“फ्युरियोसा: अ मॅड मॅक्स सागा” चित्रपट समीक्षा । ख्रिस हेम्सवर्थ खलनायकाच्या भूमिकेत
Written by : के. बी.
Updated : नोव्हेंबर 10, 2024 | 12:34 PM
फ्युरियोसा: अ मॅड मॅक्स सागा (Furiosa: A Mad Max Saga) |
लेखक | निको लाथौरिस |
दिग्दर्शक | जॉर्ज मिलर |
कलाकार | ख्रिस हेम्सवर्थ, अन्या टेलर-जॉय, टॉम बर्क, अलायला ब्राऊन |
निर्माता | डग मिशेल, जॉर्ज मिलर |
संगीत | टॉम होल्केनबोर्ग |
रिलीज तारीख | २४ मे २०२४ |
देश | ऑस्ट्रेलिया |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
ही कथा आहे डिमेंटस आणि त्याच्या बाइकर हॉर्डे यांनी अनेक मातांच्या ग्रीन प्लेसमधून अपहरण केल्यानंतर फुरियोसाच्या प्रवासाचे वर्णन करते. ती विश्वासघातकी वेस्टलँडवर नेव्हिगेट करत असताना, फ्युरिओसा ला इमॉर्टन जोच्या अध्यक्षतेखाली किल्ल्यात डिमेंट्स ने केल्याला डील मध्ये फ्युरिओसा ला किल्ल्यात ठेवले जाते आणि नंतर तिला तिच्या घरी जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी तिला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. आणि तिला तिच्या डोळ्या समोर मारलेल्या आईचा बदला घेते कि नाही ते पहा.

“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
जॉर्ज मिलर दिग्दर्शित, “फुरियोसा: अ मॅड मॅक्स सागा” हा प्रतिष्ठित मॅड मॅक्स फ्रँचायझीमधील सेकंड भाग आहे. “मॅड मॅक्स: फ्युरी रोड” च्या इव्हेंटच्या काही वर्षांपूर्वी सेट केलेल्या या प्रीक्वलमध्ये अन्या टेलर-जॉय तरुण फ्युरियोसा पात्रामध्ये आणि ख्रिस हेम्सवर्थ हे युद्धखोर डिमेंटस पात्राच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात टॉम बर्क प्रेटोरियन जॅकच्या भूमिकेत आणि तरुण फ्युरियोसाच्या भूमिकेत अलायला ब्राउन आहे. प्रत्येकांच्या तीव्र क्रिया, आकर्षक पात्रे आणि चित्तथरारक व्हिज्युअल्ससह दिसून येतात. प्रत्येक सीन बघण्यास भारी वाटते. आणि पुढे काय होणार आहे याची आपण कप्लना करू शकत नाही.
हा चित्रपट हाय-ऑक्टेन ॲक्शन सीक्वेन्स, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी आणि आकर्षक कथानकाने परिपूर्ण आहे. वाळवंटातील प्रत्येक सीन वेग वेगळे ट्रक, गन्स, बाईक्स, कार्स ची तुफानी रेस बघण्यास खूप भारी वाटते. कारण नेहमीच आपण एकच पाहत आलो आहे, ते म्हणजे डांबरी, काळ्या रस्त्या वरची तुफानी कार रेस. तसा “फुरियोसा: अ मॅड मॅक्स सागा” हे मॅड मॅक्स विश्वातील एक रोमांचकारी जोड आहे. पहिली फिल्म “मॅड मॅक्स फ्यूरी रोड” चित्रपटापेक्षा कमी कमाई केली आहे.
अन्या टेलर-जॉय फ्युरियोसा म्हणून एक दमदार परफॉर्मन्स देते, पात्राची ताकद आणि दृढनिश्चय दिसून येतो. ख्रिस हेम्सवर्थ निर्दयी डिमेंटसच्या रूपात चमकतो आणि चित्रपटाच्या प्रतिस्पर्ध्यामध्ये खोली वाढवतो. या चित्रपटांत त्यांनी एक खलनायकाची भूमिका केली आहे. त्यांच्या डिमेंट्स च्या रुपाला चाहते आश्चर्यचकित होतील. आणि आपल्याला थोर म्हणून प्रसिद्ध ख्रिस हेम्सवर्थ आहेत असे वाटणार नाही तुम्हाला अशी त्यांनी भूमिका केली आहे.
हा चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकता.
“जगभरून फिल्म्स” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
जिओ सिनेमा या ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म वर पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.२ स्टार देईन.
तुम्ही ट्रान्सफॉर्मर्स : राईज ऑफ द बीस्टस चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
ॲक्शन रोमँटिक