HomeFilmsFilms NewsMarathi

दहीहंडी महोत्सवाचे वर्णन करणारे मराठी चित्रपट : “गोविंदा” & “कान्हा” | Marathi movies depicting the DahiHandi Festival : “Goninda” & “Kanha”

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 16, 2022 | 07:52 PM

 गोविंदा आला रे….. असे म्हंटल्यावर हिरो आला कि काय असे वाटणार नाही. गोविंदा म्हणजे कृष्ण कान्हा दिसेल. आणि  फक्त तुमच्या डोळ्यासमोर दोरीवर बांधलेली दहीहंडी दिसेल. ती दहीहंडी फोडण्यासाठी प्रत्येक पथक, टीम, एकत्र येऊन थरारक थर वर थर रचतील. आणि कोणी आपल्यातलाच एक कान्हा ती दहीहंडी फोडून दहीहंडी जलोषा मध्ये साजरी करण्यात येते. गेली २ वर्षे आपण दहीहंडी साजरी केली नव्हती का सांगा….. ? कारण काय एकच ते म्हणजे….? लोकडाऊन… ! पण आता नाही.. आता २०२२ मध्ये नेहमी प्रमाणे ह्या वर्षी मोठ्या थाटात आणि जोषात दहीहंडी साजरी करणार.              

           प्रत्येक जण एकत्र येऊन आपल्या मनगट, पाय, खांद्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, . . . .  थराचा भार घेऊन दहीहंडी फोडणे हे बघायला आपल्याला मजा येते. पण त्यांनी केलीली तयारी, मेहनत, सराव, यांच्या बळावर एखादी दहीहंडी यशस्वी फोडली जाते. अशाच काही दहीहंडी महोत्सवाचे वर्णन करणारे चित्रपट आज आपण याठिकाणी पाहणार आहोत.   

दहीहंडी महोत्सवाचे वर्णन करणारे मराठी चित्रपट

1 ) गोविंदा 

२०१३   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – १ तास ४३ मिनिटे   
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 2.9 / 5
शैली : – नाटक 
कथा                         : – विलासराव वाघमोडे 
दिग्दर्शक                   : – आत्माराम धर्णे
कलाकार                   : – स्वप्नील जोशी, अरुण नलावडे, गिरीजा जोशी, विद्याधर जोशी, उदय टिकेकर 
Govinda 20Marathi 20Movie
Govinda
निर्माता                       : – विलासराव वाघमोडे 
प्रदर्शित तारीख          : –  १६ ऑगस्ट २०१३
भाषा                          : – मराठी
देश                            : – भारत

कथा :-   

          दहीहंडी ग्रुप चा सदस्य राजन हा दहीहंडी उत्सव साजरा करणे, त्यातच मित्रांसोबत वेळ घालवत असतो. आणि त्याची असणारी प्रेमिका त्याला करिअर करायला सांगत असते. यातून त्याला मिळालेली शिकवण या चित्रपटांतून दाखवण्यात आली आहे. 


गोविंदा चित्रपट समीक्षा : 

           चित्रपटांची सुरुवात एका कव्हर टाकलेल्या रिक्षात श्रावणी आणि राजन ची कविता वचालू असते हे पाहल्यावर तुम्हाला पण तुमच्या प्रेमिकेला कुठेतरी घेऊन बसलो आहे याचा भास होईल. स्वप्नील जोशी यांनी राजन ची भूमिका केली आहे आणि  त्याची प्रेमिका श्रावणी ची भूमिका गिरीजा जोशी यांनी केली आहे. या दोघांचे वडील अरुण नलावडे व उदय टिकेकर यांची एकमेकांची तिरस्कार, खुन्नस असलेली, एकमेकांची खेचा खेची करणारे शेजारी तुम्हाला बघायला आवडेल. सुरवातीला विनोदी, हळू हळू दोस्त यारी, मित्र मंडळ, दहीहंडी सणांत पूर्ण गुंतला आहे. राजन आणि श्रावणी दोघांचे एकमेकांवर प्रेम पण वडिलांचा नकार नेमीप्रमाणे जे चित्रपटांत असते तसे. दहीहंडी ची मजा काय असते ते यातून दिसून येईल. हिरो दहीहंडी तुन पडल्यावर त्याचे डोळे उघडतात आणि तो शिक्षण हातात घेतो आणि पुढे जो बनतो ते बघायला एक प्रकारची प्रेरणा उप्तन्न होईल. 

तुम्ही जर लहानपणी या आता कधी  टी व्ही वर “कृष्णा” मालिका पाहायली असेल तर त्यातील तरुण कृष्णा ची भूमिका हि स्वप्नील जोशी यांनी केली होती. ती अजून हि मनात घर करून बसली आहे. अप्रतिम असा कृष्ण त्यांनी साकारला. या चित्रपटांत  त्यांनी एका गोविंदा पथकाचा गोविंदा (राजन ) हि भूमिका केली आहे.  

 हे आली…… आली  कान्हा अँड कंपनी हे दहीहंडी चे गाणे खूपच गाजले आहे. 

गोविंदा कधी हि हातात नाही आणि पडला तो परत उभा राहतो. पण मनोरे थरांचे बांधायचे कि आपल्या आयुष्याचे मनोरे बांधायचे ते शिकवून जाते. हि या चित्रपटाची शेवटची ओळ आपल्याला बरेच काही शिकवून जाते. . 

“गोविंदा” मराठी चित्रपट कुठे पाहू शकतो..?

यू ट्यूब, प्लॅटफॉर्म वरती “गोविंदा” चित्रपट पाहू शकता.     

लेखक रेटिंग स्टार :-

माझ्या कडून या चित्रपटासाठी ५ स्टार पैकी २.९ स्टार देईन.

2 ) कान्हा 

२०१६   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – १ तास ५९ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, नाटक
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.2 / 5
लेखक                       : – सचिन धारेकर 
दिग्दर्शक                   : – अवधूत गुप्ते 
कलाकार                   : – वैभव तत्ववादी, गष्मीर महाजनी, गौरी नलावडे, प्रसाद ओक 
KANHA

“Kanha” source : ifh 

निर्माता                      : – प्रताप सरनाईक 
संगीत                        : – अवधूत गुप्ते
प्रदर्शित तारीख         : –  २६ ऑगस्ट २०१६ 
भाषा                         : – मराठी
देश                           : – भारत

कथा :-   

          दहीहंडी सण धुमधडाक्यात साजरा होतो. जय बजरंग आणि जय एकता या दोन्ही दहीहंडी पथकाची थराचा रेकॉर्ड करण्याची स्पर्धा. आणि त्या दहीहंडी ला राजकारणी स्वरूप प्राप्त झाल्यावर होणारे प्रसंग दाखवतात.    

“कान्हा” मराठी चित्रपट समीक्षा : –

          झेंडा आणि मोरया हे दोन्ही चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिलेत असतील हे दोन्ही चित्रपट खूपच गाजले आणि त्यामधील गाणी सुद्धा प्रचंड गाजली जी आजपण ऐकल्यावर मंत्रमुग्ध होऊन जाते. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अवधूत गुप्ते यांनी “कान्हा” हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांच्या प्रत्येक चित्रपटांतून एक वेगळ्या प्रकारचे राजकारण आपल्याला पाहायला मिळते जे प्रत्येक वर्षी आपल्याला ते दिसून येत नाही. ते राजकारण या चित्रपटांतून दाखवण्यात अवधूत गुप्ते याना खूपच छान जमलय.   

जय बजरंग चा लीडर मल्हार (वैभव तत्ववादी) आणि जय एकता चा लीडर रघु (गष्मीर महाजनी) ह्या दोन्ही  पथकांपैकी शासकीय परवानगी नसताना नऊ विक्रमी थर कोण लावणार हे पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण होते. दोन्ही गटाची फायटिंग ॲक्शन, बघायला खूपच भारी मजा येईल. मराठी चित्रपटांत सुद्धा ॲक्शन ला हिरवा कंदील लावला आहे. त्याचा फायदा घेत राजकारणी लोक याच्यातून राजकारण कसे खेळतात ते पाहणे कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. दोन्ही गटाची भाषा एकदम गावठी आणि भाईगिरी ची भाषा आहे. प्रसाद ओक यांनी केलीली राजकारणी विश्वासराव ची भूमिका खूपच भारी होती. 

अवधूत यांनी स्वतःच चित्रपटाला संगीत दिलेले आहे. त्यांच्या गाण्याची नशा हि वेगळीच असते. कृष्णाचे “कृष्ण जन्माला” आणि दहीहंडीचे मित्र गाणे खूप वाजत गाजत आहे. बॅकग्राऊंड म्युजिक सुद्दा उत्तम आहे. 

रडायचं नाही चढायचं हे ब्रीदवाक्य मला खूपच आवडले. 

चित्रपट कुठे पाहू शकतो..?

झी फाईव्ह ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म वरती “कान्हा ” चित्रपट पाहू शकता.     

लेखक रेटिंग स्टार :-

माझ्या कडून या चित्रपटासाठी ५ स्टार पैकी ३.२ स्टार देईन.

वरील दोन्ही दहीहंडी चित्रपटांपैकी  तुमचा आवडता चित्रपट कोणता… ? आणि तो कसा वाटला ते कमेंट लिहायला विसरू नका. 

कृष्णा पूर्ण भारतात आहे पण दहीहंडी हा महोत्सव सर्वात जास्त महाराष्टत साजरी केला जातो आणि गुजरात या राज्यात पण साजरा होतो. पण याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यात होत असले तर कमेंट  करून नक्कीच कळवा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *