पुष्पा २: द रुल चित्रपट समीक्षा । अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर बहुचर्चित चित्रपट एकदम वाईल्ड फायर सारखा आहे
Written by : के. बी.
Updated : डिसेंबर 05, 2024 | 03:04 PM
पुष्पा २: द रुल चित्रपट समीक्षा । अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर बहुचर्चित चित्रपट एकदम वाईल्ड फायर सारखा आहे | Pushpa 2: The Rule Movie Review. Allu Arjun and Rashmika Mandanna starrer much talked about movie is like Wild Fire
पुष्पा २: द रुल (Pushpa 2: The Rule) |
लेखक | सुकमार, ए. आर. प्रभाव, श्रीकांत विस्सा |
दिग्दर्शक | सुकमार |
कलाकार | अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहद फासिल |
निर्माता | नवीन येर्नेनी, वाय. रविशंकर, सुकमार |
संगीत | देवी श्री प्रसाद |
रिलीज तारीख | ५ डिसेंबर २०२४ |
देश | भारत |
भाषा | तेलुगू |
कथा :-
पुष्पा 2: द रुलचा ट्रेलर पुष्पा राज ची कथा सुरू ठेवतो जिथून पहिला चित्रपट संपला होता. या सिक्वलमध्ये, लाल चंदन तस्करी करणाऱ्या सिंडिकेटमध्ये पुष्पाच्या वाढीला नवीन आव्हानांचा सामना करावा लागतो, विशेषत: शक्तिशाली पोलीस अधिकारी भंवर सिंग शेखावत (फहाद फासिलने भूमिका केली आहे) कडून. दोन स्थरातील बदलीची भावना ठळकपणे मांडण्यात आली आहे. पुष्पा राजच्या प्रवासाची सातत्य दाखवते.
“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
पुष्पा… पुष्पराज… झुकेगा नही साला.! म्हणत दाढी वरून हात फिरवत म्हंटलेला डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला. प्रत्येक ठिकाणी हाच डायलॉग ऐकू येत होता. बऱ्याच ठिकाणी त्याचे रिल्स व्हायरल होऊ लागले. “पुष्पा नाम सूनके फ्लावर समजे क्या..? फायर हु में.. !” प्रत्येक ठिकाणी फ्लावर आणि फायर सारखे शब्द कानी पडू लागले. त्यातील गाणी हि सुपरहिट होती. दमदार स्टोरी, डायलॉग बाजी, धडाकेबाज फायटिंग सीन होते. पुष्पा आणि श्रीवल्ली हि जोडी फेमस झाली. असा हा चित्रपट “पुष्पा: द राइज” सुपरहिट झाला. आणि आज ५ डिसेंबर २०२४ ला रिलीज झालेला “पुष्पा २: द रुल” चित्रपट अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल अभिनीत सुकुमार दिग्दर्शित ब्लॉकबस्टर चित्रपट “पुष्पा: द राइज” चा सिक्वेल आहे. पुष्पा 2: द रुल चित्रपट खूप उत्साह आणि सकारात्मक भूमिका निर्माण करत आहे.
दिग्दर्शन: प्रथम चित्रपट सुरु होताना व नंतर क्लायमेक्स ला तुफानी अशी तीव्र ॲक्शन सीक्वेन्स दाखवण्यात आला आहे. फक्त त्यावेळी बघताना लॉजिक लावू नका. ॲक्शन सीक्वेन्स चा एन्जॉय घ्या. चित्रपटाची कथा सिम्पल आहे. पहिला चित्रपट बघायची गरज नाही. तुम्हाला कथा समजू शकते. फक्त पात्रांची नावे आणि त्यांची नाती समजायला वेळ जाईल. आकर्षक कथानक आणि पुष्पाच्या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेचा सखोल शोध दर्शवितो, कारण तो त्याच्या साम्राज्याचे आणि प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी प्रतिकूलतेशी लढतो. ॲक्शन-पॅक सीक्वेन्स आणि पुष्पा (अल्लू अर्जुन) आणि भंवर सिंग शेखावत (फहाद फासिलने भूमिका केलेली) यांच्यातील बदलीची भावना ठळकपणे मांडण्यात आली आहे. पुष्पा आणि श्रीवल्ली (रश्मिका मंदान्ना यांनी साकारलेली) यांच्यातील केमिस्ट्री अपेक्षित होती तशी दिसून येते. लहाणपणची काही गोष्टी ज्यामुळे कथेला अधिक भावना जोडण्यात आली आहे. क्लायमॅक्क्स मध्ये सीन बघण्यास भारी वाटतात. फॅमिली इमोशन निर्माण होतील. मेकअप आर्टिस्ट आणि कॉस्ट्यूम डिझायन ची कामगिरी उत्तमच दिसून येते.
टेक्निकल: चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफिक खूपच उत्तम आहे. बंदूक, गाड्यांचा विस्फोट असो या जंगलातील सीन, गाड्यांची तोडफोड, फायटिंग सीन उत्तम रित्या शूट केले आहे. व्ही. एफ. एक्स. ची जोड चांगल्या प्रकारे देण्यात आलेली दिसून येते. त्याच सोबत वाजणारे बॅकग्राऊंड म्युजिक उत्तम रित्या नसले तरी बऱ्यापैकी सात देते. लार्ज सिक्वेन्स दसून येतो. त्यामुळे बघायला खूप मजा येते. प्रत्येक सीन बघण्यास बोर होत नाही. पहिल्या चित्रपटांत सर्वच गाणी सुपर हिट होती. पण यात एकच “अंगारो” गाणे सुपर हिट आहे. आणि “पुष्पा पुष्पा पुष्पराज” गाणे चांगले वाटते.
भूमिका: धमाकेदार एन्ट्री, चालण्याची ढब, बोलण्याची शैली अशी उत्कृष्ट प्रतिकृती आलू अर्जुन यांनी पुष्पा मधून निर्माण केली आहे. विशेष म्हणजे महाकाली अवतार चा सीन पाहून थक्क व्हाल. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रशंसा करत आहेत. फहद यांची शेखावत पोलीस ची भूमिका प्रेक्षकांना मग्न करून टाकते. इतरांनी हि भूमिका चांगल्या केल्या आहेत.
फायनल: फायर नही….. वाईल्ड फायर….. असा हा चित्रपट म्हणावा लागेल त्याला दुमत नाही. कारण चित्रपटाची दशा आणि दिशा सुद्धा असली वाईल्ड फायर च आहे. त्या डायलॉग नुसार हा चित्रपट वाईल्ड फायर आहे. त्यामुळे तुम्ही नक्की चित्रपट पहा.
हा चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकता. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी डबिंग उत्तम आहे. पहिल्या चित्रपटात पुष्पाला श्रेयस तळपदे यांनी आवाज दिला होता. तो आवाज लोकांनी खूप आवडला. आणि पुष्पा २ मधून सुद्धा श्रेयस तळपदे यांचा आवाज देण्यात आला आहे. बाकीचे डबिंग सुद्धा चांगले आहे. चित्रपट शेवटी तुम्हाला पुढील तिसरा भाग “पुष्पा ३: द रॅमपेज” ची झलक बघायला मिळणार आहे. शेवटी टाईम बॉम्ब बटन दाबून धमाका होतो तसा चित्रपट संपतो. ते बटन कोणी दाबले असावे याची उत्सुकता तिसऱ्या चित्रपटांत समजेल.
“पुष्पा २: द रुल” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.5 स्टार देईन.
तुम्ही पुष्पा २: द रुल चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.