HomeFilms News

भारतीय चित्रपट इतिहास – भारतातील पहिला चित्रपट, पहिला बोलपट चित्रपट, पहिला रंगीत चित्रपट | Indian Films History – The first film in India, the first talkie film, the first color film

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 6:36 PM

           हिरालाल सेन हे एक प्रोटोग्राफेर होते त्यांनी एका थिएटर मधील शोज चे छायाचित्रे काढून द फ्लॉवर ऑफ पर्सिया” (The Flower Of Persia) नावांची एक फिल्म बनवली. एच. एस. भाटवडेकर यांनी मुंबई मधील हँगिंग गार्डन मध्ये कुस्ती खेळत असताना एच. एस. भाटवडेकर यांनी “द रेस्टलेर्स” The Wrestlers) हा भारतातील पहिला माहितीपट लघु चित्रपट बनवला. 

Indian%20Films%20History

भारतातील पहिला पूर्ण लांबीचा वैशिष्ट्य चित्रपट

        18 मे 1912 साली दादासाहेब तोरणे (Dadasaheb Torne) यांनी “श्री पुंडलिक” (Shree Pundlik) हा भारतातील पहिला चित्रपट रिलीज केला. पण काहीं इतिहासकारांच्या मते हा पहिला चित्रपट नव्हता.

        3 मे 1913 मध्ये “दादासाहेब फाळके” (Dadasaheb Phalke) यांनी “राजा हरिश्चंद्र” (Raja Harishchandra) हा पूर्ण लांबीचा वैशिष्ट्य मूक माहितीपट चित्रपट बनवला. ते भारतातील पहले दिग्दर्शक बनले. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. दादासाहेब मराठी होते. दादासाहेब यांनी द लाईफ ऑफ क्रिस्त ह्या चित्रपटांमध्ये त्यांनी येशूना पहिले. त्यांना कल्पना सुचली यामध्ये त्यांना हिंदू देवता दिसू लागले आणि त्यांनी  ठरवले आपण पण चित्रपट निर्माण करायचे. त्यानुसार त्यांनी चित्रपट निर्मितीची सुरुवात केली. दादासाहेब फाळके यांनी “राजा हरिश्चंद्र” हा पूर्ण लांबीचा वैशिष्ट्य मूक माहितीपट चित्रपट बनवला. ह्या चित्रपटाने भारतीय सिनेमाचा पाया रचला. म्हणूनच त्यांना भारतातील चित्रपटांचे जनक म्हणतात.

          १९१६ मध्ये  रंगास्वामी मुदालियर (Rangaswamy Mudaliar) यांनी “किचक वधम” (Keechaka Vadham) हा पहिला तमिळ मूक चित्रपट बनवला.

भारतातील पहिला अभिनेता

          “राजा हरिश्चंद्र” या चित्रपटात भारतातील पहिले अभिनेता म्हणून काम करायला संधी मिळाली. दत्तात्रय दबके (Dattatray Dabke) हे भारतातील पहिले अभिनेता बनले. यांनी हरिश्चंद्राची प्रमुख भूमिका साकार केली. त्यांचे सहकलाकार अण्णा साळूंखे (Anna Salunkhe) यांनी स्त्री पात्राची भूमिका केली. विश्वात्मा या पात्राची भूमिका गजानन साने (Gajanan Sane) यांनी केली. हरिश्चंद्र राजा च्या मुलाची भूमिका दादासाहेब फाळके यांचा मुलगा भालचंद्र फाळके यांनी केली. भालचंद्र फाळके (Bhalchandra Phalke) हे भारतातील पहले बाल कलाकार बनले.

भारतातील पहिल्या अभिनेत्री 

          या चित्रपटांमध्ये स्त्रियांना चित्रपटांत काम करण्यास निषेध असल्यामुळे दादासाहेब फाळके यांनी आपल्या पहिल्या चित्रपटांमध्ये पुरुष कलाकारांनाच स्त्रियांचे पात्र करायला सांगितले.  नंतर दादासाहेब फाळके यांनी  नोव्हेंबर १९१३ साली “मोहिनी भस्मासुर” (Mohini Bhasmasur) हा दुसरा चित्रपट काढला. या चित्रपटांमध्ये देवी पार्वती यांची भूमिका दुर्गाबाई कामत यांनी केली. दुर्गाबाई कामत (Durgabai Kamat)  या भारतातील पहिल्या महिला चित्रपट अभिनेत्री बनल्या. त्या एक मराठी होत्या. याच चित्रपटांत मोहिनी या पात्रची भूमिका दुर्गाबाई कामत यांची मुलगी कमलाबाई गोखले (लग्नाआधी कामत) यांनी केली. कमलबाई गोखले (Kamlabai Gohkale) ह्या भारतातील पहिल्या बाल अभिनेत्री बनल्या. या चित्रपटापासून महिला कलाकार यांनीहि चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली.

भारतातील पहिला बोलपट चित्रपट

         14 मार्च 1931 साली अर्देशीर इराणी (Ardeshir Irani) यांनी “आलम आरा” (Alam Ara) हा भारतातील पहिला बोलपट वैशिष्ट्य चित्रपट बनवला. भारतात पहिल्यांदाच “आलम आरा” चित्रपटांमध्ये सात गाण्याचा समावेश केला. “दे दे खुदा के नाम पे प्यार” हे गाणे मुहम्मद वजीर खान यांनी गायले. त्या गाण्याला प्रसिद्धी मिळाली. “दे दे खुदा के नाम पे प्यार” भारतातील हे पहिले गाणे आणि पहले गायक म्हणून मुहम्मद वजीर खान यांना ओळखले जाते. यानंतर चित्रपटांमध्ये गाणे असने हि एक प्रथाच बनली.
          त्यानंतर “कालिदास” (Kalidas) हा दक्षिण भारत मधील पहिला बोलपट चित्रपट एच. एम. रेड्डी (H. M. Reddy) यांनी बनवला आणि “सावित्री” (Savitri) तेलगू मधील पहिली फिल्म आहे.  विष्णुपंत दामले यांनी “संत तुकाराम” (Saint Tukaram) जीवन चरित्र चित्रपट बनवला. हा एक मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहे. “संत तुकाराम” हा पूर्ण लांबीचा वैशिष्ट्य चित्रपट आंतरराष्ट्रीय व्हेनिस चित्रपट महोत्सव मध्ये प्रदर्शित होणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला. “संत तुकाराम”  हि पहिली गोल्डन जुबिली फिल्म होती. बॉम्बे, मद्रास, कलकत्ता या सारख्या मोठ्या शहरा मध्ये स्टुडिओज निर्माण होऊ लागले. पुण्यात प्रभात स्टुडिओज ने मराठी चित्रपटाची निर्मितीला सुरुवात केली. 

भारतातील पहिला रंगीत वैशिष्ट्य चित्रपट

          8 जानेवारी 1937 साली “किसान कन्या” (Kisan Kanya) हा भारतातील पहिला रंगीत चित्रपट आहे. दिग्दर्शक मोती गिडवाणी (Moti Gidwani) आणि निर्माते अर्देशीर इराणी यांनी बनवला. हिंदी भाषे मध्ये त्याचे बोल होते. १३७ मिनिटाची फिल्म होती. इथूनच रंगीत फिल्म चे निर्माण होऊ लागले. 



          24 जानेवारी १९५३ साली “झांसी कि राणी” (Jhansi Ki Rani) हा ऐतिहासिक चित्रपट भारतातील पहिला टेक्नीकलर चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी  भाषेतील आहे. सोहराब मोदी (Sohrab Modi) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. 


भारतातील फिल्म इंडस्ट्री मधील सुवर्ण युग

          1944 ते 1960 हा काळ भारतातातील फिल्म इंडस्ट्री मधील सुवर्ण युग म्हंटला जातो. या काळात चांगल्या प्रक्रारे चित्रपट निर्माण होऊ लागले आणि व्यावसाय सुद्धा करू लागले. “नीचा नगर” (Neecha Nagar 1946), नागरिक (Nagarik 1952), बैजू बावरा (Baiju Bawra 1952) या चित्रपटासाठी मीना कुमारी (Meena Kamari) यांना पहिल्यांदाच फिल्मफेअर चा सर्वोत्कुष्ट अभिनेत्री चा पुरस्कार देण्यात आला. ट्रॅजेडी क्वीन (Tragedy Queen) म्हणून त्यांना ओळखले जाते. दो बिघा जमीन (Do Bigha Zamin 1953), चित्रपट निर्माण झाले.  सत्यजित राय (Satyajit Ray)  यांनी कल्पकथा, गुप्तचर कथा, विज्ञान कथा ऐतिहासिक वर चित्रपट बनवले. द अपू ट्रिलॉजि (The Apu Trilogy)“द बिग सिटी” (The Big City)  यासारखे चित्रपट निर्माण केले. सत्यजित राय यांना भातातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते मानले जाते. गुरु दत्त (Guru Datta) यांनी दिग्दर्शन केलेला “प्यासा” (Pyasa 1957) हा चित्रपट जगातील सर्वोत्तम चित्रपटांत गणला जातो. “आवारा” (Awara 1951) राजकपुर (Rajkapoor) यांनी बनवला. एक गरीब गावातील स्त्री ची कथा असणारा नर्गिस (Nargis) यांचा “मदर इंडिया” (Mother India 1957)  हा चित्रपट मेहबूब खान (Mehboob Khan) यांनी बनवला. “मदर इंडिया” हा भारतातील सर्वोत्तम चित्रपट मानला जातो. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आणि अकॅडेमी अवॉर्ड्स चे नामांकन मिळवणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला. दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि मुधुबाला (Madhubala) यांच्या अभिनयाने रंगलेला “मुगल ए आजम” (Mughal-e-Azam 1960) हा चित्रपट के. असिफ (K. Asif) यांनी बनवला. यामधील संगीत गाणी खूप गाजली. “दो आँखे बारह हात (Do Ankhen Barah Haath) हा चित्रपट व्ही शांताराम यांनी बनवला. 

  

भारतातील  फिल्म इंडस्ट्री मधील 1970 – 1999 चा काळ

          1970 नंतर “अमर प्रेम” (Amar Prem 1971) “आनंद” (Anand 1971) “कटी पतंग” (Kati Patang 1972) यासारख्य्या फिल्म मधील अभिनेता राजेश खन्ना हे भारतातील पहले सुपरस्टार बनले. सलीम – जावेद यांनी लिहिलेली “जंजीर” (Zanjeer 1974) “शोले” (Sholay 1975) “दिवार” (Deewaar 1975) चित्रपटातील नायक अमिताभ बच्चन यांना भारतातील महानायक म्हणून ओळखले जाते.  कमल हसन यांना “कन्याकुमारी” (Kanykumari 1974) या चित्रपटातील अभिनय साठी फिल्मफेअर चा पुरस्कार देण्यात आला.  ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) आणि रमेश सिप्पी (Ramesh Sippy) दिग्दर्शित यांचा “सीता और गीता” (Seeta Aur Geeta 1972) चित्रपट जुळ्या बहिणीच्या कथा असलेला चित्रपट खूप  यशस्वी ठरला. १९७५ साली दादा कोंडके दिग्दर्शित आणि अशोक सराफ यांचा “पांडू हवालदार” (Pandu Hawaldar 1975) विनोदी मराठी चित्रपट खूपच गाजला. स्मिता पाटील (Smita Patil) यांचा “जैत रे जैत” (Jait Re Jait 1977) राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांमध्ये सर्वोत्कुष्ट वैशिष्ठ्य चित्रपट म्हूणन राष्ट्रपती रोप्य पदक देण्यात आले.  सुपरस्टार रजनीकांत यांचा “बाशा” (Basha 1995) हा चित्रपट खूप गाजला. “धरम वीर” (Dharam Veer 1977), “अमर अकबर ऍंथोनी” (Amar Akbar Anthony 1977), “डिस्को डान्सर” (Disco Dancer 1982), “हिम्मतवाला” (Himmatwala 1983), “नाम” (Naam 1986), “मि. इंडिया” (Mr. India 1987),  सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेला “अशी हि बनवा बनवी” (Ashi Hi Banwa Banwi1988) हा विनोदी चित्रपट खूपच गाजला झाला. या चित्रपटाचे   कन्नड, पंजाबी, तेलगू , बंगाली ४ भाषेत रिमेक बनवण्यात आले. “तेजाब’ (Tejab 1988), “कयामत से कयामत तक” (Kayamt Se Kayamat Tak 1988), गीतांजली (Geetanjali 1989),  श्रीदेवी यांना “चालबाज” (Chaalbaaj 1989) या चित्रपटांमध्ये सर्वोत्कुष्ट अभनेत्री चा पुरस्कार देण्यात  आला. श्री देवी यांना भारतीय पहिला महिला सुपरस्टार म्हूणन ओळखले जाते. “मैने प्यार किया” (Maine Pyar Kiya 1989) हे काही चित्रपट हिट झालेले आहेत. माधुरी दीक्षित यांचा दिल (Dil 1990) ह्या चित्रटातील अभिनयासाठी फिल्मफेअर चा सर्वोत्कुष्ट अभनेत्री चा पुरस्कार देण्यात आला. मोहनलाल (Mohanlal) यांना “भरथम’ (Bhartham 1991) या चित्रपट साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. १९९२ साली  के. राघवेंद्र राव (K. Raghavendra Rao) दिग्दर्शित आणि चिरंजीवी यांचा “घराना मुगुडू” (Gharana Mugudu 1992) हा चित्रपट १० कोटी पेक्षा जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. “खिलाडी” (Khiladi 1992), “खलनायक” (Khalnayak 1993), महेश कोठारे दिग्दर्शित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा “झपाटलेला” Zaptlela1993) हा भयपट चित्रपट खूपच गाजला झाला. “बँडीत क्विन” (Bandit Queen 1994), “दिलवाले दुल्हन्हिया ले जायेंगे” (Dilwale Dulhanhia Le Jayenge 1995),  “सत्या” (Satya 1998) “सेथु” (Sethu 1999) हे जास्त गाजलेले काही चित्रपट होते. ॲक्शन, नाटक, प्रणय, विनोद या प्रकारच्या शैली प्रत्येक चित्रपटांत दिसू लागले. 
          २००० च्या दशकानंतर  व्हीएफएक्स, एडिटिंग सॉफ्टवेअर, कॅमेरा, ३डी ऍनिमेशन. नवनवीन टेकनॉलॉजि निर्माण होऊ लागल्या तसतसे चित्रपट झपाट्याने निर्माण होऊ लागले. चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचे प्रत्येक फिल्म इंडस्ट्री वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट बनवू लागले आहेत. राज्यातील त्यांच्या भाषेतील निर्माण झालेलं चित्रपट डबिंग करून आपण आपल्या मूळ भाषेतून सुद्धा पाहत असतो. लघुपट (Short Movie), वैशिट्य लांबीचे चित्रपट(Feature Movie), टेलिव्हिजन वरील मालिका (TV Serial ), व्हिडिओ गाणे (Video Songs), आणि वेब सिरिज( Web Series). आताच्या काळात वेब सिरिज जास्त लोकप्रिय होत आहेत. अश्याच वेगवेगळ्या शैलीतल लघुपट, वैशिट्य लांबीचे चित्रपट, टेलिव्हिजन वरील मालिका, व्हिडिओ गाणे, आणि वेब सिरिज तुम्हाला बघायला मिळत होते, बघायला मिळत आहेत, पुढे पण बघायला मिळणार.

इंडियन फिल्म इंडस्ट्री

        जगामध्ये भारत हा एक असा देश आहे जिथे अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. आणि म्हणून या देशात त्या त्या भाषेतील फिल्म इंडस्ट्री नुसार ओळखले जाते. सर्वात जास्त चित्रपटाचे निर्माण बॉलीवूड इंडस्ट्री करते. आता पाहू काही इंडियन फिल्म इंडस्ट्री त्यांच्या निक नांवासहित.

हिंदी (बॉलीवूड) Hindi (Bollywood) – 

 हिंदी भाषेतील बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्र राज्यातील मुबई (Mumbai) मध्ये आहे. 

मराठी (Marathi) – 

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील मराठी भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

कन्नड  (Kannada) सॅण्डलवूड (Sandalwood) –

कर्नाटक (Karnataka) राज्यातील कन्नड भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

मल्याळम (Malayalam) मॉलीवूड (Mollywood) –

केरळ (Kerala) राज्यातील मल्याळम भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

तमिळ (Tamil) कॉलीवूड (Kollywood) – 

तमिळनाडू (Tamilnadu) राज्यातील तमिळ भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

तेलुगू (Telugu) टोलीवूड (Tollywood)  – 

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि तेलंगणा राज्यातील तेलुगू भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

पंजाबी (Punjabi) पॉलीवूड (Pollywood) – 

पंजाब (Punjab) राज्यातील पंजाबी भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

भोजपुरी (Bhojpuri) भोजीवूड (Bhojiwood) –

बिहार (Bihar) राज्यातील भोजपुरी भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

गुजराती (Gujarati) धॉलीवूड (Dhollywood) – 

गुजरात (Gujarat) राज्यातील गुजराती भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

ओडिया (Odia) ऑलिवूड (Ollywood) – 

ओडिशा (Odisha) राज्यातील ओडिया भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

आसामी (Assamese)  जॉलीवूड (Jollywood) –

आसाम (Assamese) राज्यातील आसामी भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

झारखंड (Jharkhand) झॉलीवूड (Jhollywood)  – 

झारखंड (Jharkhand) राज्यातील संताली (Santali), नागपुरी (Nagpuri), कुडमाली (Kudmali), खोर्था (Khortha) भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

छत्तीसगड (Chhattisgarhi) छॉलीवूड (Chhollywood) –

छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील छत्तीसगढी भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

बंगाली (Bengali)  टॉलीवूड (Tollywood) – 

वेस्ट बंगाल (West Bengal) राज्यातील बंगाली भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

तुळू (Tulu) कोस्टलवूड (Coastalwood) – 

तुळू (Tulu) भाषेतील फिल्म इंडस्ट्री.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *