आहेत. सर्वश्रेष्ठ इंग्लिश फिचर चित्रपट, मामुट्टी यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता राष्ट्राय पुरस्कार मिळाला. आणि नितीन देसाई यांना सर्वश्रेष्ठ कला निर्देश राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.  

गीते :-

बुद्धं शरनं गच्छामि

कबीर कहे ये जग अंधा 

मन लागो मेरा यार

भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा

कुठे बघायचे : – 

                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर द अंटोल्ड ट्रुथ (२000) इंग्लिश चित्रपट यू ट्यूब वर पाहू शकता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *