मून नाईट सिरीज समीक्षा : एकाच शरीरात ३ पात्रांचा खेळ – स्टीव ग्रांट, मार्क स्पेक्टर, आणि मून नाईट
Written by : के. बी.
Updated : नोव्हेंबर 20, 2022 | 11:58 PM

मून नाईट |
लेखक | जेरेमी स्लेटर |
दिग्दर्शक | मोहम्मद डियाब |
कलाकार | ऑस्कर आईजॅक, मे कॅलामावी, इथन हॉक, गॅस्पर्ड उलीयेल, एफ. मरे अब्राहम, |
निर्माता | केविन फाइगी |
संगीत | हेशम नाझीह |
प्रदर्शित तारीख | ३० मार्च – ४ मे २०२२ |
एकूण भाग | ६ |
देश | युनाइटेड स्टेट |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
स्टीवन ग्रांट (ऑस्कर आईजॅक) लंडन म्यूजियम गिफ्ट शॉप मध्ये काम करत आहे. झोपेतून जेव्हा उठतो तर तो दुसऱ्या ठिकाणी असतो. एकाच शरीरा मध्ये मार्क स्पेक्टर आणि मून नाईट अचानक पणे अंगामध्ये येत असतात. त्यामुळे त्यांची मानसिक संतुलन बिगडत आहे. आर्थर हॅर्रो (इथन हॉक) ॲमीट परत जिवंत करण्यासाठी प्रयत्न करतोय. असे झाले तर सर्वाना त्यांच्यापासून धोका होवू शकतो. म्हणून मून नाईट खोंशु ( इजिप्त मुन गॉड) त्यांना थांबवण्यास प्रयत्न करत आहेत.
“मून नाईट” चित्रपट समीक्षा :-
मार्वल स्टुडिओज ने २०२१ मधील हॉकआई सिरीज नंतर ३० मार्च २०२२ ला “मून नाईट” सिरीज प्रदर्शित केली. या सिरीज मधून आपल्या मून नाईट नावाचा एक नवीन सुपरहिरो मिळाला. जो दुसर्याच्या शरीरामध्ये अवतार घेवू शकतो. इजिप्सीयन चंद्र देवता खोंशू दाखवण्यात आले आहे. खोंशु, ॲमीट आणि इतर देवता पिरॅमिड मध्ये आहेत. काहींना बंदिस्त केले आहे. तुम्हाला ईजिप्त सारखे पिरॅमिड दिसतील. स्टीवन ग्रांट (ऑस्कर आईजॅक) ज्याच्या शरीरात ३ अवतार येतात पण ते एकच आहेत. हळू हळू पात्रांचे रहस्य उलघडत जाते. अशी स्टोरी जी पूर्ण वेबी सिरीज बघायला भाग पडते. पहिला भाग जो तुम्हांला भ्रमित करू शकते. दुसऱ्या भागात नेमकं काय चाललंय… ? तुम्हाला हळू हळू समजायला लागेल. स्टीवन ग्रांट, मार्क स्पेक्टर. मून नाईट असे कोणते पात्र कुठून येतंय. बरेच सीन आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अचानक पणे जात आहेत. एक वेगळीच स्टोरी दिग्दर्शकाने आपल्याला गुंतागुंतीचे दर्शन घडवलंय जे शेवटपर्यंत बघितलं तर समजेल.
स्टीवन ग्रांट, मार्क स्पेक्टर. मून नाईट असे तीन पात्रांचा अभिनय ऑस्कर आईजॅक यांनी केला आहे. ते पात्र त्यांना उत्तम रित्या केली. जशी कि आयन मॅन च्या भूमिकेत रॉबर्ट डॉनी ज्युनिअर यांनाच पाहू शकतो. त्याचप्रमाणे मून नाईट ची भूमिकेत ऑस्कर आईजॅक पाहू शकतो. हे त्यांनी आपल्या पहिल्या सिरीज मध्ये सिद्ध केले. त्याच सोबत मे कॅलामावी यांनी लायला ची भूमिका उत्तम केली आहे. आर्थर हॅर्रो जो शांत खलनायक दाखवला आहे याची भूमिका (इथन हॉक) यांनी उत्तम केली आहे.
वाळवंटातील पिरॅमिड असो, पांढरे शुभ्र हॉस्पिटल जसे कि स्वर्गतील हॉस्पिटला सारखे भासणारे असो. या जहाजाचवरची लढाई. व्ही एफ एक्स खूपच चांगले होते. जे मार्वल च्या प्रत्येक फिल्म मध्ये दिसून येते. ॲक्शन सीन पण रिअल वाटतात. हि सिरीज बघण्यासाठी मार्वल च्या पहल्या सिरीज बघण्याची आवश्यकता नाही. मार्वल फॅन वाले तर हि सिरीज बघतीलच. त्यांना माहित हि सिरीज परत कुठे न कुठे तरी जोडली जाणार.
“मून नाईट” सिरीज कुठे पाहू शकतो..?
डिजनी प्लस हॉटस्टार फ्री मध्ये पाहू शकता त्यासाठी डिजनी प्लस हॉटस्टार चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, कथा, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.६ स्टार देईन.
हे हि वाचा :- “हॉकआई” वेब सिरीज सर्व भाग समीक्षा | “Hawkeye” Web Series All Episode Review : Jeremy Renner & Hailee Steinfeld Star