ब्रह्मास्त्र : भाग एक – शिवा ( भारतीय पौराणिक कथे वर आधारित सुपरहिरो फिल्म्स )
Written by : के. बी.
Updated : नोव्हेंबर 7, 2022 | 11:59 PM
२०२२ सीबीएफसी :- यू / ए 13 कालावधी : – 2 तास 47 मिनिटे
शैली : – ॲक्शन, साहसी, काल्पनिक
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग :– २.८✰ / ५✰
लेखक : – अयान मुखर्जी, हुसैन दलाल,
दिग्दर्शक : – अयान मुखर्जी
कलाकार : – अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, शाहरुख खान, नागार्जुन अक्किनेनी, मौनी रोय
निर्माता : – मारीजके डीसुझा, व्हॅलेंटीन दिमित्रोव्ह, करण जौहर, अयान मुखर्जी, रणबीर कपूर, नमित मल्होत्रा
संगीत : – प्रितम
प्रदर्शित तारीख : – 9 सेप्टेंबर 2022
भाषा : – हिंदी
देश : – भारत

कथा सारांश :-
प्राचीन भारतातील सर्व अस्त्र मधील सर्वश्रेष्ठ अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र. ज्यात पूर्ण ब्रह्मांड नष्ट करण्याची ताकद आहे. अनेक अस्त्र परिधान करणारा देव याला पुनर्जीवित करण्यासाठी ब्रह्मास्त्रा ची गरज आहे. ब्रह्मास्त्राचे तीन तुकडे मिळवण्यासाठी जुनून शोध घेत आहे. शिवा – इशा आणि ब्रह्मांश टीम जुनून ला रोखण्यासाठी धडपडत आहेत.
ब्रह्मास्त्र : भाग एक – शिवा समीक्षा
महाभारतातील अनेक अस्त्राचा वापर करण्यात आला. त्यासार्वांपैकी एक सर्वश्रेष्ठ ब्रह्मास्त्र तुम्हाला माहित असलेच याचाच आधार घेवून आयान मुखर्जी यांनी हा चित्रपट बनवला. ज्यामध्ये तुम्हाला अनेक अस्त्रवर्स (ब्रह्मास्त्र, अग्नी अस्त्र, जल अस्त्र, वानर अस्त्र, नंदी अस्त्र, इत्यादी) दिसून येतील. असे ऐकण्यात आले आहे कि गेली ८ ९ वर्षापासूनच हा चित्रपट बनवण्यास सुरुवात झाली. तशी मेहनत पण यात दिसून येते. मारवेल सुपरहिरो फिल्म्स सारखी सुपरहिरो आधारित फिल्म बनवली आहे. असे म्हणायला काही हरकत नाही. कारण आता याचे हक्क पण मारवेल चे मालक दिज्नी स्टुडीओज ने खरेदी केले आहे. त्यामुळे हि फिल्म्स तुम्ही दिज्नी प्लस हॉटस्टार वर पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला सद्यास्यता घ्यावी लागेल. फिल्म्स पहिले १० मिनिटे फ्री मध्ये पाहू शकता.
सुरुवातीची १० मिनिटे ग्राफिक्स विडीवो दाखवण्यात आला आहे जे स्टोरी ची सुरुवात कुठून झाली ते सांगते. याच्यातील होवून गेलेल्या पिढींचे ग्राफिक्स खूप भावले. आणि त्यासोबत असणारा आवाज ऐकायला भारी वाटतो कारण महानायक अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाजात कथा सांगत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांचा ८० वा वाढदिवस साजरा झाला. तरीपण त्यांची काम करण्याची शक्ती अजून तशीच जशी यंग मॅन सारखी. त्यांनी ब्रह्मांश आश्रम चे गुरु ची भूमिका केली आहे. ग्राफिक्स विडीवो संपल्यावर आपल्याला शाहरुख खान उर्फ एस आर के दिसतील. मोहन भार्घाव जे एक वैज्ञानिक आहेत. आणि ते एक ब्रह्मांश सदस्य असून वानारास्त्र परिधान केले आहे. राहत्या बिल्डिंग मधुन जेव्हा ते उड्डाण करतात त्यावेळी त्यांचे वानारास्त्र हनुमान यांचे प्रतिबिंब प्रकट होते. ते पाहण्यास खूप भारी वाटते.
त्याने तिला पाहले तिने त्याला पाहले दोघेही एका नजरेत प्रेमात पडले पण आणि तो तिला घेवून गेला पण. नेहमीप्रमाणे तीच प्रेम कथा जरा निराशा करते. असो त्या नंतर जेव्हा शिवा ला पुढे काय होणार याचे दौरे पडल्यानंतर जरा बघायला बरे वाटते. हा प्रेमवीर म्हणजे शिवा जो एक डी जे वाला आहे. इशाला पाहताक्षणी प्रेमात पडतो. इथून दोघांची वाटचालीस सुरुवात होते. शिवाला आपल्या अंगातील असणारी शक्ती ची जाणीव होते. शिवाची भूमिका रणबीर कपूर आणि इशा हि भूमिका आलीया भट्ट यांनी केली आहे. आर्टिस्ट अनिश शेट्टी एक आर्किओलॉजिस्ट व ब्रह्मांश चे सदस्य आहेत. जुनून यांच्या ट्रक लढाईत अनिश शेट्टी ट्रक ला धडक मारतात आणि त्यांचे नंदी अस्त्र नंदी चे प्रतिबिंब प्रकट होते. ते पाहण्यास एक उर्जा निर्माण होते. डार्क लाल डोळ्यांची जुनून एक भयानक पात्र भासते. अशी कि जी एकाच नजरेत भस्म करून टाकेल. ती स्कार्लेट विच सारखी भासते असे तुम्हाला वाटेल पण तसे नाही आहे. जुनून ची भूमिका मौनी रोय यांनी चांगली पार पडली आहे.
ब्रह्मास्त्र, अग्नी अस्त्र, नंदी अस्त्र, अग्नी अस्त्र. वानर अस्त्र तसेच इतर दाखवलेली अस्त्र प्रत्येक अस्त्र यांचे व्ही एफ एक्स उत्कृष्ट दर्ज्याचे आहे. पण थोडे डार्क कलर चा परिणाम दिसून येतो. शिवा ची अग्नी उर्जा उप्तन्न करतो तेव्हा अग्नी चा मेन कलर आहेच पण त्यातून गुलाबी कलर चा उपयोग दिसून येतो जो अग्नी खरी भासत नाही. काही ठिकाणी स्लो मोशन बघायला बरे दिसते. स्टोरी थोडी कमजोर वाटते. पण बघयला मजा नक्की येईल. बाकी तुमच्या काही लक्षात राहो या नाही राहो पण पूर्ण फिल्म्स बघितल्या वर ब्रह्मास्त्र, नंदी अस्त्र व वानर अस्त्र यांचे रूप आपल्या डोक्यात नक्कीच उभे राहतील. या फिल्म मध्ये शिवा इशा चा लिप कीस सोडला तर हि फिल्म तुम्ही तुमच्या फमिली सोबत पाहू शकता आणि आनंद घेवू शकता.
विशेष माहिती :-
देव (खलनायक) जिवंत झाला आहे. दुसऱ्या भागात आपल्याला देव ची अपार शक्ती चे रूप दिसेल . आणि अम्रिता जी शिवा ची आई आहे. अम्रिता ची भूमिका दिपिका पदुकोन यांनी केली आहे. यात देव ची भूमिका कोण करणार आहे याची उत्सुकता आहे.
चित्रपट कुठे पाहू शकतो..?
दिज्नी प्लस हॉटस्टार वर पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला सद्यास्यता घ्यावी लागेल. विशेष म्हणजे या फिल्म्स पहिले १० मिनिटे फ्री मध्ये पाहू शकता. हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नडा भाषेमध्ये रिलीज करण्यात आले आहे.
लेखक रेटिंग स्टार :-
माझ्या कडून या चित्रपटासाठी ५ स्टार पैकी २.८ स्टार देईन.
हा चित्रपट पाहल्यावर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच टिपण्णी करायला विसरू नका.