मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट १ फिल्म समीक्षा | मिशन : इम्पॉसिबल फ्रेंचाइझी मधील सुपरहीट चित्रपट
Written by : के. बी.
Updated : जुलै 17, 2023 | 01:46 AM

मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट १ |
लेखक | एरीक झेंडरसेन, ख्रिस्तोफर मॅकक्वेरी |
दिग्दर्शक | ख्रिस्तोफर मॅकक्वेरी |
कलाकार | टॉम क्रूज, हेले एटवेल, इसाई मोरालेस, विंग रॅम्स, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी, पॉम क्लेमेंटीफ, मारिएला गॅरिगा, हेन्नी झेर्नी |
निर्माता | टॉम क्रूज, ख्रिस्तोफर मॅकक्वेरी |
संगीत | लॉर्न बाल्फे |
प्रदर्शित तारीख | १२ जुलै २०२३ |
देश | युनाइटेड स्टेटस |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
महासागरात मिळालेली चावी चे काय होणार आहे ते पण माहित नाही, कुठे लावायची ते हि माहित नाही. अशी चावी घेण्यासाठी अनके जण त्या चावीच्या पाठीमागे लागले आहेत. एखाद्या वाईट माणसाच्या हाती लागली तर अनेक अनर्थ घडू शकतात. त्यामुळे आय एम एफ चा एजन्ट इथन हंट ला एक चावी शोधण्याचे इम्पॉसिबल असे मिशन मिळते. ते मिशन पूर्ण होते कि नाही ते नक्की पहा.
“मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट १” चित्रपट समीक्षा :-
ब्रायन डी पाल्मा यांनी मिशन : इम्पॉसिबल चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गेली सत्तावीस वर्षे या सिरीज ने प्रेक्षकांचे खूप चांगले मनोरंजन केले आहे. या फ्रेंचाइझी चा पहिला चित्रपट २२ मे १९९६ ला प्रदर्शित झाला होता आणि आता १२ जुलै २०२३ मिशन : इम्पॉसिबल फ्रेंचाइझी हि सातवी फिल्म प्रदर्शित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या इम्पॉसिबल मिशन पूर्ण करण्याचे काम आय एम एफ म्हणजे इम्पॉसिबल मिशन फोर्स या नावाची गुप्त संघटना करत असते. ख्रिस्तोफर मॅकक्वेरी मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट १ चे दिग्दर्शन केले आहे. पहिल्या भागात तुम्हाला पहिल्या सिरीज च्या फिल्म पेक्षा यात सातव्या चित्रपटामध्ये अनोखी स्टोरी दाखवली आहे. जी आत्ताच्या युगात होणार्या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स वर आधारित आहे. स्टोरी प्रत्येक पात्राला समजून घ्यायला वेळ दिला आहे. त्यामुळे याचे पहिले सीजन बघायलाच पाहिजे असे काही नाही. फक्त तुम्ही पहिले हि सर्व भाग बघितले तर तुम्ही लवकर समजेल. यात नेहमी प्रमाणे ॲक्शन बघायला मिळेल. कार रेसिंग ची किमया आणि त्यात्यून होणारे छोठे छोठे विनोद पाहून हसु उमटते. ट्रेन पकडण्यासाठी डोंगरावरून मोटोर सोबोत मारलेली उडी. हि उडी तों क्रुज यांनी प्रत्यक्षात स्वत: च स्टंट केले आहे. असे स्टंट जे जीवावर बेतू शकते. मला आवडलेलं ट्रेन चे डब्बे एका पाठोपाठ एक असे खाली दरीत पडत असतात ते आपले जीव वाचण्याचा प्रयत्न करत असतात त्याने अंगावर शहारे आणणारे सीन आहेत. इमोशन ला थोडा वेळ देण्यात आला आहे त्यामुळे आपल्याला भावनात्मक प्रकीर्या निर्माण होतात. प्रत्येक क्षण तुम्हाला बघण्यास मजा येते. पहिल्या भागाचा शेवट असा केला आहे कि चावी चे पुढच्या दुसऱ्या भागात काय होईल याची उत्सुकता लागली आहे.
आपल्याला माहित असेल ते सर्वच फिल्म मध्ये स्वतःच खतरनाक स्टंट करतात. असे टॉम क्रूज ६१ वर्षाचे झाले असून तरीपण सुद्धा त्यांनी उत्तम प्रकारे ॲक्शन केली आहे. त्याच सोबत हेले एटवेल यांचाही चांगल्या प्रकारे एका चोराची भूमिका केली आहे. हेले एटवेल यांनी “कॅप्टन अमेरिका” चित्रपटात एजन्ट कार्टर ची भूमिका केली होती. बरेच त्यांना एजन्ट कार्टर म्हणून त्या फेमस आहेत. इतरानीही चांगल्या प्रकारे भूमिका केल्या आहेत.
ट्रेन चा सीन असो या मोटोर मधून उडी असो प्रत्येक ठिकाणी व्ही एफ एक्स कमालीचा आहे. याचे जे म्युजिक आहे ते तुम्हाला प्रत्येक क्षण थांबून ठेवते. कानी पडलेले म्युजिक ऐकल्यावर पुढे काय आहे ते बघण्यास मजा येते. यात एकही किस सीन नाही आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही परिवारासोबत पाहू शकता.
“मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट १” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.७ स्टार देईन.
तुम्ही मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट १ चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.