ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरेव्हर फिल्म समीक्षा आणि माहिती | ब्लॅक पँथर :भाग – २
Written by : के. बी.
Updated : जानेवारी 30, 2023 | 12:14 PM

ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरेव्हर |
लेखक | रायन कुगलर |
दिग्दर्शक | रायन कुगलर, जो रॉबर्ट कोल |
कलाकार | लेटिशिया राइट, लुपिता न्योंग’ओ, दानाई गुरिरा, टेनोक हूएर्टा मेहिया |
निर्माता | केविन फायगी, नाटे मूर |
संगीत | लुडविग गोरनसन |
प्रदर्शित तारीख | ११ नोव्हेंबर २०२२ |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
टी चाल्ला च्या मृत्यूनंतर वाकंडा मध्ये शोकाकुल पसरला आहे. व्हायब्रेनिअम वाकंडा मध्ये मिळते. आणि आता व्हायब्रेनिअम शोधण्याची मशीन बनवून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे पाण्याखाली नेमार च्या दुनियेत व्हायब्रेनिअम मिळत असल्याचे कळल्यावर देश विदेशातील संघटना व्हायब्रेनिअम मिळवण्यासाठी आक्रमण करत आहेत. शुरी च्या खांदयावर वाकांडा ला सुरक्षित करण्याची जबाबदारी पडली आहे.
“ब्लॅक पॅन्थर : वाकांडा फॉरेव्हर” चित्रपट समीक्षा :-
मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स ची ३० फिल्म आहे जी एक सुपरहिरो कॉमिक्स स्टोरी वर आधारीत आहे. “ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरेव्हर” चित्रपट हा १६ फेब्रुवारी २०१८ ला प्रदर्शित झालेला चित्रपट “ब्लॅक पँथर” चा सिक्वेल आहे. या चित्रपटाला ३ ऑस्कर भेटले आहेत आणि ४ ऑस्कर नोमिनी पण मिळाले आहेत. यामध्ये चाडविक बोसमॅन यांनी ब्लॅक पँथर ची उत्तम भूमिका साकारली होती. चाडविक बोसमॅन यांचे कॅन्सर आजाराने निधन झाले. त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करतो.
पुढील भागात ब्लॅक पँथर कोण असेल.? स्टोरी काय असेल.? हे पुढील भागात समजून येयील. त्यासाठी फिल्म बघावी लागेल. “ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरेव्हर” या चित्रपटांत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. दिग्दर्शक रायन कुगलर यांनी योग्यरीत्या कथेची मांडणी केली आहे कि ब्लॅक पँथर चा निधन झालेलं दाखवले आहे. फॅन च्या मनात हे प्रश्न करून गेलं कि आता ब्लॅक पँथर कोण असेल?. आपल्याला तसाच एक चपळ ब्लॅक पँथर मिळेल का.? आता मार्वल ने सुपर वूमन चे धोरण हाती घेतले आहे असे आपल्याला मार्वल च्या आलेल्या फिल्म मधून पाहायला मिळतंय. पण असो यातून आपल्याला प्रभावी असे सुपर वूमन पाहायला मिळतात. वाकांडा ची जीवन सृष्टी पाहायला मिळते त्याचबरोबर पाण्याखालील सृष्टी दाखवली आहे ती आपण कधी विचार पण केला नसेल. नेमार नावाचा सुपर पॉवर असलेला पाण्यातील राजा आपल्या दिसतो. ते पाहिल्यावर आपल्याला डी. सी. फिल्म चा ॲक्वामॅन चित्रपटातील ॲक्वामॅन वाटेल पण तसा नाही आहे. नेमार ची क्रिएटिव्हिटी उत्तम आहे. इतर काही नवीन पात्रे दिसून येतील. त्यामुळे फिल्म पावणे तीन तासापर्यंत जाते. मार्वल ची फिल्म म्हंटल्यावर व्ही. एक. एक्स. भरभरून पाहायला मिळतेच. यात पण व्ही. एक. एक्स. चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे जे आपल्या डोळ्यांना खरे दिसतात. वाकांडा शहर दाखवताना चे जे म्युजिक वाजते ते खूपच छान वाटते. वाकांडा ची थीम म्युजिक सलामी आहे. मार्वल चे फॅन असाल तर हा हि चित्रपट तुम्ही नक्की बघाल आणि इतरही बघतील. हॉटस्टार वर “ब्लॅक पँथर” चा चित्रपट बघू शकता जेणेकरून तुम्हाला सिक्वेल बघायला सोपा जाईल.
अँजेला बसेट्ट रामोंडा यांची भूमिका उत्तम केली आहे. शुरी ची भूमिका लेटिशिया राइट यांनी केली आहे. सर्वानीच भूमिका चांगल्या प्रकारे प्रकट केल्या आहते.
“ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरेव्हर” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
१ फेब्रुवारी पासून डिजनी प्लस हॉटस्टार ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म वर फ्री मध्ये पाहू शकता त्यासाठी डिजनी प्लस हॉटस्टार चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.