फास्ट एक्स फिल्म समीक्षा | फास्ट अँड फुरीअस सिरीज ची दहावी फिल्म
Written by : के. बी.
Updated : जून 13, 2023 | 01:26 AM

फास्ट एक्स |
लेखक | डॅन मजेउ, जस्टिन लिन, जॅक डीन |
दिग्दर्शक | लुई लेटरीयर |
कलाकार | विन डिजल, जैसन स्टैथम, जॉन सेना, मिशेल रॉड्रिग्ज, टायरीस गिब्सन, जेसन मोमोआ, चार्लीज थेरॉन, ब्रि लार्सेन |
निर्माता | नील एस.मोरित्ज, जस्टिन लिन, जेफ करशनबॉम, सामंथा विन्सेंट |
संगीत | ब्रायन टायलर |
प्रदर्शित तारीख | १८ मे २०२३ |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
हर्नान रियेस चा मुलगा डांटे रेयेस एक सायको आहे. डांटे रेयेस आपल्या वडिलांच्या संपत्तीचे नुकसान झाल्याबद्दल आणि त्यांच्या मृत्यू चा बदला घेण्यासाठी डॉमनिक टोरॅटो आणि त्यांची पूर्ण फॅमिली ला संपवण्याचे षडयंत्र रचत आहे.
“फास्ट एक्स” चित्रपट समीक्षा :-
फास्ट अँड फुरीअस सिरीज चा पहिला चित्रपट २२ जून २००१ ला प्रदर्शित झाला. फास्ट एक्स म्हणजे फास्ट अँड फुरीअस सिरीज ची दहावी फिल्म आहे. फास्ट अँड फुरीअस सिरीज चा अँड फुरीअस सिरीज च्या पाचव्या चित्रपटाचा नायक डॉमनिक टोरॅटो हर्नान रियेस ची लपवलेली करोडो ची संपत्ती लुटून घेऊन जातात. त्यातुन हर्नान रियेस मारला जातो. त्यामुळे फास्ट एक्स पाहण्यापूर्वी तुम्हाला पाचवा भाग बघितला तर तुम्हाला लगेच समजेल नाही बघितला तरी समजेल कारण त्या पाचव्या भागाचा लास्ट सीन फास्ट एक्स च्या सुरुवातीला दाखवण्यात आला आहे.ते पाहूण पुरानी यादे ताजा हो गयी. फास्ट फाईव्ह चित्रपट जस्टीन लिन यांनी दिग्दर्शिन केले. फास्ट एक्स चे दिग्दर्शन लुई लेटरीयर यांनी केले आहे. फास्ट फाईव्ह स्टोरी लाईन मध्ये दम होता तशी फास्ट एक्स ची स्टोरी खास नाही आहे. यात बघायचे म्हणजे हिरो आणि व्हिलन ची एन्ट्री आणि त्यांची ॲक्शन, नेहमी प्रमाणे फास्ट म्हंटल्यावर थरारक गाड्यांची रेस. धमाके दार गाड्यांचा विस्फोट. असे काही बघितल्यावर रोमांचक होऊन जातो. व्ही. एफ. एक्स. काम मजबूत करण्यात आले आहे. जेणेकरून ऍक्शन जिवंत वाटतात पण खूपच अतिशयोक्ती सीन दाखवले आहेत. जे काही ऍक्शन सीन ला फिजिक्स प्रमाणित करू शकत नाही.
मोठ मोठे स्टारर नि त्यात पात्रानुसार ऍक्टिंग ची छाप टाकली आहेच. पण त्यातून हिरो पेक्षा खलनायकाची भूमिका सर्वात जास्त भारी आहे. फास्ट एक्स मधून आपल्याला खलनायक डांटे रेयेस (जेसन मोमोआ) यांचा नवीन चेहरा बघायला मिळाला. आणि मिस्टर नोबडीज च्या मुलगी टेस्स ची भूमिका ब्रि लार्सेन यांनी केली आहे.
काही सेकंद चा लिप कीस सोडला तर चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकता.
“फास्ट एक्स” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २.5 स्टार देईन.
तुम्ही फास्ट एक्स चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.