बाईपण भारी देवा चित्रपट समीक्षा | बाईपण सांगणारा सहा बहिणी असलेला चित्रपट
Written by : के. बी.
Updated : जुलै 10, 2023 | 01:48 AM
बाईपण भारी देवा |
लेखक | वैशाली नाईक, ओंकार मंगेश दत्त |
दिग्दर्शक | केदार शिंदे |
कलाकार | रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब |
निर्माता | माधुरी भोसले, बेला शिंदे, अजित भुरे |
संगीत | साई-पियुष |
प्रदर्शित तारीख | ३० जुने २०२३ |
देश | भारत |
भाषा | मराठी |
कथा :-
सहा बहिनी मंगळागौरी च्या स्पर्धेसाठी एकत्र जमा होतात. आणि त्यांच्या वयक्तिक जीवनामध्ये करत असलेला संघर्ष, आणि त्यांची व्यथा काय आहे. अशा परिस्थितीत काय सहा बहिनी मंगळागौरी स्पर्धा जिंकातात का ते नक्की बघा.
“बाईपण भारी देवा” चित्रपट समीक्षा :-
बाईच्या मनातील ओळखणारा मनकवड्या असणारा असा एक “अग बाई अरेच्चा” नावाचा चित्रपट हिट झाला. ह्यालागाड आणि त्यालागाड अशी दोन गावांची नावे तुम्हाला आठवतात का २००६ प्रदर्शित झालेला जत्रा चित्रपट मधील नावे आहेत. तो चित्रपट सुपर हिट होता. त्यातील “कोंबडी पळाली तंगडी घालून लंगडी घालायला लागली” हे गाणे खूपच गाजले होते. “बकुला नामदेव घोटाळे”, “इरादा पक्का”, “अग बाई अरेच्या २” असे अनेक सुपेरहीट चित्रपट त्यांनी बनवले आहेत. तसेच आता नुकताच प्रदर्शित झालेला महाराष्ट्र शाहीर चित्रपट हि केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. अनके वेगवेगळे कथाकथन, विनोदी, आगळीवेगळी कथा, असे वेगळेपण केदार शिंदे यांच्या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळते. आणि आता असाच एक स्त्रियांची व्यथा सांगणारा, स्त्रियांना होणार त्रास, त्यांचे जीवन, त्यांचे राहणीमान आपल्याला दाखवण्यात आले आहे. आणि आपला मराठी वारसा पण जपला आहे. हे सर्व दाखवताना तुम्ही कधी हसाल कधी रडू पण येईल. हे दिग्दर्शकांनी हुबेहूब हेरले आहे. सुरुवातीची ५ , १० मिनिटे नेमकं काय चाललंय समजणार नाही. त्यानंतर स्पर्धेत भाग घेतल्यावर येणाऱ्या अडचणी, संघर्ष, बहीणी-बहीणींचे भांडणे, बहीणींचा दुरावा, एकमेकांबद्दल असलेले गैसमज, काही घेतलेले निर्णय अशा अनेक घटना आपल्या दैनंदिन जीवनात होत असतात. तेच लेखकांनी चांगल्या प्रकारे मांडले आहे. संवाद लेखन उत्कृष्ट पद्धतीने लिहिले आहे.
कास्टिंग चांगल्या प्रकारे केली आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपटाचे संगीत आणि गाणीही खूप आहे. हा चित्रपट तुम्ही परिवार सोबत बघुत शकता.
“बाईपण भारी देवा” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.5 स्टार देईन.
तुम्ही बाईपण भारी देवा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.