मिस मार्वल सिरीज ( सीजन – १ ) समीक्षा : कमी वयात झालेली लेडी सुपरहिरो मिस मार्वल – कमाला खान
Written by : के. बी.
Updated : नोव्हेंबर 22, 2022 | 11:04 PM

मिस मार्वल |
लेखक | |
दिग्दर्शक | आदिल अल अरबी, बिलाल फलाह, मीरा मेनन, शरमीन ओबैद-चिनॉय |
कलाकार | इमान वेल्लानी, मॅट लिंट्ज, मोहन कपूर, जेनोबिया श्रॉफ, फरहान अख्तर, |
निर्माता | केविन फाईगी, लुई डी’ एस्पोसिटो, ब्रॅड विंडरबॉम, व्हिक्टोरिया अलोन्सो, सना अमानत, आदिल आणि बिलाल, बिश के अली |
संगीत | लॉरा कार्पमन |
b | |
प्रदर्शित तारीख | ८ जुन – १३ जुलै २०२२ |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
कामाला खान (इमान वेल्लानी ) हि कॅप्टन मार्वल ची खूप मोठी चाहती आहे. ती अव्हेंजर्स च्या दुनियेचाच विचार करत असते. अव्हेंजरर्सकॉन मध्ये जाण्यास घरची परवानगी नसताना सुद्धा ती आपला मित्र जो तीच्या प्रत्येक संकटात मदत करणारा ब्रुनो बरोबर जाते. जाताना ती पार्सल आलेलं कडा घालून जाते. यात सुपरपॉवर असते. ती सुपरपॉवर कमाला चे आयुष्य बदलून जाते. हा सुपर पॉवर कडा मिळवण्यासाठी एक जीन टीम त्यांच्या मागे लागली आहे. त्या सुपरपॉवर कड्याची पार्श्वभूमी जाणण्यासाठी ती कराची मध्ये जाते. भारत – पाकिस्तान फाळणी मधील गोष्ट कमाला ला समजते.
“मिस मार्वल” सिरीज समीक्षा : –
मार्वल स्टुडिओज ने “मून नाईट” सिरीज नंतर मिस “मार्वल” सिरीज बनवली. मार्वल च्या या मिस मार्वल सिरीज मध्ये पाकिस्तानी सुपरहिरो दाखवली आहे. याची कथे मध्ये भारत – पाकिस्तान च्या फाळणी चा इतिहास पण दाखवला आहे. एक छोटीशी स्प्लॅशबॅक मध्ये महात्मा गांधीजी याना सुद्धा दाखवले गेले आहे.
एक टिपिकल फॅमिली दाखवली आहे. आई – वडील, भाऊ – बहीण, अशी हि छोटीशी पाकिस्तानी फॅमिली आहे. ज्यात कमाला ची आई मुबीना ची भूमिका जेनोबिया श्रॉफ आणि वडील युसुफ खान ची भूमिका मोहन कपूर यांनी उत्तम भूमिका केली आहे. मार्वल सिरीज मध्ये बॉलीवूड चे अभिनेता फरहान अख्तर यांनी “वलिद” ची भूमिका केली आहे. १० मिनिटांची भूमिका उत्तम साकारली आहे.
अधून मधून तुम्हाला विनोदाचा आनंद घेता येईल. सुरुवातीचा एपिसोड जरा कमजोर आहे पण हळू हळू स्टोरी पुढे सरकत जात आहे. पाहली सिरीज असल्याने जास्त सुपरपॉवर दाखवली नाही. पण २०२३ मध्ये येणाऱ्या फिल्म / सिरीज मध्ये मिस मार्वल ची झलक नक्की पाहायला मिळेल. व्ही एफ एक्स तसे चांगले आहे. सिरीज चे रहस्य हळू हळू उलघडत जाते. त्यामुळे पुढील भाग बघण्याही इच्छा होते. मार्वल चे फॅन असाल तर ते तुम्ही बघणारच.
पूर्ण १ सीजन बघितल्यावर तुम्हाला वाटेल कि मिस मार्वल म्हंटल्यावर कॅप्टन मार्वल पण आपल्याला दिसेल. कॅप्टन मार्वल पासून मिस मार्वल ला पॉवर भेटेले असेल. पण असे काहीच दिसत नाही. असो परत च्या वेळेस मार्वल स्टुडिओज कदाचित कोणत्या तरी सिरीज / मुव्ही मध्ये जुळवून घेतील.
“मिस मार्वल” सिरीज कुठे पाहू शकतो..?
डिजनी प्लस हॉटस्टार फ्री मध्ये पाहू शकता त्यासाठी डिजनी प्लस हॉटस्टार चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, कथा, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २ .९ स्टार देईन.