द बॅटमॅन चित्रपट समीक्षा | The Batman Film Review
Written by : के. बी.
Updated : मे 30, 2022 | 9:21 PM
द बॅटमॅन चित्रपट समीक्षा | The Batman Film Review
शैली : – ॲक्शन, गुन्हेगारी, साहसी, सुपरहिरो “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 4.1✰ / 5✰
लेखक : – मॅट रीव्स, पीटर क्रेग
दिग्दर्शक : – मॅट रीव्स
कलाकार : – रॉबर्ट पॅटिन्सन, झो क्राविट्झ, पॉल डॅनो, कोलिन फॅरेल, जॉन टर्टुरो, जेफ्री राइट
|
निर्माता : – डीलन क्लार्क, मॅट रीव्स
संगीत : – माइकल जियाचिनो
प्रदर्शित तारीख : – ४ मार्च २०२२
वेळ : – २ तास ५६ मिनिटे
भाषा : – इंग्लिश
देश : – संयुक्त राज्य अमेरिका
डबिंग भाषा : – हिंदी, तामिळ, तेलगू
कथा :-
एक सर्वसामान्य व्यक्ती जो कोडी करणारा रिडलर ज्यांनी भ्रष्टाचार करण्याऱ्या, नेते, पोलीस, यांना मारण्यासाठी पहेलीच्या माध्यमांतून कट रचतो. बॅटमॅन त्या पहेली सोडवण्याचा प्रयत्न करतो. यातून बॅटमॅन आणि कॅट वूमन यांच्या आई – वडिलांचे कटू सत्य समजते.
समीक्षा : –
बॅटमॅन म्हंटले कि वटवाघूळ असलेला माणूस अशी दिसते. बॅट सारखा दिसणारा कला सूट परिधान करून बनलेला बॅटमॅन या पत्राचे अनेक फिचर चित्रपट, टीव्ही मालिका, ॲनिमेशन चित्रपट, निर्माण करण्यात आले. काही चित्रपट म्हणावे तितके गाजले नाहीत तर काही चित्रपट खूपच प्रसिद्ध आहेत. ख्रिस्तोपर नोलन यांनी बॅटमॅन चे ३ चित्रपट निर्माण केले ते प्रचंड गाजले. या ट्रिलॉजि मधून अजरामर खलनायक निर्माण झाला तो म्हणजे जोकर. आत्तापर्यंतचा जगातील सर्वात बेस्ट खलनायक जोकर या पात्रालाच म्हटले जाते. द बॅटमॅन या चित्रपट मध्ये गॉथम शहरातील लोकांना दिलेले वचन पूर्ण न केल्याने ‘रिडलर’ नावाचं पात्र उदयास येतं. ते पात्र गोथम शहरातील भ्रष्टाचारी नेते, पोलीस, त्यामधील सहभाग असण्याऱ्या व्यक्तींना मारण्यासाठी कट रचतो. प्रत्येकाला मारण्याचे वेगवेळी पद्धत वापरतो. बॅटमॅन ला त्यांना वाचवण्यासाठी रिडलर ने काही कोडी घातलेली आहेत ती कोडी. बॅटमॅन डिटेक्टिव्ह प्रमाणे ती सर्व कोडी सोडवण्याचे प्रत्यत्न करत असतो. हे पाहिल्यावर तुम्हाला एक डिटेक्टिव्ह फिल्म आहे असे वाटेल, पण कोडी सोडवत असताना बॅटमॅन ला आलेले अडथळे पाहायला आणि प्रत्येक कोडे न सोडल्यावर त्यांचे जीवन कसे संपुष्टात येते याची उत्सुकता निर्माण होईल.
बॅटमॅन हा चित्रपट ८५ टक्के तर अंधारात असतो जे रात्रीचे दृश्य खूपच छान रंगवण्यात आले आहे. यातील मारामारीचे जे सीन आहेत ते खरे वाटतात.
बॅटमॅन आपली तांत्रिक कर घेऊन पेंग्विन पाठलाग करताना. बॅटमॅन ची कार भडकलेल्या आगीतून कर उडीमारून बाहेर येते हे दुर्श्य पेंग्विन च्या कारकाचेतून दिसते ते खूपच भारी होते. पेंग्विन ची कार पडल्यावर पेंग्विन उलटी झालेली कार मधूनच बॅटमॅन ला बघत असतो ते दृश्य मस्त होते. ते टिपलेला सीन खूपच भारी होता. आणित त्याला लाभलेलं संगीत त्यामुळे बघायला मजा येते. बॅग्राऊंड संगीत खूपच सुंदर प्रकारे बनव्यात आले आहे जे पाहणारांना मोहून टाकते.
सुरुवातीला बॅटमॅन च्या एन्ट्री ला बॅटमॅन च्या बुटांचा आवाज येतो आणि बॅटमॅन जेव्हा लिफ्ट मधून बाहेर येतो. आणि तुम्ही त्याच्याकडे पाहिल्यावर भीती निर्माण होते. याचे श्रेय रॉबर्ट याना जाते. बॅटमॅन च्या रोल साठी रॉबर्ट पीटरसन याना दिले तर काहींच्या मते रॉबर्ट पीटरसन याना हि भूमिका जमणार नाही. त्यांनी चांगल्या प्रकारे बॅटमॅनचे पात्र चांगल्या प्रकारे निभावले आहे. अनेक चित्रपताटुन अनेक कलाकारांनी केलं बॅटमॅन ची भूमिका केली आहे. कॉलिन फ्ररेल यांनी साकारलेली पेंग्विन ची भूमिका लाजवाब आहे. पेंग्विन चे रूप पाहिल्यावर मकेअप आर्टिस्ट चे काम दिसून येते. चपळ मांजरी सारखी भासणारी कलाकृती झो क्राविट्झ, साकारलेल्या कॅटवूमन चपळपणा दिसून येतो. पॉल डॅनो यांच्या चेहऱ्यावरील मास्क असल्याने त्यांचा चेहरा जास्त वेळ स्क्रीनवर दिसला नाही, तेव्हढ्याच वेळात त्यांनी रिडलर खलनायकाची भूमिका उत्तम साकारली. प्रत्येक पात्रांचे काम उत्तम आहे
जर का तुम्ही डी सी कॉमिक्स चे फॅन या फक्त बॅटमॅन चे फॅन असाल या सुपरहिरो फिल्म फॅन असाल तर तुम्हाला हा चित्रपट बघायला सुपर वाटेल यात काही शंका नाही. नाहीतर तुम्हाला २ तास ५६ मिनिटांचा चित्रपट थोडा बोर सुद्धा वाटेल. दिग्दर्शक मॅट रीव्स यांनी या चित्रपटामध्ये प्रत्येक पात्राच्या बॅग्राऊंड स्टोरीला वेळ दिला आहे त्यामुळे प्रत्येक पात्रे समजून घ्यायला सोपे जाते. नेमकी स्टोरी काय आहे ते कळून येते. त्यामुळे भले हि तुम्ही डी. सी. फॅन नसाल तरी हा चित्रपट बघायला आवडेल.
विशेष माहिती :-
रिडलर ला जेल मध्ये टाकल्यावर जेल मध्ये त्याला जोकर दिसतो. पण हा जोकर ख्रिस्तोपर नोलन यांच्या चित्रपटातील नसून सुसाईड स्काऊड या चित्रपटातील जोकर आहे. ते दोघे एकसाथ हसत असतात. हा लास्ट सेन आहे त्यामुळे पढूल बघत सुसाईड स्काऊड वाला जोकर दिसू शकतो
द बॅटमॅन चित्रपट कुठे बघायचे .?
ऍमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स. डिजनी प्लस हॉटस्टार, झी फाईव्ह, गुगल प्ले मुव्ही, यू ट्यूब, ओ. टी. टी. वरती पाहू शकता. तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी भाडे द्यावे लागेल. प्रत्येक ओ. टी. टी प्लॅटफॉर्म चे रेंट ची अमाऊंट वेगवेगळी आहे.
रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफर, भूमिका, बॅग्राऊंड म्युजिक यासाठी माझ्याकडून द बॅटमॅन चित्रपटाला ५ स्टार पैकी ४. १ स्टार देईन.