पठाण फिल्म समीक्षा | वाय. आर. एफ. स्पाय युनिवर्स ची चौथी फिल्म्स | शाहरुख खान यांची ॲक्शन वाली फिल्म
Written by : के. बी.
Updated : जानेवारी 26, 2023 | 10:37 PM

पठाण |
लेखक | श्रीधर राघवन, अब्बास टायरवाला |
दिग्दर्शक | सिद्धार्थ आनंद |
कलाकार | शाहरुख खान, जॉन अब्राहम, दिपिका पदुकोण |
निर्माता | आदित्य चोप्रा |
संगीत | विशाल – शेखर |
प्रदर्शित तारीख | २५ जानेवारी २०२३ |
भाषा | हिंदी |
कथा :-
रॉ एजेंट ची कथा आहे. त्यातील एक मृत घोषित माझी एजंट जिम सूड घेण्यासाठी रक्तबीज निर्माण केले आहे. त्याला रोखण्यासाठी दुसरा एजंट पठाण आपले सर्व प्रयत्न करत आहे.
“पठाण” चित्रपट समीक्षा :-
यश राज फिल्म्स ने स्पाय युनिव्हर्स निर्माण केले आहे ज्यात १) एक था टायगर (२०१२), २ ) टायगर जिंदा है (२०१७), ३) वॉर (२०१९) हे ३ चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते सर्व चित्रपट सुपरहिट झाले. आता चौथा चित्रपट ४) पठाण २५ जानेवारी ला प्रदर्शित झाला. सिद्धार्थ आनंद यांनी वॉर चित्रपट चे दिग्दर्शन उत्तम केले होते. आता परत त्यांनी पठाण चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाची कथा साधीच आहे. ती आपण नेहमी पाहतो अशी वाटते. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अशा पद्धतीत दाखवली आहे कि आपण कुठे बोर नाही होणार. मध्यांतर पर्यंत पात्रांची डेव्हलोपमेंट होताना दिसते त्यामुळे पात्रांचा इतिहास थोडक्यात समजून येतो. चित्रपटांच्या मध्यांतर नंतर आपल्याला बरेच थरारक करणारी दृश्य दिसतील. एकामागून एक ट्विस्ट येतात पुढे काय होणार याची उत्सुकता लागते. पटकन या देशातून त्या देशात गेल्याचे चित्रीकरण दिसेल. नायक शाहरुख खान आणि खलनायक जॉन अब्राहम यांची फायटिंग असो या ट्रेन मधील सीन हॉलीवूड चित्रपटासारखे वाटते. ॲक्शन सीन मध्ये जास्त अतिशयोक्ती केलीली दिसत नाही त्यामुळे काही भाग सोडला तर फायटिंग सीन हे खरे वाटतात.
जवळ जवळ ४ वर्षांनी रोमान्स चे बादशाह म्हणून ओळख असलेले शाहरुख खान पठाण या चित्रपटात तुफानी ॲक्शन करताना दिसत आहेत. नेहमी प्रमाणे त्यांची संवादबाजी जबरदस्त होती. ५७ वर्षीय शाहरुख खान यांची शर्टलेस बॉडी बघितल्यावर सिनेमा ग्रहात शिट्यांचा आवाज येतो. यात त्यांनी शरीरावर किती मेहनत केली असावी आपल्या नक्कीच दिसून येईल. एस. आर. के. फॅन्स हा चित्रपट बघून अजुबा वाटेल हे नक्की. हॉलिवूड ऍक्टर विन डिझेल सोबत “ट्रिपल एक्स झेंडर केज” या ॲक्शन चित्रपटांत दीपिका पदुकोण यांनी धमाकेदार ॲक्शन केली होती. आता पठाण मध्ये ए आय एस आय एजेंट रुबिना ची भूमिका दीपिका पदुकोण यांनी उत्तम केली आहे. यात त्यांनी खूपच असे हॉट कपडे परिधान केलेलं दाखवण्यात आले आहे. धूम या चित्रपटांतून कबीर खलनायकाची भूमिका जॉन अब्राहम यांनी केली होती. आणि त्या भूमिकेत त्यांना प्रसिद्धी हि मिळाली आणि आता अशाच एका खलनायक जिम या भूमिकेतून आपली एक वेगळी छाप पाडली आहे. आशुतोष राणा आणि डिम्पल कपाडिया यांनीही उत्तमरित्या कामगिरी केली आहे.
बेशरम रंग हे एकच गाणे चित्रपटादरम्यान दाखवले आणि शेवट ला झुमे जो पठाण हे गाणे तुम्हाला शेवठी दिसते. बॅकग्राऊंड म्युजिक ऐकायला बरे म्हणावे लागेल. फायटिंग सीन असो या इतर सीन असो तसे ते म्युजिक रंगत होते. व्ही एफ एक्स चांगले आहेत त्यामुळे रिअल दृश्य दिसायला बरे वाटले.
विशेष माहिती :-
पठाण ला एक मिशन दिले आहे ज्यात त्याला एक टीम बनवण्यास सांगितले आहे. त्यामुळे पठाण चा पुढील भाग येणार याची खात्री आहे.
“पठाण” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये बघू शकता.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.४ स्टार देईन.
तुम्ही पठाण चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.