द मार्वल्स चित्रपट समीक्षा | तीन मार्वल म्हणजे कॅप्टन मार्वल, मोनिका रॅम्ब्यु, आणि मिस मार्वल ची पहा जादू
Written by : के. बी.
Updated : नोव्हेंबर 10, 2023 | 06:31 PM
द मार्वल्स |
आधारित | मार्वल कॉमिक्स |
लेखक | निया डाकोस्टा |
दिग्दर्शक | निया डाकोस्टा, मेगन मॅकडोनेल, एलिस्सा कारासिक |
कलाकार | ब्री लार्सन, टेयोना पॅरिस, इमान वेल्लानी, सॅम्युअल एल जॅकसन, जाव एस्टन, मोहन कपूर |
निर्माता | केविन फाइगी |
संगीत | लॉरा कार्पमन |
प्रोडक्शन कंपनी | मार्वल स्टुडिओ |
डिस्ट्रिब्युशन कंपनी | वॉल्ट डिजनी, मोशन पिक्चर |
प्रदर्शित तारीख | १० नोव्हेंबर २०२३ |
देश | युनाइटेड स्टेट्स |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
हाला ग्रहावर क्रि लोक राहत असतात. कॅरोल डॅनव्हर्स म्हणजे कॅप्टन मार्वल च्या हातून चुकून क्रि साम्राज्याची सर्व एनर्जी, हवा, पाणी, प्रकाश सर्व काही नष्ट होऊन जाते. तो ग्रह राहण्यास योग्य राहत. क्रि साम्राज्याची लीडर कॅप्टन मार्वल ला शत्रू समजते. क्रि साम्राज्याची लीडर डान बेन ने २ क्वांटम बँड्स पैकी एक क्वांटम बाँड्स मिळाला आहे. त्याने ती जंप पॉईंट्स बनवून दुसऱ्या ग्राहकडून सर्व हवा, पाणी, ऊर्जा सर्व काही घेऊन जात आहे. मोनिका रॅम्ब्यु ला त्या पॉईंट्स फेकले जाते. डान बेन ला दुसऱ्या क्वांटम बाँड्स ची हि गरज आहे. ते दुसरे बँड्स कमाला खान म्हणजे मिस मार्वल कडे आहे. डान बेन ला दुसरे बँड्स मिळेल का? द मार्वल्स ग्रहांना आणि S. A. B. E. R. स्पेस स्टेशन वाचवतील का ? हे नक्की पहा.
“द मार्वल्स” चित्रपट समीक्षा :-
कॅप्टन मार्वल २०१९ ला आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. मार्वल कॉमिक्स वर आधारित “द मार्वल्स” चित्रपटाची केविन फाइगी यांनी निर्मिती केली आहे. गार्डियन ऑफ द गॅलॅक्सी चित्रपटां नंतर आलेली हि मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स ची ३३ वी फिल्म आहे. याचे दिग्दर्शन निया डाकोस्टा यांनी केले आहे. स्टोरी चे लिखाण पण त्यांनी केले असून त्यांचा सोबत मेगन मॅकडोनेल, एलिस्सा कारासिक यांनी ही स्टोरी लिहिली आहे. स्टोरी बघायला गेली तर समजण्या सारखी आहे. आणि त्यासाठी पाहली कॅप्टन मार्वल फिल्म बघायची गरज भासत नाही. लेखकांनी या स्टोरी मध्ये ३ मार्वल ची जादू दाखवली आहे जी एकमेकांशी जोडून ठेवते. एकाच वेळेत तीनही मार्वल वेग वेगळ्या ठिकाणी दिसत असतात. त्या वेळेत तुम्ही थोडे गोंधळून जाऊ शकता. हळूहळू तो गोंधळ दूर होईल. यात तीन ही महिला ची एक कॅप्टन मार्वल, मोनिका रॅम्ब्यु, कमाला खान यांची आतिषबाजी बघायला मिळते. विनोद ऐकायला मिळत नाही. इमोशन ची सांगड थोडी शी घातली आहे. पण बघायला खूप काही मजा येणार नाही. अव्हेंजर सारखे काही छोटे छोटे मुव्हमेंटस सुद्धा दिसत नाहीत. तरीपण तुम्ही एकदा पाहू शकता. लास्ट पर्यंत बघा तुम्हाला पोस्ट क्रेडिट सीन दिसेल. पुढे काय होणार याची उत्सुकता लागेल.
ब्री लार्सन यांनी कॅप्टन मार्वल ची भूमिका अप्रतिम केली. खरोखर ती एक कॅप्टन मार्वल वाटते. टेयोना पॅरिस यांनी मोनिका रॅम्ब्यु ची भूमिका केली. कॅप्टन मार्वल ला ऑंटी म्हणत असते, इमान वेल्लानी यांनी कमाला खान म्हणजे मिस मार्वल ची भूमिके चांगली केली आहे. एक कट्टर मार्वल फॅन आहे. तिला मार्वल शिवाय दुसरं काही दिसत नाही. कमाला वडील इंडियन अभिनेता मोहन कपूर यांनीही एक वडिलांची उत्तम भूमिका केली आहे. या सर्वांचा बॉस एकाच निक फ्यूरी ची भूमिका सॅम्युअल एल जॅकसन यांनी उत्तम केली आहे. डान बेन ची भूमिका जाव एस्टन यांनी उत्तम केली आहे. त्यांना पाहून गार्डियन ऑफ द गॅलॅक्सी मधला विलन रोनन आठवतो.
वेगवेगळी प्लॅनेट्स बघायला मजा येते. या चित्रपटाचे व्ही. एफ. एक्स. चांगले आहेत जसे नेहमी असतात. बॅकग्राउंड म्युजिक ठीक आहे. इतर गृहा वरील लोकांची राहणीमान त्यांची वेशभूषा चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे.
“द मार्वल्स” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
डिजनी प्लस हॉटस्टार, यू ट्यूब, ऍमेझॉन प्राईम विडिओ, गुगल प्ले मुव्ही, ॲपल टी. व्ही. या ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म वरती “द मार्वल्स” पाहू शकता. तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी भाडे द्यावे लागेल. प्रत्येक ओ. टी. टी प्लॅटफॉर्म चे रेंट ची रक्कम वेगवेगळी आहे. रेंट ची किमंत बदलत राहते. काही ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २.३ स्टार देईन.
तुम्ही “द मार्वल्स“ चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.