HomeFilmsSouth Indian

भारतीय देशभक्तीवर दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघायलाच हवे | You must watch South Indian Films on Indian Patriotism

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 14, 2022 | 07:54 PM

 इंग्रजांच्या तावडीतून सुटका होऊन म्हणजेच स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे पूर्ण झाली. म्हणूनच यावर्षी सगळ्यांमध्ये एक वेगळाच जोश संचारला आहे. आणि पहिल्यांदाच “हर घर तिरंगा!” हे अभियान सुद्धा राबविण्यात येत आहे आणि जनता सुद्धा भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे.

      दरवर्षी प्रमाणे उद्या टिव्ही वर सुद्धा निरनिराळे कार्यक्रम बघायला मिळतील. खरं तर १५ ऑगस्ट आणि टिव्ही वर एखादा देशभक्तीपर सिनेमा हे समीकरण ठरलेलं. पण बऱ्याचदा तेच तेच चित्रपट दाखवले जातात, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही वेगळे चित्रपट सांगणार आहोत जे कदाचित तुम्ही पाहीले नसतील.

South 20Indian 20Films 20on 20Indian 20Patriotism

 

        आज आम्ही तुम्हाला काही दाक्षिणात्य चित्रपट सांगणार आहोत. त्यातले काही चित्रपट तुम्ही हिंदीमध्ये पण बघू शकता. 

१. रोजा 

१९९२   सीबीएफसी :- यू   कालावधी : – २ तास १७ मिनिटे   

शैली : – नाटक, रोमांचक, प्रणय        
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.2 / 5                         
लेखक                       : –  मणी रत्नम 
दिग्दर्शक                   : –  मणी रत्नम 
कलाकार                   : – अरविंद स्वामि, मधू, पंकज कपूर 
 
“रोजा” चित्रपट समीक्षा :

       “रोजा” चित्रपट आणि ऐंशी नव्वदच्या दशकातील पिढी यांचं एक वेगळंच नातं आहे. कारण या चित्रपटातील गाणी. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेली ए.आर. रेहमान यांचं संगीत असलेली गाणी ऐकली की एका वेगळ्याच दुनियेत जाता येतं. १९९२ साली प्रदर्शित झालेला हा मुळ तमिळ भाषेतील चित्रपट आजही तेवढाच नवीन वाटतो. 

       सुरूवातीला बघताना रोमॅंटिक वाटणारा रोजा हा चित्रपट उत्तरार्धात मात्र वेगळंच वळण घेतो. आपल्या मातृभूमीवर अपार प्रेम आणि निष्ठा असलेला नायक ( अरविंद स्वामी) आणि आपल्या पतीवर तेवढंच प्रेम असलेली त्याची पत्नी ( मधू ) यांची प्रेमकहाणी दाखविण्यात आली आहे. काश्मिरी अतिरेक्यांनी आपल्या पतीला पकडून कैद करून ठेवल्यावर दक्षिण तामिळनाडू मधील गावात वाढलेली एक मुलगी काय करते हे पाहणं आणि अतिरेक्यांच्या तावडीत असताना पण आपलं देशप्रेम तेवढंच जाज्वल्य ठेवणारा कथेचा नायक आपल्याला नक्कीच आदर्श वाटतो. 

       मणिरत्नम यांचं दिग्दर्शन म्हणजे एक वेगळी जादू असते. त्यांच्या खास चित्रपटांपैकी रोजा हा एक उत्तम चित्रपट. हा चित्रपट तुम्ही हिंदीमध्ये पण बघू शकता.

ॲमेझॉन प्राईम, झी 5, किंवा युट्यूबवर सुद्धा हा सिनेमा बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४ स्टार रेटिंग देईन.

२. इंडियन सोल्जर नेव्हर ऑन हॉलिडे (थुप्पाक्की)

२०१२   सीबीएफसी :- यू   कालावधी : – २ तास ४५ मिनिटे   
शैली : – नाटक, रोमांचक                           
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.1 / 5 
लेखक                       : –  ए. आर. मुरुगाडोस 
दिग्दर्शक                   : –  ए. आर. मुरुगाडोस (संवाद) 
कलाकार                   : – जोसेफ विजय, काजल अगरवाल, विद्युत जम्मवाल  
 
“इंडियन सोल्जर नेव्हर ऑन हॉलिडे (थुप्पाक्की)” चित्रपट समीक्षा :

         २०१२ साली प्रदर्शित झालेला मुळ तमिळ भाषेतील “थुप्पाक्की” हा चित्रपट हिंदीमध्ये डब केलेला एक ॲक्शन थ्रिलर सिनेमा आहे. विजय आणि काजल अग्रवाल हे दोघं या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 

      एक भारतीय सैनिक सुट्टीवर असताना सुद्धा आपलं कर्तव्य बजावत असतो. तो नेहमीच आपल्या ड्युटीला प्राधान्य देतो, हे या चित्रपटात पाहायला मिळतं. खर तरं एका खास कामगिरी वर असलेला एक सैनिक सुट्टीसाठी घरी आलेला असताना देशासाठी काय करतो. किंवा काही गोष्टी घरच्यांसाठी पण गोपनीय ठेवतो. एकंदरच सैनिकांची देशसेवेसाठी सदा तत्पर असण्याची आणि त्यासाठी सैनिक काहीही करू शकतात हे सांगणारी ही कथा आहे. 

      इतर साऊथ इंडियन सिनेमांमध्ये जसा मसाला, ऍक्शन चा थरार असतो तसाच या सिनेमात सुद्धा आहे. २०१४ साली आलेला “हॉलिडे” हा अक्षय कुमार चा चित्रपट थप्पकीचा रिमेक आहे. 

        हा दाक्षिणात्य चित्रपट तुम्ही वूट, हॉटस्टार या ॲपवर पाहू शकता. किंवा युट्यूबवर सुद्धा हा सिनेमा उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४ स्टार रेटिंग देईन.

       

३. ऑपरेशन गोल्ड फिश / मिशन गोल्ड फिश:

२०१९   सीबीएफसी :- यू   कालावधी : – २ तास ७ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, नाटक, रोमांचक                
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 2.5 / 5           
लेखक                      : –  साई किरण आदिवी (पथकथा), अब्बूरी रवी 
दिग्दर्शक                   : – साई किरण आदिवी 
कलाकार                   : – आदी, साशा छत्री, नित्या नरेश
 
“ऑपरेशन गोल्ड फिश / मिशन गोल्ड फिश” चित्रपट समीक्षा :

       काश्मीर मध्ये चित्रित केलेला आणि २०१९ साली प्रदर्शित झालेला “ऑपरेशन गोल्ड फिश” हा एक तेलगू चित्रपट आहे. २०२० मध्ये हाच चित्रपट हिंदीमध्ये डब करून मिशन गोल्ड फिश या नावाने प्रदर्शित करण्यात आला. 

          अर्जुन पंडित (आदी साईकुमार) हा एक NSG कमांडो आहे. तो लहान असतानाच गाझी बाबा (अब्बुरी रवी) या दहशतवाद्याने त्याच्या आई-वडिलांची हत्या केलेली असते. या दहशतवाद्याला पकडण्याचा थरार खास साऊथ इंडियन स्टाईल मध्ये बघायला मिळतो.

      या चित्रपटात दाखवण्यात आलेला महत्त्वाचा भाग म्हणजे काश्मिरी पंडित. काश्मीर सोडण्यासाठी त्यांचे करण्यात आलेले छळ बघून अंगावर काटा येतो. 

       ॲक्शन, थ्रिलर आणि देशभक्ती एकत्र बघायचं असेल तर हा सिनेमा अजिबात चुकवू नका.

      ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर हा सिनेमा तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ३ स्टार रेटिंग देईन.

४. मेरे हिंदुस्थान की कसम 

२०११   सीबीएफसी :- यू   कालावधी : – १ तास ५६ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, गुन्हेगारी                          
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.3 / 5 
लेखक                       : – टी. जे. ज्ञानवेल, राधा मोहन 
दिग्दर्शक                   : – राधा मोहन 
कलाकार                   : – नागार्जुन अक्किनेनी, प्रकाश राज, सना खान 
 
“मेरे हिंदुस्थान की कसम (पायनम)” चित्रपट समीक्षा :

         २०११ साली “पायनम” व “गागानाम” नावाने प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनुक्रमे तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता. पण दाक्षिणात्य चित्रपटांची वाढती लोकप्रियता बघता आता बरेच चित्रपट हिंदीमध्ये डब केले जातात. त्यातलाच एक “मेरे हिंदुस्थान की कसम”.

     नागार्जुन, प्रकाश राज , पूनम कौर अशी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट आहे. दहशतवाद्यांनी अपहरण केलेलं विमान आणि त्यांच्या तावडीतून सुटका करणारा NSG कमांडो अशी या चित्रपटाची कथा आहे.

       दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा बॉलिवूडमध्ये तेवढाच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे नागार्जुन साठी तरी हा चित्रपट बरेच जण बघतील यात शंका नाही.

     हॉटस्टार डिस्नी वर हा सिनेमा तुम्ही अगदी विनामूल्य पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४ स्टार रेटिंग देईन.

५. द गाझी ॲटॅक

२०११   सीबीएफसी :- यू   कालावधी : – २ तास ४ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, युद्ध, रोमांचक              
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.5 / 5           
पथकथा                     : – संकल्प रेड्डी, निरंजन रामीरेड्डी, गुन्नाम गंगाराजू,  
दिग्दर्शक                   : –  संकल्प रेड्डी
कलाकार                   : – राणा दुगुबत्ती, के के मेनन, अतुल कुलकर्णी 
 
“द गाझी ॲटॅक” चित्रपट समीक्षा :

        २०१७ साली तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झालेला “द गाझी ॲटॅक” हा सिनेमा म्हणजे १९७१ साली झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची कथा आहे. पण नेहमीपेक्षा हे युद्ध खूप वेगळं आहे कारण हे सागरी युद्ध आहे. पाण्याखालील युद्धाचा थरार म्हणजे “द गाझी ॲटॅक”. 

        “आयएनएस विक्रांत’ ही युद्धनौका जमीनदोस्त करण्यासाठी पाकिस्तान ने एक गुप्त योजना आखली होती. आणि त्यासाठीच त्यांची सर्वात कार्यक्षम पाणबुडी “पीएनएस गाझी’ ला पाठविण्यात येतं. 

       भारताची गुप्तहेर संघटना “रॉ’ला ही माहिती मिळाल्यानंतर “पीएनएस गाझी” चा कशा प्रकारे नायनाट करण्यात येतो हे दाखवणारा हा चित्रपट आहे.

      ओम पुरी, राणा दुग्गुबत्ती, अतुल कुलकर्णी, के. के. मेनन तसेच तापसी पन्नू या सगळ्याच कलाकारांनी आपली कामगिरी चोख पार पाडली आहे. 

     संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण हे पाणबुडीतच केलेलं आहे. तरीसुद्धा शेवटपर्यंत उत्कंठा वाढत जाते. आपल्या भारतीय नौदलाच्या यशाची ही शौर्यगाथा बऱ्याच लोकांना माहित नाही. म्हणून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी बघायला हवा. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४ स्टार रेटिंग देईन.

६. इंडियन

१९९६   सीबीएफसी :- यू / ए    कालावधी : – ३ तास ५ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, नाटक, रोमांचक     
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.9 / 5                   
लेखक                       : – एस. शंकर
दिग्दर्शक                   : –  एस. शंकर,  उमेश शर्मा ( हिंदी संवाद), सुजाता (संवाद)
कलाकार                   : – कमल हसन, सुकन्या, मनीषा कोईराला
 
“इंडियन” चित्रपट समीक्षा :

        वैविध्यपूर्ण अभिनयाची ताकद असलेल्या काही मोजक्या नटांपैकी “कमल हसन” हा एक अभिनेता.

१९९६ साली प्रदर्शित झालेला “इंडियन” हा कमल हसन चा तमिळ चित्रपट म्हणजे देशभक्ती चं उत्तम उदाहरण. 

      कमल हसन, मनिषा कोईराला, आणि उर्मिला मार्तोंडकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

भ्रष्टाचार आणि त्याविरुद्ध एका माजी स्वातंत्र्यसैनिकाची लढाई अशी एकंदर या चित्रपटाची पटकथा आहे. 

       लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा सेनापती(कमल हसन) एक दुर्मिळ प्रकारची मार्शल आर्ट वापरून गुन्हेगारांना कशी शिक्षा देतो हे या चित्रपटात पाहायला मिळते. त्यातूनच देशाप्रती असलेलं प्रेम आणि जबाबदारीची जाणीव अधोरेखित होते. नेहमीप्रमाणे कमल हसन यांचा उत्कृष्ट अभिनय बघायला मिळतो. 

        वूट, जिओ सिनेमा, युट्यूबवर तसेच ॲमेझॉन प्राईम‌ अशा बऱ्याच प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४.५ स्टार रेटिंग देईन.

७. हे राम

२००० सीबीएफसी :- यू / ए    कालावधी : – ३ तास ६ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, नाटक, इतिहास           
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.2 / 5              
लेखक                       : – एच बॅनर्जी, कमल हसन,  मनोहर श्याम जोशी (हिंदी संवाद) 
दिग्दर्शक                   : –  कमल हसन 
कलाकार                   : – कमल हसन, शाहरुख खान, राणी मुखर्जी 
 
“हे राम” चित्रपट समीक्षा :

        २००० साली प्रदर्शित झालेला “हे राम” हा चित्रपट तमिळ आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला होता. कमल हसन ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा कमल हसन यांनी चं केलं आहे. 

         “गांधी हत्या” या कथानकावर आधारित असलेला हा “काल्पनिक” चित्रपट वादाच्या भोवऱ्यात पण सापडला होता. चित्रपटात मोहनदास गांधीची ( नसीरुद्दीन शाह ) हत्येचा प्रयत्न करणारा मोहनदास साकेथ राम ही मुख्य भूमिका सुद्धा कमल हसन यांनी केली आहे. भारताची झालेली फाळणी आणि त्याचा भारतीय जनतेवर झालेला परिणाम, हा चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.

       विशेष म्हणजे बॉलिवूडचा “किंग खान” शाहरुख खान याने या चित्रपटाच्या निमित्ताने ” अमजद अली खान” ही भूमिका साकारत तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. राणी मुखर्जी हीने साकेथ राम याच्या पत्नीची भूमिका साकारली असून या भुमिकेला सुद्धा चित्रपटात विशेष महत्त्व आहे. आता ते काय हे बघण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागणार. 

       ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट उपलब्ध आहे. पण जिओ सिनेमा किंवा युट्यूबवर तुम्ही हा चित्रपट अगदी फ्रि मध्ये बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४.२ स्टार रेटिंग देईन.

८. कालापानी

१९९६   सीबीएफसी :- यू / ए    कालावधी : – २ तास ४० मिनिटे   
शैली : – ॲक्शन, नाटक, इतिहास    
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.9 / 5                     
लेखक                       : – टी. दामोदरन (पथकथा),  प्रियादर्शन (कथा)
दिग्दर्शक                   : – प्रियादर्शन 
कलाकार                   : – मोहनलाल, अमरीश पुरी, प्रभू 
 
“कालापानी” चित्रपट समीक्षा :

           १९९६ साली प्रदर्शित झालेला प्रियदर्शन दिग्दर्शित कालापानी हा भारतीय मल्याळम-भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. मोहनलाल, प्रभू, तब्बू, अमरीश पुरी, अशी बरीच कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. 

        या चित्रपटाचं कथानक ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीत अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेल मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारीत आहे. 

      एकाच दिवशी एकूण ४५० चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. मुळ मल्याळम मध्ये बनवलेला हा सिनेमा नंतर हिंदी, तमिळ व तेलगू भाषेत विविध नावांनी डब करण्यात आला.

       स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांचं आयुष्य किती खडतर होतं याची कल्पना हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्की येते.

     हॉटस्टार डिस्नी वर हा सिनेमा तुम्ही विनामूल्य पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४.५ स्टार रेटिंग देईन.

धन्यवाद.

लेखक – आकांक्षा कोलते

Akanksha 20Kolte 20bio

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *