थोर : लव्ह अँड थंडर फिल्म्स समीक्षा – थोर सिरीज ची चौथी फिल्म
Written by : के. बी.
Updated : नोव्हेंबर 25, 2022 | 01:22 AM
थोर : लव्ह अँड थंडर |
लेखक | जेनिफर केटीन रॉबिन्सन, टाइका वैटीटी |
दिग्दर्शक | टाइका वैटीटी |
कलाकार | ख्रिस हेम्सवर्थ, नताली पोर्टमन, क्रिश्चियन बेल, टेसा थॉम्प्सन |
निर्माता | केविन फायगी, ब्रॅड विंडरबाम |
संगीत | मायकेल जियाचिनो, नमी मेलूमद |
प्रदर्शित तारीख | २३ जुन २०२२ |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
गोर द गॉड बुचर च्या परिवाराचा अंत रोखण्यासाठी देवाकडे भिक मागतो. पण देवाकडून काहीच मदत येत नाही. गोर द गॉड बुचर ची मुलगी मरण पावते. आणि त्याने सर्व देवांना मारण्याची शपत घेतो. काही देवांना मारून तो नवीन एसगार्ड ला पोचला आहे. गोर द गॉड बुचर ला थोर ची हातोडी मिळवून तो इच्छापूर्ती च्या दरवाजा पर्यंत जायचे आहे आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. गोर द गॉड बुचर ला रोखण्यासाठी थोर आणि माइटी थोर प्रयत्न करतात.
“थोर : लव्ह अँड थंडर” चित्रपट समीक्षा :-
मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स मध्ये थोर फिल्म्स सिरींज मधली थोर : लव्ह अँड थंडर हि चौथी फिल्म आहे. याच्या अगोदर थोर च्या ३ फिल्म्स येऊन गेल्या १. थोर (२०११), थोर : द डार्क वर्ल्ड (२०१३), थोर : रगनॉरक (२०१७). या तीनही फिल्म तुम्ही डीजने प्लस हॉटस्टार वर बघू शकता. थोर : लव्ह अँड थंडर टाइका वैटीटी यांनी हि फिल्म दिग्दर्शित केली आहे. सुरुवातीला तुम्हाला काही विनोदी भाग दाखवला आहे. गार्डियन ऑफ द गॅलॅक्सी ची टीम सोबत थोर लढताना पाहायला मिळतो. म्युनिर हातात घेताना जेन फॉस्टर ची एन्ट्री जबरदस्त वाटते. ८ वर्षांनी थोर ला त्याची प्रेमिका भेटते. हे पाहून आल्हादायक वाटते. दोघांच्या प्रेमाचा घडलेला इतिहास कोर्ग आपल्याला सांगत आहे. त्यामुळे स्टोरी समजायला सोपी जाते. मध्य काळात थोर ज्यूस देवतांचा च्या दरबारात जातो. ज्यूस देवतांचा दरबार म्हणजे इंद्र देवाचा दरबारा सारखा सुखकारक, आलिशान, चारीबाजूनी अप्सरा असलेल्या सोन्यासारखा दरबार वाटतो. जो आपल्या मोहून टाकतो. या दरबारात थोर च्या अंगावर ची सर्व कपडे उतरली जातात. तेव्हा दरबारातील काहीजण फाडून बघत राहतात तर काहीजण डोळे मिटून घेतात. पण तुम्ही काय कराल ते माहित नाही. लढाई काही खास अशी म्हणता येणार नाही.
दिग्दर्शकाने यात दोन प्रेम दाखवले आहे. पहले म्हणजे थोर आणि माइटी थोर यांच्यातील प्रेमिकांचे प्रेम आणि गोर द गॉड बुचर याची मुलगी यांच्यातील पिता – मुलीचे प्रेम. एकच जीवनदान आहे. कोण कोणाला वाचवणार ते चित्रपट पूर्ण बघितल्यावर समजेल.
अव्हेंजर्स एन्डगेम मध्ये थोर आपल्याला एक मोठासा, पोट सुटलेला दिसला. आता यामध्ये फिल्म मध्ये थोर आपली बॉडी बिल्ड केलेली दिसत आहे. जी थोर च्या प्रत्येक चाहत्याला आवडते. थोर चा ड्रेसकोड ब्लू कलर बनला आहे आणि माइटी थोर चा रेड कलर ड्रेस कोड आहे. माइटी थोर (जेन फॉस्टर ) ची भूमिका नताली पोर्टमन यांनी केली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि जेन फॉस्टर म्युनिर कसा उचलला ..? काय ती म्युनिर वर्दी आहे का…? यांचे उत्तर तुम्हाला फिल्म बघितल्यावर समजेल. गोर द गॉड बुचर ची भूमिका क्रिश्चियन बेल यांनी उत्तम केली आहे. बॅग्राऊंड म्युजिक , स्पेशल इफेक्ट, व्ही. एफ. एक्स. उत्तम आहे. तुही जर थोर चे फॅन असाल तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. दरबारातील थोर ची कपडे नसल्याचा सीन आणि जहाजातील थोर किसिंग सीन सोडला तर फॅमिली सोबत पाहू शकता.
“थोर : लव्ह अँड थंडर” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
डिजनी प्लस हॉटस्टार फ्री मध्ये पाहू शकता त्यासाठी डिजनी प्लस हॉटस्टार चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, कथा, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.६ स्टार देईन.