“फुलराणी” सौंदर्य स्पर्धेच्या कथेवरील मराठी चित्रपट
Written by : के. बी.
Updated : एप्रिल 11, 2023 | 11:31 PM
फुलराणी |
लेखक | विश्वास जोशी, गुरु ठाकूर |
दिग्दर्शक | विश्वास जोशी |
कलाकार | सुबोध भावे, प्रियदर्शिनी इंदुलकर, विक्रम गोखले, वैष्णवी आंधळे, मिलिंद शिंदे |
निर्माता | जाई जोशी, ए राव, स्वानंद केळकर |
संगीत | निलेश मोहरीर, वरून लीखटे |
प्रदर्शित तारीख | २२ मार्च २०२३ |
भाषा | मराठी |
कथा :-
छोट्या गावातील गावठी भाषा गावठी राहणीमाण असलेली शेवंता उर्फ राणी हिला मिळालेली संधी आणि मॉडेल ग्रूमिंग एजेन्सीचे मालक विक्रम यांनी शेवंता ला सौंदर्य स्पर्धेत जिंकवून देण्याची पैज स्वीकारली आहे. ते आव्हान पूर्ण होईल कि नाही अशी एक जॉर्ज बर्नार्ड शोज ची क्लासिक पैग्मेलियन वर आधारित कथा आहे.
“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
फुलराणी म्हटलं कि आपल्याला काय आठवते.? त्र्यंबक बापुजी ठोंबरे ( बालकवी ) यांनी लिहिलेली फुलराणी कविता आठवते. जणू काय आपल्या डोळ्यासमोर फुलराणी येऊन उभी राहते अशी ती कविता म्हणजे “फुलराणी”
हिरवे हिरवे गाल गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी हि खेळत होती.
तुम्ही म्हणत असाल हि कविता आपल्याला का सांगत काय.? कारण ह्याच कवितेचा उल्लेख चित्रपटांत करण्यात आलेला आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी फुलराणी मधून अश्या एका फुलराणी ला दाखवली आहे जी आपल्याच गावात, आपल्या तालात, आपल्या भाषेत, आपल्याच धुंधीत, बिन्दास्त अशी फुलराणी दिसून येते. कथा तशी सुरुवातीला आपण थोडेशे विनोदी चुटकुले आहेत ज्यांनी आपले हसू उमेटेल. पुढे प्रसिद्ध मॉडेल ग्रूमिंग एजेन्सीचे मालक विक्रम यांनी पैज गावठी असलेली शेवंता यांच्यातील सौंदर्य स्पर्धेतील प्रवास सोप्या पद्धत्तीत मांडला गेला आहे. कदाचित तुम्ही थोडे बोर व्हाल. पण शेवट काहीतरी विचार आपल्याला सांगून जातो.
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील प्रियदर्शिनी इंदुलकर यांनी आपल्याला खूप हसवलं आहे. ते तुम्ही पाहिलेच असेल, आणि आता आपल्याल ती फुलराणी मधील शेवंता (फुलराणी ) म्हणून दिसणार आहे. फुलराणी ला साजेल अशी त्यांनी भूमिका केली आहे. सुबोध भाबे यांनी “बालगंधर्व”, “लोकमान्य एक युगपुरुष “, “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” या जिवनचारित्र चित्रपटांत उत्तम अभिनय करून प्रत्येकांच्या मनात राहिले. आता फुलराणी मधून एक विक्रम ची भूमिका साकारली आहे. विक्रम चे वडिल ब्ररिगेडीअर विराज राज्याध्यक्ष यांची भूमिका विक्रम गोखले यांनी केली. इतरांनाहि आपली भूमिका चांगली आहे.
“फुलराणी” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
२.५⭐/ ५⭐
वरील चित्रपट तुम्ही पहिला असेल तर तुम्हांला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.