HomeSongs

बहीणीची राखी अन भावाची ओवाळणी रक्षाबंधन निमित्त ऐका हि लोकप्रिय सदाबहार हिंदी गाणी..!

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 30, 2023 | 2:23 AM

नमस्कार मंडळी! तुमच्या लक्षात आलंच असेल की हा लेख कशाबद्दल आहे. तुम्हाला माहित असेलच उद्या रक्षाबंधन हा पवित्र सण. भाऊ आणि बहीणीचं नातं दृढ करणारा हा सण. आपल्या भावाने आपलं रक्षण करावं या हेतूने प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊसुद्धा तिला हे वचन देतो की तो जन्मभर तिची रक्षा करेल.
हल्ली तसा प्रत्येक सण हा आधुनिक पद्धतीने साजरा केला जातो. तसाच रक्षाबंधन देखील केला जातो. परंतु यातील मुख्य हेतू आजही तोच आहे. आणि आजकाल कोणता सण असुदे किंवा कोणताही सोहळा त्यावर आधारित गाणी ऐकुण किंवा लावून तो सण सोहळा साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने आज आम्ही भाऊ आणि बहीणीचं नातं उलगडणारी आणि रक्षाबंधन वर आधारित चित्रित झालेली चित्रपटातील काही लोकप्रिय गाणी सांगणार आहोत.

Rakshabandhan festival hindi songs review and information

१. भैया मेरे राखी के बंधन को निभाना
१९५९. ३ मिनिटे ३३ सेकंद
चित्रपटछोटी बहन (१९५९)
गायकलता मंगेशकर
संगीतशंकर जयकिशन
भाषाहिंदी

खरं तर हे गाणं सांगण्याची गरज नाही कारण रक्षाबंधन किंवा बहीण भावाचं नातं म्हटलं की जर कोणतं गाणं आठवत असेल तर १९५९ साली प्रदर्शित झालेल्या छोटी बहन या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं. हे गाणं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केले असून शैलेंद्र यांनी या गीताला शब्दबद्ध केले आहे. बलराज सहानी आणि नंदा यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे. आपल्या भावडांसाठी विशेषतः दृष्टी गेलेल्या आणि लग्न मोडलेल्या आपल्या बहिणीसाठी भाऊ कसा पाठीशी उभा राहतो हे या चित्रपटात पहायला मिळतं.


२. मेरे भैया को संदेसा पहूचाना
१९५९. मिनिटे १८ सेकंद.
चित्रपटदिदी (१९५९)
गायकलता मंगेशकर
संगीतदत्ता नाईक
भाषाहिंदी

१९५९ साली प्रदर्शित झालेल्या दिदी या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं दत्ता नाईक संगीतबद्ध केले असून साहीर लुधियानवी यांच्या लेखणीतून हे गाणं साकार झालं आहे. त्या काळात भावनाप्रधान असलेल्या याच सुंदर गाण्यांमुळे तो काळ श्रीमंत होता असं म्हणावं लागेल. “दिदी” हा चित्रपट गोपाल आणि कमला या भावडांची गोष्ट सांगणारा आहे.


३. हम बहनों के लिये
१९५९. ४ मिनिटे ३० सेकंद
चित्रपटअंजाना (१९५९)
गायकलता मंगेशकर
संगीतलक्ष्मीकांत प्यारेलाल
भाषाहिंदी

१९५९ साली प्रदर्शित झालेल्या अंजाना या चित्रपटातील राजेंद्र कुमार आणि नझीमा यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गीत आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं तर या गाण्याला संगीत दिले होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. तर लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात हे गीत गायलं होतं. त्या काळातील बहुतांश गाणी ही लता मंगेशकर यांच्या आवाजातील आहेत.


४. रंगबिरंगी राखी लेकर
१९६२. ४ मिनिटे ८ सेकंद
चित्रपटअनपढ (१९६२)
गायकलता मंगेशकर
संगीतमदन मोहन
भाषाहिंदी

नव्वदच्या दशकातील चित्रपटांतील गाण्यांची बात काही औरच होती. अनपढ या चित्रपटातील रक्षाबंधन वर आधारित हे गीत लता मंगेशकर यांनी गायलं असून मदन मोहन यांनी संगीतबद्ध केले होते. व राजा मेहदी अली खान यांनी या गीताला शब्दबद्ध केले होते.


५. मेरे भैया मेरे चंदा
१९६५. ३ मिनिटे १ सेकंद
चित्रपटकाजल (१९६५)
गायकआशा भोसले
संगीतरवी
भाषाहिंदी

मीना कुमारी आणि राज कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत काजल या चित्रपटातील असून आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेले आहे. या गाण्याला संगीत लाभलं आहे रवी यांचं आणि शब्दबद्ध केले आहे साहीर लुधियानवी यांनी.


६.मेरी प्यारी बहनिया
१९७०. ४ मिनिटे ५८ सेकंद
चित्रपटसच्चा झुठा (१९७०)
गायककिशोर कुमार
संगीतकल्याणजी,आनंदजी
भाषा

सच्चा झुठा या सुपरहिट चित्रपटातील हे गीत किशोर कुमार यांनी गायलं असून कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केले आहे. राजेश खन्ना, विनोद खन्ना आणि मुमताज यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गीत आजही लोकांना तेवढंच आवडतं.


७. फूलों का तारों का सबका कहना है
१९७१. ५ मिनिटे १० सेकंद
चित्रपटहरे रामा हरे कृष्णा (१९७१)
गायककिशोर कुमार, लता मंगेशकर
संगीतबर्मन
भाषाहिंदी

फूलों का…तारों का… सबका कहना है..
एक हजारों में मेरी बहना है…
सारी उमर हमें संग रहना है..
फूलों का, तारों का, सबका कहना है

  किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलं असून आर. बर्मन यांनी संगीतबद्ध केले आहे.

८. ये राखी बंधन है ऐसा
१९७२. ३ मिनिटे ३५ सेकंद
चित्रपटबेईमान (१९७२)
गायक लता मंगेशकर, मुकेश
संगीतशंकर – जयकिशन
भाषाहिंदी

मनोज कुमार आणि नझीमा यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गीत लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलं होतं. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या बेईमान या चित्रपटातील या गाण्याला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी.


९. बहना ने भाई के कलाइ से
१९७४. ५ मिनिटे ९ सेकंद
चित्रपटरेशम की डोरी (१९७४)
गायकसुमन कल्याणपूर
संगीतशंकर – जयकिशन
भाषाहिंदी

बहना ने भाई की कलाई से प्यार बाँधा है…
प्यार के दो तार से, सँसार बाँधा है…
किती अर्थपूर्ण गाणी असायची तेव्हा. “रेशम की डोरी” या चित्रपटातील हे गाणं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं असून इंदीवर यांनी ते लिहिलेलं आहे. आणि संगीतबद्ध केले आहे शंकर जयकिशन या जोडीने. सायरा बानू, धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं नक्कीच खास आहे.


१०. चंदा रे मेरे भैया से केहना
१९८०. ४ मिनिटे ११ सेकंद
चित्रपटचंबल की कसम (१९८०)
गायकलता मंगेशकर
संगीतमोहम्मद झाहूर खय्यम
भाषाहिंदी

साहीर लुधियानवी यांनी लिहिलेलं चंदा रे मेरे भैया से केहना हे गीत चंबल की कसम या चित्रपटातील असून लता मंगेशकर यांनी गायलं आहे. या गीताला संगीतबद्ध केले आहे मोहम्मद झाहूर खय्यम यांनी.
चंदा रे मेरे भैया से केहना…
ओ मेरे भैया से केहना बेहना याद करें…
एक बहिण आपल्या भावाच्या भेटीसाठी किती व्याकुळ असते हे या गाण्यातून बघायला मिळतं.



११. ओ मेरी बेहना
१९८५. ६ मिनिटे १२ सेकंद
चित्रपटप्यारी बेहना (१९८५)
गायकएस. पी. सुब्रमण्यम
संगीतबप्पी लहरी
भाषाहिंदी

ओ मेरी बेहना…मै तेरा भैया भी..
मै तेरी मैयां भी..बाबूल भी मैं हू तेरा….
हे नितळ सुंदर गाणं एस. पी. सुब्रमण्यम यांच्या सुरेल आवाजातील असून चित्रपट होता प्यारी बेहना. बहीण भावाच्या नात्यावर हा चित्रपट आधारित होता. या गाण्याला शब्दांमध्ये ओवलं आहे ते म्हणजे इंदवीर आणि अंजान यांनी. बप्पी लहरी यांनी या गीताला संगीतबद्ध केले आहे.


१२. भाई बेहेन का प्यार
१९९१. ६ मिनिटे १६ सेकंद
चित्रपटफरिश्ते (१९९१)
गायक मोहम्मद अझीज, अमित कुमार, अनुराधा पौडवाल
संगीतबप्पी लहरी
भाषाहिंदी

कितना सुंदर कितना प्यारा येह सारा संसार है…
इस संसार में सबसे प्यारा भाई बेहेन का प्यार है…
आनंद बक्षी यांनी अजून एक भाऊ बहीणीवर लिहिलेलं हे सुंदर गीत फरिश्ते या चित्रपटातील असून विनोद खन्ना, धर्मेंद्र आणि जयाप्रदा यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मोहम्मद अझीज, अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं आहे.


१३. इसे समझो ना रेशम का तार भैया
१९९३. ५ मिनिटे ९ सेकंद
चित्रपटचित्रपट :- तिरंगा (१९९३)
गायकसाधना सरगम
संगीतलक्ष्मीकांत प्यारेलाल
भाषाहिंदी

इसे समझो ना रेशम का तार भैया
मेरे राखी का मतलब है प्यार भैया…
या सुंदर गीताचे बोल लिहिले आहेत संतोष आनंद यांनी. १९९३ साली प्रदर्शित झालेला तिरंगा चित्रपट चांगलाच गाजला होता आणि हे गाणं सुद्धा. साधना सरगम यांनी गायलेल्या या गीताला संगीतबद्ध केले आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.


१४. तेरे साथ हु मैं
२०२२. ३ मिनिटे ५२ सेकंद
चित्रपटरक्षाबंधन (२०२२)
गायकनिहाल तौरो
संगीतहिमेश रेशमिया
भाषाहिंदी

रक्षाबंधन याच चित्रपटातील हे दुसरं एक गाणं भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा बंध उलगडणारं गाणं आहे. निहाल तौरो यांनी हे गाणं गायलं असून हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केले आहे. इर्शाद कामील यांनी या गीताचे बोल लिहिले आहेत.


१५. धागों से बांधा
२०२२. ४ मिनिटे ३८ सेकंद
चित्रपटरक्षाबंधन (२०२२)
गायकश्रेया घोषाल, अरिजित सिंग
संगीतहिमेश रेशमिया
भाषाहिंदी

चार बहिणींचा एक भाऊ आपल्या बहिणींच्या सुखासाठी काय काय करू शकतो हे दाखवणारा अक्षयकुमार याचा रक्षाबंधन हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. त्यातील धागों से बंधा हे गाणं याच रक्षाबंधन वर लिहीलं आहे इर्शाद कामील यांनी आणि संगीतबद्ध केले आहे हिमेश रेशमिया यांनी.
श्रेया घोषाल आणि अरजित सिंग यांच्या आवाजातील हे गाणं अतिशय सुंदर आहे.


१६. कधी हसणार आहे.. कधी रडणार आहे
२०१९. ४ मिनिटे ३६ सेकंद
चित्रपटखारी बिस्किट (२०१९)
गायकआदर्श शिंदे, रोंकीनी गुप्ता
संगीतअमितराज
भाषामराठी

तुझे सारे उन्हाळे
हिवाळे पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे…
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….
क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणं इतक्या सुंदर शब्दांत मांडलं आहे की नुसतं ऐकलं तरी डोळे भरून येतात. वेदश्री आणि आदर्श यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं खारी बिस्किट या मराठी चित्रपटातील असून रोंकीनी गुप्ता आणि आदर्श शिंदे यांनी गायलं आहे. या गाण्याला संगीत दिलं आहे अमितराज यांनी.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *